Skip to main content

[शशक' १९] - आज्जा

[शशक' १९] - आज्जा

Published on बुधवार, 20/02/2019 प्रकाशित मुखपृष्ठ
लहानगा शंकर्‍या आज खुप खुश होता. गणपती विसर्जनाची मिरवणुक त्याच्या बैलगाडीतुन निघणार होती. रात्रभर त्याला गाडी सजवायचेच स्वप्न पडत होते. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठला तर घरात काळजीचे वातावरण दिसले. नेमके कारण त्याला काही कळेना. आज्ज्याला रात्री छातीत दुखत होतं म्हणुन शहरात न्यायचं एवढच त्याला कळालं. तसाच तोंड लटकाउन तो गाडीत बसला . शहरात गेल्यावर ठिकठिकाणी चाललेली मिरवणुकीची तयारी पाहुन त्याला अजुनच कसतरी होत होतं . दवाखान्याच्या खिडकीतुन मिरवणुक पहाताना त्याला त्याचे बैल व गाडी दिसली. गाडी विकली म्हणुन त्याला बापाचा खुप राग आलेला. पण आज्ज्याचा थरथरता हात पाठिवर जानवला त्याने लगेच आज्ज्याला करकचुन मिठी मारली आणि त्याचा राग कुठल्या कुठे पळाला.

याद्या 8301
प्रतिक्रिया 17

+१

छान

अरे वा, छान आहे, आवडली, पैजारबुवा,

जबरा

+१

+१

खूप छान.

आवडली.

+१

+१

आवडली भाऊकता

आवडली भाऊकता

+1

बैलगाडी वरून शाळेत मराठी मध्ये एक गोष्ट वाचलेली आठवली. बैलपोळ्याला गाडीमालक पाटलाच्या पोरांना तालुक्याला सिनेमा बघायला न्यायला नकार देतो, पण नंतर एका जखमी शेतकऱ्यासाठी पोळा असून पण बैल गाडीला जुंपतो. असो, तुमची कथा खूप छान आहे.

+१