मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फाssट्टकन !!!

बोलघेवडा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"हॅलो...अगंss सग्गssळ्या सोसायटीत बभ्रा झालाय. कुणाला म्हणून तोंड दाखवायची सोय ठेवलेली नाही ह्यांनी आता." . . "पण असं केलं तरी काय जावईबापुंनी...म्हणते मी???". . "अग्ग..सत्तत नजर ठेऊन असायचे त्या शेजारच्या चीचुंद्रीवर..सवितावर!! . आता त्या सटवेला...सासरचेही नाहीत अन् नवराही परगावी!! म्हणजे ह्यांना रान मोकळं!! . बरं, कुठं होतात म्हणून विचारलं तर कावरे बावरे व्हायचे नुसते!! मी काय दिलं नसतं करून?? . काssयबाई...मेला आचरट प्रकार!!.. शी...!" . . "पण झालं तरी काय??" . . . "अगss..काल रात्रीची गोष्ट. मी झोपेत आहे अस समजून हे हळूच गच्चीची किल्ली घेऊन सटकले. मलाही वास आला होताच... मी ही गेले मग वर तरातरा!!! गाऊन वरच..." . . . "मssग???" . . . "आता रंगेहाथ पकडाव म्हणून फाssट्टकन दिवा लावला गच्चीचा... . . . बघते तर काय?? . . . टाकीच्या एका बाजूला, समोरचा तो मेला आगाऊ चंद्या अन् त्याची चांडाळ चौकडी दारू पीत बसलेली... . . . अन् दुसऱ्या बाजूला... हे...हे... . . ओणवे होऊन मांजरासारखे...त्या सवितानं वाळत घातलेल्या . . . . . . . . . ओल्या पापड्या आणि कुरडया खाण्यात मग्न. . . . लोकं हसतायत गsss आता आमच्यावर ...फिदीफिदी...!!!

वाचने 4975 वाचनखूण प्रतिक्रिया 8

In reply to by अत्रुप्त आत्मा

बोलघेवडा Sat, 05/02/2020 - 18:44
अतृप्त आत्मा साहेब, ही कथा मी स्वतः लिहिलेली आहे. कोणत्याही प्रकारचे फॉरवर्ड मी आजपर्यंत मिसळपाव काय कोणत्याच स्थळावर टाकलेले नाही. जे आहे ते स्वतचे आहे.

तुषार काळभोर Tue, 05/05/2020 - 22:59
आताच्या उन्हात सकाळी दहाला केलेल्या कुरडया पापड्या सूर्य मावलायच्या आत वाळत्यात. रात्री ओल्या कुरडया पापड्या म्हणजे संध्याकाळी सहा नंतर केलेल्या असणार.