.

पातोळ्या

Primary tabs

गौरीबाई गोवेकर नवीन's picture
गौरीबाई गोवेकर नवीन in पाककृती
9 Jul 2019 - 6:06 pm

मी इथलीच. पूर्वीची गौरीबाई गोवेकर. किती काळ लोटला ईथं येऊन पण काळाच्या ओघात जुन्या खात्या संबंधीत माहितीचं इतकं विस्मरण झालं की ते खातं पुन्हा सुरू करता आलं नाही. म्हणून या दुसऱ्या खात्याची तजवीज केली. खानसहेबांची खिचडी, पाया सूप वगैरे माझ्या पाककृती असतील तुमच्या लक्षात. आतासुद्धा क्षितिजच्या मदतीशिवाय हे शक्य झालं नसतं. असो.

आज बर्याच काळानंतर पुन्हा इथं आले शुभारंभ गोडापासून करते. तर आज पाहूया पातोळ्या. आमच्या गोव्याकडचा खास पदार्थ

साहित्य:

दोन वाट्या तांदळाची बारीक दळलेली पिठी (वासाचो तांदुळ असलो तर छानच. नाहीतर साध्या तांदळाची सुद्धा चालेल)
एक मध्यम आकाराचे तवस (म्हणजे काकडी)
एक वाटी किसलेला किंवा चिरलेला गुळ
दोन चमचे साजुक तूप
दोन चमचे खसखस किंवा तीळ
चिमूटभर मीठ
सहा ते सात हळादीच्या झाडाची पाने. (मिळातात मार्केटात. मी घरीच लावली आहे. आता पावसात येतात पानं )

कृती:

काकडी धूवून साल काढून उभी दोन भागात चिरावी. आतला गर बियांसकट काढून टाकावा मग बारीक खिसणीने ती खिसावी. त्या खिसात चिमुटभर मीठ
कालवून दहा मिनिटे ठेवावे. खिसाला पाणी सुटेल त्यात दोन चमचे साजूक तूप आणि चिरलेला गूळ घालावा. गुळ विरघळला की खसखस/तीळ घालावे. मग हळूहळू तांदुळाची पिठी घालून मळावे. साधारण चपातीच्या पीठापेक्षा सैल पाहिजे.

स्टीमर/ मोदकपात्र /पातेलं+चाळणी या पैकी काहीही पाणी घालून गॅसवर चढवावी वाफ येऊ लागली की घूवून घेतलेल्या हळदीच्या पानाच्या अर्ध्या भागावर तुपाचा हात लावावा व वरील पिठाने पानावर एक ईंच जाडीचा थर देऊन ते लिंपावे. उरलेले अर्धे पान दुमडून त्याच्या वर झाकणासारखे घालावे. अशा प्रकारे सर्व पानं लिंपून घ्यावीत व पंधरा ते वीस मिनीटे चांगली वाफवून काढावीत. वाफ जरा जिरली की दुमडलेले पान उघडून पातोळी पानावरून काढून घ्यावी.

आंबट -तिखट कैरीच्या लोणच्याबरोबर किंवा नुसतेच वरून साजूक तूप घालून सर्व्ह करावीत.

(फोटू बद्दल मात्र माफी मागते. मोबाईल आहे पण नीट जमत नाही काढायला. काढला तरी इथे कसा द्यावा हा प्रश्न आहेच. कुणी बनवली तर फोटू डकवा)

गौरीबाई गोवेकर

प्रतिक्रिया

जालिम लोशन's picture

9 Jul 2019 - 9:03 pm | जालिम लोशन

वेगळी पाककृती.

जॉनविक्क's picture

9 Jul 2019 - 11:28 pm | जॉनविक्क

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2019 - 9:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

फार फार फार दिवसांपूर्वी खाल्लेल्या आजीच्या हातच्या पातोळ्या आठवून जीभ हुळहुळली ! :(

गवि's picture

9 Jul 2019 - 9:12 pm | गवि

अगदी.

आजीच आठवली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2019 - 9:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
गौरीबाई गोवेकर नवीन's picture

11 Jul 2019 - 6:20 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

मी पाने रुंदीच्या बाजूने दुमडते. बाकी असेच

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

11 Jul 2019 - 6:21 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

मी पाने रुंदीच्या बाजूने दुमडते. बाकी असेच

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

11 Jul 2019 - 6:21 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

मी पाने रुंदीच्या बाजूने दुमडते. बाकी असेच

पातोळे, पानग्या ही खास कोंकण गोव्यातली डेलिकसी.

लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या.

पातोळ्यात उतरणारा तो हलका हळदीच्या पानाचा स्वाद आत्ता नाकात दरवळतोय.

धन्यवाद.

Namokar's picture

10 Jul 2019 - 12:18 am | Namokar

छान पाककृती.

जुइ's picture

10 Jul 2019 - 8:21 am | जुइ

इथे हळदीची पाने मिळणे कठीण. केळीची पाने वापरल्याने हवी तशी चव येणार नाही का?

यशोधरा's picture

10 Jul 2019 - 8:35 am | यशोधरा

पातोळ्यांना चव येईल पण हळदीच्या पानांचा सुवास येणार नाही.

जुइ's picture

10 Jul 2019 - 8:41 am | जुइ

धन्यवाद!

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

11 Jul 2019 - 6:17 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

या मध्ये मुख्य हळदीच्या पानांचा जो सुगंध पातोळ्यांना लागतो तोच महत्वाचा. म्हणून हळदीच्या पानांना पर्याय नाही गो. ओली हळद कुंडीत रुजते आणि खूप पाने येतात. लाउन बघ. केळीच्या पानांवर स्वादात फरक पडेल.

यशोधरा's picture

10 Jul 2019 - 8:37 am | यशोधरा

ह्याच पातोळ्या गूळ खोबऱ्याच्या सुद्धा करतात. मोदकासाठी सारण करतात , तसे करून घ्यायचे, बाकी कृती सारखीच.

किसन शिंदे's picture

18 Jul 2019 - 10:04 pm | किसन शिंदे

फोटो पायजे

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

20 Jul 2019 - 3:30 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

आता पावसाळ्यात बरेच वेळा होतील पुन्हा केल्या की देते. तो वर वर दिला आहे बघ.

मस्त. :) माटुंग्याच्या कॅफे मद्रासमध्ये बहुतेक अशासारखा पदार्थ खाल्ला होता. गोडच होता. नाव आठवत नाही.