[शशक' १९] - आज्जा

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
20 Feb 2019 - 8:42 pm

लहानगा शंकर्‍या आज खुप खुश होता. गणपती विसर्जनाची मिरवणुक त्याच्या बैलगाडीतुन निघणार होती. रात्रभर त्याला गाडी सजवायचेच स्वप्न पडत होते.
दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठला तर घरात काळजीचे वातावरण दिसले. नेमके कारण त्याला काही कळेना. आज्ज्याला रात्री छातीत दुखत होतं म्हणुन शहरात न्यायचं एवढच त्याला कळालं. तसाच तोंड लटकाउन तो गाडीत बसला . शहरात गेल्यावर ठिकठिकाणी चाललेली मिरवणुकीची तयारी पाहुन त्याला अजुनच कसतरी होत होतं . दवाखान्याच्या खिडकीतुन मिरवणुक पहाताना त्याला त्याचे बैल व गाडी दिसली. गाडी विकली म्हणुन त्याला बापाचा खुप राग आलेला. पण आज्ज्याचा थरथरता हात पाठिवर जानवला त्याने लगेच आज्ज्याला करकचुन मिठी मारली आणि त्याचा राग कुठल्या कुठे पळाला.

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

21 Feb 2019 - 10:50 am | जव्हेरगंज

भारी!
+१

सिद्धार्थ ४'s picture

21 Feb 2019 - 11:15 am | सिद्धार्थ ४

+१

विनिता००२'s picture

21 Feb 2019 - 12:03 pm | विनिता००२

सुख आणि दु:ख :)

+१

सविता००१'s picture

21 Feb 2019 - 4:19 pm | सविता००१

छान

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Feb 2019 - 4:24 pm | ज्ञानोबाचे पैजार

अरे वा, छान आहे, आवडली,
पैजारबुवा,

खिलजि's picture

21 Feb 2019 - 8:14 pm | खिलजि

जबरा

कोण's picture

21 Feb 2019 - 9:38 pm | कोण

+१

राजाभाउ's picture

22 Feb 2019 - 10:07 am | राजाभाउ

+१

यशोधरा's picture

22 Feb 2019 - 11:08 am | यशोधरा

खूप छान.

एकविरा's picture

22 Feb 2019 - 12:37 pm | एकविरा

आवडली.

स्वधर्म's picture

22 Feb 2019 - 2:06 pm | स्वधर्म

+१

दीपकजी's picture

22 Feb 2019 - 3:38 pm | दीपकजी

+१

ज्योति अळवणी's picture

23 Feb 2019 - 11:05 am | ज्योति अळवणी

आवडली भाऊकता

ज्योति अळवणी's picture

23 Feb 2019 - 11:05 am | ज्योति अळवणी

आवडली भाऊकता

रीडर's picture

23 Feb 2019 - 11:59 pm | रीडर

+1

पैलवान's picture

24 Feb 2019 - 10:40 am | पैलवान

बैलगाडी वरून शाळेत मराठी मध्ये एक गोष्ट वाचलेली आठवली.
बैलपोळ्याला गाडीमालक पाटलाच्या पोरांना तालुक्याला सिनेमा बघायला न्यायला नकार देतो, पण नंतर एका जखमी शेतकऱ्यासाठी पोळा असून पण बैल गाडीला जुंपतो.

असो, तुमची कथा खूप छान आहे.

भुमन्यु's picture

14 Mar 2019 - 5:04 pm | भुमन्यु

+१