वैद्यकीय पारदर्शकता

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
22 May 2019 - 10:18 am
गाभा: 

पारदर्शकता सर्वच मानवी व्यवहारात असावी पण काही नातेसंबंधात ती विशेष आवश्यक ठरते. पण तिथे नेमकी विश्वास ठेवण्याची अपेक्षा केली जाते. डॉ० वर विश्वास ठेवला नाहीतर ते दूखावले जातात.

कोणतीही व्यवस्था आमुलाग्र सुधारणे अशक्यप्राय असते, पण ती किंचित जरी सुधारली तरी त्याचे दूरगामी परिणाम खुप असतात.

माझ्या मनात बरेच दिवस खदखदत असलेला विषय असा आहे -

जेव्हा डॉक्टर त्यांचा रुग्ण दीर्घकाळ घेत असलेले औषध जेव्हा अचानक थांबवायला सांगतात तेव्हा त्याची कारणे लेखी देणे बंधनकारक करता येईल का?

यामुळे वैद्यकीय व्यवसायात किंचित का होईना, पारदर्शकता वाढायला मदत होईल असे वाटते.

प्रतिक्रिया

वैद्यकीय क्षेत्रातील पारदर्शकतेबद्दल चर्चा करू तेवढी थोडीच असेल. सुशिक्षित रुग्ण देखील डॉक्टरांना प्रश्न विचारायला घाबरतात. खरेतर डॉक्टरांनी केलेली औषधयोजना रुग्णांना, त्याच्या नातेवाईकांना समजावून सांगणे अपेक्षित असते, आवश्यक तर असतेच. पण साधारणपणे, ' ही गोळी दिवसातून तीन वेळा, ही , दोन वेळा आणि ही फक्त रात्री झोपताना'. असे सांगितले जाते.
सुरु असलेली औषध योजना बदलायची अथवा बंद करायची असल्यास डॉक्टरांनी रुग्णांना, त्याच्या नातेवाईकांना समजावून सांगावेच म्हणजे रुग्णांच्या मनात कोणताही किंतू राहणार नाही

जालिम लोशन's picture

25 May 2019 - 3:36 pm | जालिम लोशन

त्याचे पालन होत नाही.

डॉक्टर सांगतात ते बरोबरच असते. म्हणजे तसे दाखवतो आणि त्यांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. बाहेर पडून काय करायचे ते करतो. वेगळे उपचार/वेगळा डॉ वगैरे. माझ्या जबाबदारीवर.
नातेवाईक हॉस्पिटलात अडमिट असेल तर सरळ सही करून डिस्चार्ज घेतो. वाद टाळतो.

युयुत्सु's picture

26 May 2019 - 11:49 am | युयुत्सु

बाहेर पडून काय करायचे ते करतो. वेगळे उपचार/वेगळा डॉ वगैरे. माझ्या जबाबदारीवर.

डॉ. बदलणे हे हॉटेल बदलण्या इतके सोपे नसते.

उपेक्षित's picture

25 May 2019 - 6:30 pm | उपेक्षित

कसली आलीये पारदर्शकता ? सगळे एकजात फसवणारे आहेत याला झाकाव आन त्याला काढाव इतकेच.

तर्री's picture

28 May 2019 - 7:28 pm | तर्री

इतर व्यवसाय हा इतर व्यवसायांपेक्षा अधिक " भरवशाचा " असावा ही रुग्णांची अपेक्षा असणे काही अवाजवी नाही. तरीही वैद्यकीय व्यवसाय हा इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच आहे. एखाद्या स्थापत्य विशारदाने केलेली चूक ही अनेकांच्या जीवावर कशी बेतू शकते हे आपण काही महिन्या पूर्वीच अनुभवले आहे.

आपल्या व्यवसायाबरोबर येणारी जबाबदारी जो ओळखून वागतो आणि निर्णय घेतो तोच खरा व्यावसायिक ! येथेमिपा किती तरी संगणक अभियंते आहेत. किती जण आपापले कर्तव्य चोख बजावतात ?

जेव्हा डॉक्टर त्यांचा रुग्ण दीर्घकाळ घेत असलेले औषध जेव्हा अचानक थांबवायला सांगतात तेव्हा त्याची कारणे लेखी देणे बंधनकारक करता येईल का?

१. औषध म्हणजे ब्रांड कि त्यातील मूलद्रव्य (API = active Pharma ingredient) ज्याने आजारावर उपचार होतो ?
२. समजा एखाद्या रुग्णास एका प्रतिजैविकाच्या गोळ्या घेण्यास त्रास होतो म्हणून वैद्याने इंजेक्शन दिले तर त्याने गोळ्या थांबवल्या हे लिहून देणे अपेक्षित आहे का ?
३. एक रुग्ण मल्टी विटामिन घेत आहे , आता वैद्याने त्यामध्ये बदल करून फक्त ब जीवनसत्वाच्या गोळ्या दिल्या तर तो ही बदल आहे का ?येथे ही लिहून देणे अपेक्षित आहे का ?
४. समजा एक स्त्री रक्त दाबाच्या गोळ्या हृदय विशारदा कडून घेते आहे , आता तिने आपण गरोदर आहोत असे सांगितले. आता हा बदल लिहून नोंद करणे अति आवश्यक आहे.

डॉ. सहसा तारतम्य पाहून वागतात आणि निर्णय घेतात. असे लिहून बदल करणे हे इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच ह्याही व्यवसायात कठीण आहे. काही वेळा निर्णय काही मिनिटात घ्यावे लागतात. उद्या विमान प्रवासात पायलट कडून प्रत्येक बदल लिहून घ्यायचा ठरले तर जमेल का ? हे थोडे तसेच आहे.

कोणीही ब्यावासायिक जो आपल्या प्रतिष्ठेला जपत असतो तो जसे काही वावगे करत नेही तसेच वैद्यकीय व्यवसायात आहे. काही हपापलेले आहेत हे मान्य आहे
काही आयुर्वेदिक आणि होमिओपथि डॉ. जे एलोपाथिचा उपचार करतात ते मुळा मध्येच चूक आहे. त्यांचे आवशयक ते शिक्षण नसते , फक्त अनुभवातून ते ट्रायल /एरर करत असावेत. हे ही मान्य आहेच.

उपचार थांबवणे लिहून देत नाही असा कोणी डॉक्टर आपल्याला पसंत नसेल तर आपण हवा तसा"टेलर मेड" डॉक्टर मिळेल का ते पाहावे आणि तो पर्यंत आजार बळावेल हे ही ध्यानात ठेवावे.