शेतकी कॉलेजचे दिवस
मित्रा, आपण भेटलो परत
पन्नास वर्षांनी या स्नेहमेळाव्यात…
आणि आठवणींच्या चित्रांचे रंग
परत एकदा ओले झाले...
आठवला भाजी-भाकरीचा डबा,
आईनं पहाटेच उठून तयार केलेला
अन्नपूर्णेच्या मायेनं
एसटीने आपल्यापर्यंत पोहोचवलेला ...
आठवला बिनाका गीतमालाच्या
सरताज गीतांचा कल्ला ..
कित्येक बुडवून लेक्चर्स ,
गेलो मॅटिनी शो पाहायला ..
आपण सर्वच कुणबीकीचा
वसा आठवत लढत होतो ...
अडचणींचा गोवर्धन
जिद्दीच्या काठ्यांनी तोलत होतो ...
आयुष्याच्या संध्याकाळी
कृतार्थतेच्या सात्विक भावांनी
उजळलेला तुझा चेहरा पाहताना
मलाही त्या कृतार्थतेची अनुभूती येत आहे...
संकल्प मनोमनी परतभेटीचा करूया...
माऊलींचे पसायदान मनोमनी आळवूया...
छान कविता, माझ्या वर्गातील
फारच सुरेख...
अनेक आठवणींची चित्रे उभी
मुक्तछंद छान जमलायं !