Skip to main content

प्राणवेळा

लेखक कौस्तुभ भोसले यांनी बुधवार, 06/05/2020 01:46 या दिवशी प्रकाशित केले.

आठवांच्या काळवेळा पाहिल्या.
हृदयाच्या प्राणवेळा पाहिल्या.
मालवेणा चंद्र भोळा कालचा.
कालच्या या चांदण्याही राहिल्या.

सोसली मी ही तमांची अंतरे.
रात्र काळी झाडपाने मंतरे.
गारव्याने जाग आली या फुला.
पाकळ्यांच्या गंधपेशी दाहिल्या.

प्राण झाले कातिलांचे सोबती.
सांग हे का माणसाला शोभती ?
वाचण्याचे मार्ग सारे संपले.
शेवटाला प्रार्थना मी वाहिल्या.

-कौस्तुभ
वृत्त - मालीबाला

लेखनविषय:

वाचने 4335
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

छान अंदाज आहे लिहिण्याचा, फक्त शुद्ध लिहा.

मालवेना चंद्र भोळा कालचा,
कालच्या या चांदण्याही राहिल्या.


In reply to by संजय क्षीरसागर

अभिप्रया बद्दल आभारी आहे
लेखणातील चुका नक्कीच सुधारेल