मिपा श्रीगणेश लेखमाला २०१९
नमस्कार मिपाकरहो,
सध्या आषाढ सुरू आहे मंडळी. भागवत भक्तीचा महामूर ओघ विठ्ठलाचरणी पर्जन्यराजाच्या साथीने लोटतो आहे. बघता बघता, क्षणात ऊन तर क्षणात पावसाचा खेळ खेळत, फुला-पानांची नक्षी सजवत, आसमंतात रंग भरत श्रावण हजर होईल! गणरायाच्या आगमनाची तयारी समस्त चराचरात सुरू होईल. सगळ्या सृष्टीला त्याच्या आगमनाचे वेध लागतील. मग मिपा मागे कसं राहील? सालाबादप्रमाणे मिपा आणि मिपाकरसुद्धा गजाननाच्या आगमनाची वाट बघणार, त्याच्या स्वागताची तयारी करणार आणि ह्या स्वागतात आणखी रंग भरणार ती मिपावर गणेशोत्सवानिमित्त साजरी होणारी श्रीगणेश लेखमाला. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांच्या अधिपतीचं ह्याहून उत्तम स्वागत तरी कोणतं?
तर मंडळी, हे स्वागत दणक्यात करण्यासाठी तुमच्या सहकार्याची, सहभागाची गरज आहे. मागील काही वर्षं आपण श्रीगणेश लेखमालेसाठी काही एक ठरावीक विषय देऊन लेख मागवले होते. ह्या वर्षी आपण कोणत्याही विषयाचं बंधन ठेवलेलं नाही. तुम्हा सर्वांना आवडीच्या विषयावर लेखन करण्याची सस्नेह विनंती आहे. लेख, ललितं, कविता, बाप्पाच्या नैवेद्याच्या आणि सणासुदीला चालणाऱ्या इतर पाककृती, आठवणी, व्यक्तिचित्रणं, भटकंतीची वर्णनं... लिहायला खूप काही आहे, तुम्ही सगळ्यांनी आपल्या घरचं कार्य समजून मनावर घ्यायचं आहे!
साहित्य पाठवताना एक छोटीशी काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे, श्रीगणेश लेखमालेसाठी पाठवलेलं साहित्य यापूर्वी कोणत्याही छापील अथवा ई-स्वरूपात कोणत्याही संकेतस्थळावर, वैयक्तिक ब्लॉगवर, कोणत्याही समाजमाध्यमात प्रकाशित झालेलं नसावं.
मग सरसावताय ना कीबोर्ड? कारण, 'जे जे आपणासी ठावे| ते ते इतरांसी सांगावे| शहाणे करुनी सोडावे| सकळ जन|'
तेव्हा होऊ द्यात श्रीगणेशा! बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी करायला सुरुवात करू या.
गणपतीबाप्पा मोरया!!
***
कृपया आपले लेख दि. ०७-०८-२०१९पर्यंत ‘साहित्य संपादक’ या आयडीला व्यनि करून पाठवावेत,
किंवा
sahityasampadak.mipa@gmail.com या पत्त्यावर ईमेलने पाठवावेत.
काही प्रश्न, शंका असल्यास प्रतिसादांत जरूर विचारा.
टीप : आलेल्या साहित्यापैकी श्रीगणेश लेखमालेसाठी निवडलेले लेख प्रकाशित करून झाल्यानंतर जे अप्रकाशित लेख आणि इतर साहित्य प्रशासनाकडे असेल, ते काही कालावधीनंतर प्रशासनाकडून प्रकाशित केलं जाईल अथवा सदस्य स्वत: प्रकाशित करू शकतील.
धन्यवाद,
साहित्य संपादक,
मिसळपाव प्रशासन.
वाचने
24441
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
अरे वाह...!
बाप्पा मोरया!
In reply to बाप्पा मोरया! by यशोधरा
+1
व्वा...!!!
In reply to व्वा...!!! by प्रचेतस
तुमच्याकडून पण एक उत्तम लेख
आमच्या गुरुदेवांच्या (अव)कृपेने स्वतंत्रपणे एखाद्या विषयावर काही
ज्याने कुणी हे चित्र बनवलंय
In reply to ज्याने कुणी हे चित्र बनवलंय by खिलजि
अभ्याच असणार दुसर कोण
अभ्या शेट , क्या बात है ...
सुंदर चित्र
वाह, पर्वणी आहे. वाट बघतेय.
किती लेख आलेत ?
श्रीगणेशा
गलेमा सुपरहीट होण्यासाठी
शब्दसंख्येवर मर्यादा आहे का?
In reply to शब्दसंख्येवर मर्यादा आहे का? by सुधीर कांदळकर
साहित्य संपादक सांगतीलच.
लैच शांत शांत धागा पूमिराना
In reply to लैच शांत शांत धागा पूमिराना by महासंग्राम
अरे, एैसा मत समझो, सब
फक्त १ महिना बाकी ....
फक्त ३० दिवस बाकी बाप्पा आणि
मि.पा. प्रशासनाला विनंती,
मुदतवाढ
पंधरा तारखेपर्यंत मुदत वाढवीत
In reply to पंधरा तारखेपर्यंत मुदत वाढवीत by साहित्य संपादक
मुदतवाढीचा चांगला निर्णय!
In reply to मुदतवाढीचा चांगला निर्णय! by टर्मीनेटर
म्हणजे तुम्ही लिहिणार का? :)
In reply to म्हणजे तुम्ही लिहिणार का? :) by यशोधरा
सुरुवात केली होती, पण
In reply to सुरुवात केली होती, पण by टर्मीनेटर
अरे वा, मस्तच की. येऊदेत
In reply to पंधरा तारखेपर्यंत मुदत वाढवीत by साहित्य संपादक
धन्यवाद!
धन्यवाद साहित्य संपादक !
धन्यवाद