भोपळ्याची भजी by Namrata's CookBook : ४

Namokar's picture
Namokar in पाककृती
25 Jun 2019 - 12:39 pm

लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
भोपळा
१ वाटी बेसन पीठ (५० ग्रॅ)
२ चमचे तांदळाचे पीठ
दीड चमचे लाल तिखट
१/२ चमचा हळद
१/२ चमचा ओवा
१/२ चमचा जिरे / धने+जिरे पूड
कोथिंबीर (optional)
चवीनुसार मीठ
१/४ चमचा सोडा
तेल
पाणी

क्रमवार पाककृती:
१.भोपळयाच्या साल काढून पातळ चकत्या करुन घ्या
२. एका भांड्यात बेसन पीठ ,तांदळाचे पीठ , ओवा ,जिरे, लाल तिखट,बारीक चिरलेली कोथिंबीर (optonal) एकत्र करुन घ्या .
३. आता थोडे थोडे पाणी घालत मिश्रण एकत्र करुन घ्या (खुप जास्त पातळ नको)
४. आता त्यामध्ये सोडा घाला आणि सोड्यावर १ चमचा मोहन (गरम तेल)घाला ,एकत्र करुन घ्या
५. तळण्यासाठी तेल कढाई मध्ये गरम करायला ठेवा
६. भोपळ्याची एक एक चकती मिश्रणात घालून तेलात सोडा आणि तळून घ्या
मस्त गरम गरम संपवून टाका
IMG-20190625-WA0007.jpg

प्रतिक्रिया

Namokar's picture

25 Jun 2019 - 12:54 pm | Namokar

bhoplyachi bhaji

श्वेता२४'s picture

25 Jun 2019 - 1:02 pm | श्वेता२४

कधी करुन पाहिली नाही. पाकृ छान आहे. हा भोपळा कच्चा घ्यायचाय की पिकलेला?, व्हीडीओ टाकलाय का युट्यूबवर? फोटो दिसत नाही आहे.

हो व्हिडीओ टाकला आहे . नक्की करुन बघा .धन्यवाद :)
चॅनेलची जाहिरात करत आहे असे वटेल म्हणून लिंक दिली नव्हती
https://www.youtube.com/watch?v=G_ODzt6VlaA&t=13s

priya_d's picture

26 Jun 2019 - 10:44 am | priya_d

नम्रता,
पाक कृती छान आहे. करुन बघेन.
फक्त एक गोष्ट निदर्शनास आणाविशी वाटली. व्हिडीओमधे तुम्ही दुधी भोपळ्याच्या चकत्या दाखवल्या आहेत परंतु ईंग्रजी सबटायटल मधे पम्पकीन लिहीले आहे. दुधी भोपळ्याला ईंग्रजीत Bottle Gourd म्हणतात. खुप लोक व्हिडीओ पाहतात म्हणुन सुचवावेसे वाटले. कृपया गैरसमज नसावा ही विनंती. आवडले नसल्यास क्षमस्व!

बदल करेन नक्की .धन्यवाद :)

priya_d's picture

26 Jun 2019 - 10:45 am | priya_d

नम्रता,
पाक कृती छान आहे. करुन बघेन.
फक्त एक गोष्ट निदर्शनास आणाविशी वाटली. व्हिडीओमधे तुम्ही दुधी भोपळ्याच्या चकत्या दाखवल्या आहेत परंतु ईंग्रजी सबटायटल मधे पम्पकीन लिहीले आहे. दुधी भोपळ्याला ईंग्रजीत Bottle Gourd म्हणतात. खुप लोक व्हिडीओ पाहतात म्हणुन सुचवावेसे वाटले. कृपया गैरसमज नसावा ही विनंती. आवडले नसल्यास क्षमस्व!

Namokar's picture

25 Jun 2019 - 1:17 pm | Namokar

फोटो कसे टाकावेत

श्वेता२४'s picture

25 Jun 2019 - 1:57 pm | श्वेता२४

मिपावर फोटो कसे टाकावेत
हा डॉ.म्हात्रे यांचा लेख वाचून पाहा. मी मोबाईलवरुन पोस्टीमेज या साईट वरुन फोटो टाकते.

Namokar's picture

25 Jun 2019 - 2:51 pm | Namokar

धन्यवाद ...वाचते ...