करोना विषाणू COVID-19 (Coronavirus disease 2019)
लेखनप्रकार
करोना विषाणू
हा एक साध्या सर्दीपासून मर्स आणि सार्स (Middle East Respiratory Syndrome (MERS) and Severe Acute Respiratory Syndrome (SARS) सारख्या श्वसनसंस्थेला सूज आणणाऱ्या विषाणूंच्या गटातील एक विषाणू आहे.
COVID-19 (Coronavirus disease 2019) हे या विषाणूंचे नाव आहे आणि याचा आपल्याला शोध हा आता हि साथ आल्यामुळे लागला आहे.
यामुळे होणाऱ्या रोगाची लक्षणे -- ताप, कोरडा खोकला आणि थकवा येणे. काही रुग्णांना सर्दी, अंग मोडून येणे, नाक बंद होणे, घसा दुखणे आणि काही रुग्णांना डायरिया पण होतो. हि सर्व लक्षणे हळूहळू दिसू लागतात.
बऱ्याच लोकांना या विषाणूचा प्रादुर्भाव झाला तरी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत कि कोणताही त्रास होत नाही. ८५ टक्के रुग्ण कोणताही इलाज न करता स्वतःहून बरे होतात.
१५ % रुग्णांमध्ये हा रोग गंभीर होतो आणि १ ते २% रुग्ण यात दगावतात.
गंभीर आजार आणि मृत्यू हा साधारणपणे वृद्ध, प्रतिकारशक्ती कमी असणारे किंवा मधुमेह, रक्तदाब हृदयविकाराचे रुग्ण यांमध्ये दिसून येतो.
रोग प्रसार -- या रोगाने आजारी रुग्ण जेंव्हा खोकतो किंवा शिंकतो तेंव्हा त्यातुन जो फवारा उडतो त्यात असलेल्या सूक्ष्म थेंबातुन हे विषाणू आजूबाजूच्या वस्तूंवर जाऊन बसतात. या वस्तुंना हात लावल्यावर जेंव्हा निरोगी माणूस आपल्या चेहऱ्याला डोळ्यांना नाकाला हात लावतो तेंव्हा हा विषाणू त्याच्या शरीरात शिरतो.
यासाठीच आपण बाहेर जाऊन आल्यावर आपले हात साबणाने आणि भरपूर पाण्याने धुतले पाहिजेत आणि सारखा चेहऱ्याला हात लावणे बंद केले पाहिजे.
आणि ज्याला खोकला किंवा सर्दी आहे त्याने मोठा हातरुमाल जवळ बाळगून त्यातच आपले खोकणे किंवा शिकणे नियंत्रित करणे आवश्यक आहे.
अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर हा साबणासारखेच काम करतो. (खरं तर साबण जास्त चांगला आहे).
कोणताही साबण चालतो. डेटॉल किँवा सॅवलॉन सध्या साबणापेक्षा जास्त परिणामकारक असतो असा कोणताही पुरावा आढळलेला नाही.
बहुसंख्य लोकांना हा रोग अतिशय कमी प्रमाणात होतो परंतु हे विषाणू त्यांच्या श्वसन मार्गात असल्यामुळे कोणीही( वारंवार निरोगी दिसणाऱ्या माणसानेही) खोकताना किंवा शिंकताना हातरुमालातच शिंकणे आवश्यक आहे.
करोना विषाणू पासून आपला बचाव--
१) बाहेर जाऊन आलयावर प्रत्येक वेळेस आपण आणि आपल्या घरच्यांना साबण आणि पाण्याने हात धुण्याची सवय लावणे
२) खोकला किंवा सर्दी असलेल्या माणसापासून १ मीटर दूर उभे राहणे
३) ज्याला खोकला किंवा सर्दी आहे त्याने मोठा हातरुमाल जवळ बाळगून त्यातच आपले खोकणे किंवा शिकणे नियंत्रित करणे. हि गोष्ट आपल्या माहितीतील सर्व लोकांना सांगणे
आपल्याला हा रोग होण्याची शक्यता --आपण चीन इटली किंवा तशा रोगप्रसार झालेल्या देशात जाऊन आला नसाल तर हा रोग होण्याची शक्यता सध्या तरी फारच कमी आहे.
हा विषाणू जन्य रोग असल्यामुळे या रोगावर प्रतिजैविके ( Antibiotics) काम करत नाहीत. अजून तरी यावर लास तयार झालेली नाही परंतु लवकरच ती उपलब्ध होईल अशी आशा आहे.
आरोग्य कर्मचारी आणि ज्यांना खोकला किंवा सर्दी आहे अशानीच तोंडावर मुखवटा घेणे आवश्यक आहे. सामान्य माणसांनी मुखवटा घेणे हे अगोदरच कमी असलेल्या साधनसामग्रीचा अपव्यय आहे.
चीन मधून आलेल्या पॅकेटमधून हा विषाणू येण्याची शक्यता फारच कमी आहे कारण शरीराच्या बाहेर हा विषाणू फार तर ४८-७२ तास जिवंत राहू शकतो ते सुद्धा थंड तापमानात
अत्यंत महत्त्वाची गोष्ट --या रोगापासून काळजी घेणे हे योग्य आहे परंतु याबद्दल चिंता करणे(ANXIETY) किंवा घबराट पसरवणे ( PANIC) हे चूक ठरेल
सार्स(२००३) मध्ये मृत्यूची शक्यता १० % होती .
स्वाईन फ्लू( २००९) मध्ये मृत्यूची शक्यता ४.५ % होती
इबोला(२०१४) मध्ये मध्ये मृत्यूची शक्यता २५ % होती
तर
करोना मध्ये हि १-२ % आहे
मग आज इतकी भीती का पसरली आहे ?
सार्स स्वाईन फ्लू किंवा इबोलाच्या वेळेस सोशल मीडियाचा ( आणि त्यामुळे गैरसमज आणि अफवांचा) प्रसार इतका झालेला नव्हता. आज जगात सोशल मीडिया ३०० कोटी लोक वापरतात. त्यामुळे अफवा दोन दिवसात जगभर पसरल्यामुळे या बद्दल अफवा आणि त्यामुळे घबराट फार लवकर पसरली आहे.
भारतात या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे जसे तापमान वाढते तसे लोक अतिथंडीमुळे घरात बसून राहतात त्याऐवजी बाहेर पडतात जेथे तापमान जास्त असते यामुळे विषाणूची वाढ कमी होते.
वरील लेखातील बहुतेक साहित्य हे जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकातून घेतलेले आहे. यावर अजून संशीधन चालू आहे आणि अजून बरीच माहिती मिळणे बाकी आहे.
हा लेख माझ्या नावासाहित किंवा नावा शिवाय पाठवले तरी चालेल. ही माहिती मी जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकावरूनच घेतलेली आहे.
त्यात माझे कर्तृत्व काही नाही.
पण जर लोकांना माहितीच्या स्रोता बद्दल खात्री वाटत नसेल तर खाली डॉ सुबोध खरे एम डी असे लिहिले तरी चालेल.
लोकांमध्ये निर्माण होणारा "भयगंड"दूर करणे आणि आरोग्याची योग्य काळजी घेणे एवढाच माझा हेतू आहे.
वाचने
148283
वाचनखूण
प्रतिक्रिया
253
शरीरात चाचणी
पण बहुतेक औषधी उद्योगांचे
In reply to पण बहुतेक औषधी उद्योगांचे by सुबोध खरे
:(
CoVID19 शैक्षणिक सुट्टी कालावधीसाठी खेळ सुचवा
In reply to CoVID19 शैक्षणिक सुट्टी कालावधीसाठी खेळ सुचवा by माहितगार
बैठे खेळ
In reply to बैठे खेळ by आवडाबाई
होय बरोबर आहे तुमचे. मी
चायना
खूप माहितीपूर्ण धागा
फळे ?
In reply to फळे ? by आवडाबाई
मुळात जी फळे आपण सालासकट खातो
In reply to मुळात जी फळे आपण सालासकट खातो by सुबोध खरे
धन्यवाद
गुन्हेगारीचे मोजमाप
In reply to गुन्हेगारीचे मोजमाप by नमकिन
हा विशय
In reply to गुन्हेगारीचे मोजमाप by नमकिन
खापर का फोडताय ?
In reply to खापर का फोडताय ? by चौकस२१२
फाडू
In reply to फाडू by नमकिन
बरोबर आहे.
In reply to बरोबर आहे. by Rajesh188
11 मार्च रोजी जागतिक आरोग्य
In reply to 11 मार्च रोजी जागतिक आरोग्य by सुबोध खरे
शिफारस
In reply to बरोबर आहे. by Rajesh188
परदेशातून आलेले
In reply to परदेशातून आलेले by नमकिन
जागतिक आरोग्य संघटनेने इतके
In reply to जागतिक आरोग्य संघटनेने इतके by सुबोध खरे
जागतिक आरोग्य संघटना.
In reply to जागतिक आरोग्य संघटना. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
या सगळ्यातलं आंतरराष्ट्रीय
In reply to जागतिक आरोग्य संघटनेने इतके by सुबोध खरे
मस्त संधी आहे राजकारण खेळण्याची
In reply to मस्त संधी आहे राजकारण खेळण्याची by चौकस२१२
GDP 1.3% ने कमी
In reply to फाडू by नमकिन
जागतिक कट!
रोगप्रतिकारशक्ती वाढवावी
In reply to रोगप्रतिकारशक्ती वाढवावी by वामन देशमुख
आपल्या आहारात भाज्या फळे सुका
डॉ रायचौधरी .....
In reply to डॉ रायचौधरी ..... by चौकटराजा
अतिशयोक्ती
In reply to डॉ रायचौधरी ..... by चौकटराजा
ह्या. मध्ये पण तथ्य असावे
कोरोना19
COVID-19 हे आजाराचे नाव आहे.
In reply to COVID-19 हे आजाराचे नाव आहे. by भुजंग पाटील
आपले म्हणणे बरोबरच आहे.
हे काय आहे ...?
वास न येणे आणि चव न समजणे
२, महिन्यांनी सर्व शांत होईल
Lyzol हे कोरोनासाठी उपयुक्त आहे का?
Lysol is a cationic
दुधाची पिशवी आपण साबण आणि
दुधाची पिशवी आपण साबण आणि
In reply to दुधाची पिशवी आपण साबण आणि by सुबोध खरे
धन्यवाद ...
माहितीपूर्ण लेख
जागतिक आरोग्य संघटना
नाझीकालस्मरण
एकदा कोरोनो होऊन गेला (सौम्य
In reply to एकदा कोरोनो होऊन गेला (सौम्य by उगा काहितरीच
एकदा कोरोनो होऊन गेला (सौम्य
In reply to एकदा कोरोनो होऊन गेला (सौम्य by सुबोध खरे
पण हा विषाणू SARS प्रकारातला
In reply to एकदा कोरोनो होऊन गेला (सौम्य by सुबोध खरे
धन्यवाद डॉक्टर !
In reply to एकदा कोरोनो होऊन गेला (सौम्य by सुबोध खरे
Mystery In Wuhan: Recovered
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Raftaara... :- Luciferसध्या तरी या रोगावर नक्की असे
करोंना विषाणू वर तपमानाचा परिणाम
In reply to करोंना विषाणू वर तपमानाचा परिणाम by Vidyadhar1974
Warm, humid climate linked to
परिचयकाठिन्य = हार्ड इम्युनिटी
In reply to परिचयकाठिन्य = हार्ड इम्युनिटी by गामा पैलवान
आपण म्हणताय ते बरोबर आहे
ह्या धाग्यावरही राजकारण आलं
In reply to ह्या धाग्यावरही राजकारण आलं by तेजस आठवले
बरोबर
ज्येष्ट नागरिक ..
मृत्यूचे कारण
In reply to मृत्यूचे कारण by Rajesh188
विषाणूचं अस्तित्व व लागण यांत फरक आहे
https://m.economictimes.com
In reply to https://m.economictimes.com by सुबोध खरे
उपयुक्त माहिती..
सकारात्मक बातम्या चे प्रमाण जास्त असावे
भारतात रिपोर्ट किती दिवसात येतो
करोना विषाणू COVID-19.
करोनाचा नैसर्गिक प्रतिकार
In reply to करोनाचा नैसर्गिक प्रतिकार by गामा पैलवान
जागतिक स्वच्छ असलेल्या देशातच
इटलीचा अहवाल
In reply to इटलीचा अहवाल by गामा पैलवान
प्रतिपिंडांचे स्वयंजनन
डॉक्टर साहेब.
करोना विषाणू सद्य स्थिती
In reply to करोना विषाणू सद्य स्थिती by सुबोध खरे
माहितीपूर्ण आणि तटस्थ प्रतिसाद.
ही तरुण लोकं घरी आल्यावर
In reply to ही तरुण लोकं घरी आल्यावर by ऋतुराज चित्रे
एक म्हणजे जे लोक पोटासाठी
स्वीडन मध्ये सध्या हाच प्रयोग चालू आहे
दक्षिण कोरियाने लॉकडाऊन नाही
In reply to दक्षिण कोरियाने लॉकडाऊन नाही by मराठी कथालेखक
फक्त वैद्यकीय व्यवस्था,
In reply to फक्त वैद्यकीय व्यवस्था, by सुबोध खरे
आपण वरील प्रतिसादात
भारताला लॉक डाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही
लॉक डाऊन हवंच किंवा लॉकडाऊनला
In reply to लॉक डाऊन हवंच किंवा लॉकडाऊनला by मराठी कथालेखक
सहमत.
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरोबर आणि लॉकडाउन नसले तरी
In reply to लॉक डाऊन हवंच किंवा लॉकडाऊनला by मराठी कथालेखक
आतालॉकडाऊन उघडले कि
लॉकडाऊन उघडले कि
फक्त तरुण आणि सशक्त (प्रत्यक्ष काम करणारे) लोकांना बाहेर फिरायची परवानगी दिली जाईल आणि वृद्ध आणि इतर आजार (फुप्फुस/ हृदयविकार रक्तदाब, मधुमेह) असणाऱ्या लोकांना घरीच राहण्यास सांगितले जाइल. यात लॉकडाऊनला पर्याय नाही असे कुठे तरी आपल्याला आढळले का? यामुळे फक्त तरुण लोकांना हा आजार होइल परंतु त्यांना होणार हा आजार हा सौम्य स्वरूपाचा असून त्यांची मृत्युसंख्या खूप कमी असेल. काही आठवडयांनी या सर्व तरुणांची प्रतिकार शक्ती तयार झाल्यामुळे त्यांना परत संसर्ग झाला तरी त्यांना हा आजार लगेच परत होणार नाही म्हणजेच त्यांचे काम ग्रॅफाइट सारखे असेल.In reply to आतालॉकडाऊन उघडले कि by सुबोध खरे
फक्त तरुण आणि सशक्त
पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट ४
अमेरिकेत काय घडल
ज्यांना लक्षण दिसत नाहीत आणि
गेली अनेक वर्षे लसीचा शोध
In reply to गेली अनेक वर्षे लसीचा शोध by चौथा कोनाडा
खरंय...
In reply to गेली अनेक वर्षे लसीचा शोध by चौथा कोनाडा
रोचक,
In reply to रोचक, by माहितगार
* (स्वगतः) रोचक पेक्षा