Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वामन देशमुख on Sat, 02/02/2019 - 06:45
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल. अर्थसंकल्पातील काही ठळक योजना: महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार या सुखांनो या! . एक प्रकट स्वगत: मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला. म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
  • Log in or register to post comments
  • 542115 views

प्रतिक्रिया

Submitted by व्ही. डी. सी. on Sat, 02/09/2019 - 12:32

In reply to राफेल मध्ये घोटाळा झाला कि by डँबिस००७

Permalink

डँबिस

जनतेने केली ना कारवाई, २०१४ ला सत्तेतून उचलून बाहेर केले! भाजपचे सुद्धा तसेच व्हावे असे तुम्हाला वाटत आहे काय? चौकशी व्हावी एवढी माफक अपेक्षा मतदार जनता ठेऊ शकत नाही काय?
  • Log in or register to post comments

Submitted by Blackcat (verified= न पडताळणी केलेला) on Sat, 02/09/2019 - 12:53

In reply to राफेल मध्ये घोटाळा झाला कि by डँबिस००७

Permalink

छान

त्यांच्यवर मोदीना कारवाई करायला सांगा.
  • Log in or register to post comments

Submitted by बाप्पू on Sat, 02/09/2019 - 13:41

In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

व्हीडी सी आणि काळी मांजर.

व्हीडी सी आणि काळी मांजर. राफेल मध्ये जे लोक चौकशी ची मागणी करत आहेत त्यांनी आधी सशक्त पुरावे आणावेत आणि खुशाल चौकशी ची मागणी करावी. उगाच तुम्हाला वाटते किंवा तुमच्या युवराजांना वाटते म्हणून उठसुठ प्रत्येक गोष्टीची मोदी जी चौकशी करत बसले तर सरकार कोण चालवणार?? मला देखील वाटते कि तुम्ही दोघे खुनी दरोडेखोर आणि बलात्कारी आणि अतिरेकी आहात. उद्यापासून मी हि धिंडोरा पिटत बसतो आणि तुमच्या अटकेची किंवा चौकशी ची मागणी करतो... चालेल का? BTW युवराज्यांचा विषय निघाला म्हणून आठवले.. नेमका किती कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला त्याचा आकडा एकदाचा फायनल करा म्हणावं... प्रत्येक सभेत वेगवेगळा आकडा सांगतात. काय ते फायनल करा एकदाचा. #एक मे से दो बच्चा.
  • Log in or register to post comments

Submitted by व्ही. डी. सी. on Sat, 02/09/2019 - 14:15

In reply to व्हीडी सी आणि काळी मांजर. by बाप्पू

Permalink

बाप्पू काय हे???

अजून एक अंधभक्त, नमोरुग्ण!!! कशाला घाबरता? होऊ दे ना 'दूध का दूध और पानी का पानी' कर नाही त्याला डर कशाला? त्या राहुल गांधींचे काही बोलू नका, सुज्ञ मतदारांची सुद्धा चौकशी व्हावी अशी इच्छा आहे ! बाकी, अतार्किक विचार व तर्कटे, अलविदा!!!
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रम्प on Sat, 02/09/2019 - 15:10

In reply to बाप्पू काय हे??? by व्ही. डी. सी.

Permalink

तुम्ही मोदीभक्तावर जिभेचा

तुम्ही मोदीभक्तावर जिभेचा पट्टा चालवताय आणि खान्ग्रेस गुलामाना साथ देताय , त्यामुळे भक्त मंडळी तुम्हाला गुलाम समजत आहेत . ममो सारखे तुम्ही पण रेनकोट घालून आंघोळ करायला शिकले क़ाय ?
  • Log in or register to post comments

Submitted by व्ही. डी. सी. on Sat, 02/09/2019 - 15:28

In reply to तुम्ही मोदीभक्तावर जिभेचा by ट्रम्प

Permalink

ट्रम्प

काँग्रेसला, भाजपाला साथ देण्याचा प्रश्नच नाही! गुलाम तर मोदीभक्त आहेत! यांची गुलामीतून सुटका होणे अशक्य कोटीतील गोष्ट होऊन बसली आहे! मोदीभक्त हे गुलाम आहेत हे त्यांना जोपर्यंत माहीत होत नाही तो पर्यंत ते मोदी विराधात बंड करणार नाहीत, हेच खरे! नमो सारखे तुम्ही पण रेनकोट घालून आंघोळ करायला शिकले क़ाय ?
  • Log in or register to post comments

Submitted by lakhu risbud on Mon, 02/11/2019 - 10:15

In reply to ट्रम्प by व्ही. डी. सी.

Permalink

२०१९ च्या निकालानंतर हे

२०१९ च्या निकालानंतर हे थुंकलेले जाहीररीत्या गिळण्याची तयारी असू द्या म्हणजे झाले .
  • Log in or register to post comments

Submitted by बाप्पू on Sat, 02/09/2019 - 16:26

In reply to बाप्पू काय हे??? by व्ही. डी. सी.

Permalink

च्या मारी.. म्हणजे तुमच्या

च्या मारी.. म्हणजे तुमच्या मताला खोडून काढणारे सर्व अंध भक्त.. आणि तुम्ही काय??? डोळस गुलाम?? मी फक्त एवढेच म्हणालो कि चौकशी करण्याआधी काहीतरी पुरावे द्या ना.. का उठसुठ प्रत्येक गोष्टी वर समिती बसवायची आणि तुम्हाला वाटते म्हणून चौकशी करायची?? पुरावे असतील तर खुशाल करा चौकशी आणि खेचा कोर्टात त्यांना... तोंड दिलेय म्हनुन उठसुठ काहीही बडबड करायाची आणि नंतर शेपट्या आत घालायच्या. BTW डिट्टो असेच करणारा खुजलीवाल तुमच्यासारख्या लोकांना cxxx बनवून दिल्लीचा मुख्यमंत्री झाला. माझ्याकडे शिला दीक्षित, वद्रा यांच्याविरुद्ध सर्व पुरावे आहेत.. इन सबकी जांच होनी चाहिये... असे म्हणणारा हरिश्चन्द्र आज त्याच शीलाच्या भोवती "शीला.... शिला कि.... " गाण्यावर पिंगा घालावा तसे काँग्रेस च्या मागे पुढे फिरत आहे. तुमच्यासारखे मोदी द्वेष करणारे लोक पुरावे मागितले कि व्हाट्सअँप फॉरवर्ड आणि झेरॉक्स च्या दुकानातली रद्दी ची कागदाचे गट्ठे (खुजलीवाल फेम ) दाखवून इंप्रेशन मारतात आणि कोर्टात न जाता इथे तिथे आपल्या नसलेली अक्कल पाजळून मीडिया समोर शायनींग मारतात..
  • Log in or register to post comments

Submitted by व्ही. डी. सी. on Sat, 02/09/2019 - 17:05

In reply to च्या मारी.. म्हणजे तुमच्या by बाप्पू

Permalink

बाप्पू, सुधरायचे नाही असे ठरविले आहे काय?

स्वतः ला वकील समजू लागला कि काय? त्या मोदीने वात्रट बकबक बंद करावी आणि जेसीपीला ताबडतोब चौकशीचे आदेश द्यावेत हि सर्वसामान्यांची माफक अपेक्षा पूर्ण करावी, नाहीतर मतदार 'दाल में कुछ काला हैं या पुरी दाल हि काली हैं' या संभ्रमात आहे! चौकशीला सामोरा गेला तरच लोकांचा विश्वास बसेल, अन्यथा काँग्रेस सारखी गत झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवावे! जनतेला मूर्ख समजतो काय? नको तिथे तोंड उघडतो आणि पाहिजे तिथे मूग गिळून बसतो!!!
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रम्प on Sat, 02/09/2019 - 17:17

In reply to बाप्पू, सुधरायचे नाही असे ठरविले आहे काय? by व्ही. डी. सी.

Permalink

व्ही डी सी !!!!

भाजपला सवय आहे हो विरोधात बसन्याची , प्रॉब्लम तुमच्या राफेल गाँधीचा आहे . रिमोट कंट्रोल द्वारे सत्ता चालवायची सवय लागल्या मुळे तुमच्या बावळट चा तीळपापड़ होतोय . आम्ही सारखे ' तुमचे नेते रागा उर्फ राफेल ' असाच उल्लेख करणार , कारण तुम्ही सुद्धा खान्ग्रेसी गुलामा सारखे डोळ्या वर झापड़ लावून खान्ग्रेस नेत्यांची ची निष्क्रियते वर डोळेझाक करत आहात .
  • Log in or register to post comments

Submitted by व्ही. डी. सी. on Sat, 02/09/2019 - 17:42

In reply to व्ही डी सी !!!! by ट्रम्प

Permalink

ट्रम्प

काँगेसचे तुणतुणे माझ्यासमोर वाजवून काय उपयोग होणार आहे काय? एखाद्या काँगेस च्या माणसाला विचारून असल्या प्रश्नांची उत्तरे मिळावा!!!
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रम्प on Sat, 02/09/2019 - 17:47

In reply to ट्रम्प by व्ही. डी. सी.

Permalink

मग तुम्ही !!!

भाजप समर्थकानां मतिमंद , मनोरुग्न का म्हणताय ? तुम्हाला दोन्ही बाजूने समजून घ्यायची सवय आहे का ? = ) = )
  • Log in or register to post comments

Submitted by व्ही. डी. सी. on Sat, 02/09/2019 - 18:11

In reply to मग तुम्ही !!! by ट्रम्प

Permalink

ट्रम्प

काँगेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची विचारसरणी अमान्य आहे! जो पक्ष सत्तेत आहे त्या पक्षावर आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या लोकांवर टीका हि होणारच, हे ओघानेच आले! घोषणापत्रात (संकल्प पत्र) दिलेली आश्वासने पाळली नाहीत, कामे न करताच कामे केल्याचे निरर्थक दावे केल्यावर, विकास कामांचे, जीडीपी चे खोटे आकडे फुगवून सांगितल्यावर, नेत्यांनी विकृत वक्तव्ये करून समाजात द्वेष भावना निर्माण केल्यावर, 'महागाई कमी कर असे सांगून सत्तेत आलेले महागाईवर नियंत्रण आणण्याचे सोडून अधिकच महागाई करण्यास कारणीभूत ठरल्यावर, 'माझा तो बाबू आणि दुसर्याचे ते कार्टे' असे नेते व कार्यकर्ते वागू लागल्यावर, नुसती 'मन कि बात' करून इतरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यावर मतदारांचा संताप का अनावर होणार नाही?
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Sat, 02/09/2019 - 17:48

In reply to ट्रम्प by व्ही. डी. सी.

Permalink

काँगेसचे तुणतुणे माझ्यासमोर

काँगेसचे तुणतुणे माझ्यासमोर वाजवून काय उपयोग होणार आहे काय? एखाद्या काँगेस च्या माणसाला विचारून असल्या प्रश्नांची उत्तरे मिळावा!!! मग काय फक्त भाजपाचे तुणतुणे तुमच्या समोर वाजवावे का ? नाही म्हणजे, तुम्ही भाजपाच्या तुणतुण्याला, तुम्हाला अधिकार असल्या प्रमाणे उत्तरे देत होतात ? का अंगावर ओढुन घ्यायची सवय आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by व्ही. डी. सी. on Sat, 02/09/2019 - 18:30

In reply to काँगेसचे तुणतुणे माझ्यासमोर by डँबिस००७

Permalink

डँबिस

कोणाचेही तुणतुणे ऐकण्याची अजिबात इच्छा नाही. सत्ताधारी पक्षाला मतदारांचे प्रश्न ऐकावेच लागणार! टीका का होते आहे, याचाही विचार करावा लागणार. नुसते 'जुमले बाजी' करून प्रश्न सुटत नसतात. सत्तेचा माज हा सत्ताधाऱयांना सर्वात जास्त घातक ठरतो, खोटे बोलून दिवस ढकलण्याची वृत्ती सुद्धा घातक ठरू शकते, हा आजपर्यंतचा इतिहास आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Sat, 02/09/2019 - 18:18

In reply to ट्रम्प by व्ही. डी. सी.

Permalink

शांत गदाधारी भीम (व्हिडिसी)

अहो ऐसा त्रागा करून क़ाय मिळणार? उलट रक्तदाब वाढवून घ्याल आपला! अजुन तुम्हाला भाजपा 2019 मधे सत्तेवर येणार आहे ते बघायचे आहे
  • Log in or register to post comments

Submitted by व्ही. डी. सी. on Sat, 02/09/2019 - 18:39

In reply to शांत गदाधारी भीम (व्हिडिसी) by भंकस बाबा

Permalink

भंकस

दुसऱ्याच्या रक्तदाबाची चिंता नको, स्वतः चा ठीक आहे कि नाही हे जरूर तपासून घ्यावा. दिवास्वप्ने पाहायला कोणाचीही हरकत असण्याचे कारण नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत बिनधास्त भ्रमात रहा, तुमची अवस्था वाजपेयींच्या 'इंडिया शायनिंग' सारखी झाल्यास स्वतः लाच शिव्या देऊ नका म्हणजे कमविले!!!
  • Log in or register to post comments

Submitted by lakhu risbud on Mon, 02/11/2019 - 10:21

In reply to बाप्पू, सुधरायचे नाही असे ठरविले आहे काय? by व्ही. डी. सी.

Permalink

च्यायला !! पहिल्यांदाच मोगा

च्यायला !! पहिल्यांदाच मोगा च्या गरळ ओकण्याच्या एकाधिकारशाही ला तितक्याच ताकदीचे आव्हान मिळत आहे. या व्ही. डी. सी. मुळे साक्षात मोगाखान फिका वाटायला लागलाय. मिपा ची प्रगती होत आहे . . . . . . . . . . . . . . .. . . .. . . . . . . किमान गरळ ओकण्या बद्दल तरी. संपादक, शशक सारखी "गरळ ओकण्या" साठी वेगळा विभाग तयार करावा.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Sat, 02/09/2019 - 15:59

Permalink

ह्म्म्म्म

श्री श्री श्री व्ही सी डी आणी श्री श्री श्री ब्लॅककॅट हे मे २०१९ नंतरही ईथेच असतील हीच एक भाबडी आशा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by व्ही. डी. सी. on Sat, 02/09/2019 - 16:04

In reply to ह्म्म्म्म by इरसाल

Permalink

इरसाल

Wait and watch!
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Sat, 02/09/2019 - 20:11

In reply to ह्म्म्म्म by इरसाल

Permalink

श्री श्री श्री ब्लॅककॅट

श्री श्री श्री ब्लॅककॅट ह्यांची मी गॅरेंटी घेतो, गेले अनेकानेक जन्म त्यांनी काँग्रेसच्या घरी पाणी भरण्यात वाया घालवले. २०१४ च्या वेळी काँग्रेसचा जो सुपडा साफ झाला तो महा आघातही ह्यांनी स्वतःच्या अनेक "जान / जीवांची" ची कुर्बानी देऊन पचवला !! आता श्री श्री श्री ब्लॅककॅट यांना पप्पु मध्ये एक नविन आशा पालवली आहे की येत्या २५ - ३० वर्षांत पप्पु व त्यांचे देश द्रोही नेते मंडळी पाकिस्तान , चीन सारख्या दुश्मन देशांच्या सहाय्याने भ्रष्ट काँग्रेस पक्षाला परत सत्येत आणेल आणी मग सगळीकडे भ्रष्टाचार माजुन आलबेल होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Sat, 02/09/2019 - 16:55

Permalink

Till 2044 ,

Till 2044 , BJP will rule for next 50 Years. They deserve it !!
  • Log in or register to post comments

Submitted by व्ही. डी. सी. on Sat, 02/09/2019 - 17:10

In reply to Till 2044 , by डँबिस००७

Permalink

डँबिस

दिवास्वप्ने पहा !!! कोण अडवतोय ? ३०४४ लिहा! हा.. हा.. हा..
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रम्प on Sat, 02/09/2019 - 17:09

Permalink

ट्विटर दोनच ओळीच्या जोक ने

ट्विटर दोनच ओळीच्या जोक ने खुप धुमाकुळ घातला आहे !! ए शिवी देवू नकोस !!! ए T M C !!!
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Sat, 02/09/2019 - 17:44

Permalink

ममता बॅनर्जीच्या तृणमुल

ममता बॅनर्जीच्या तृणमुल काँग्रेस सरकारचे स्टींग ऑपरेशन व बाकिचे कागदपत्र शोधुन आता बातम्यात दाखवत आहेत. सिबीआय वर आ रोप लावणार्या ममता बॅनर्जीचे नक्की बारा वाजणार आहे ! ममता बॅनर्जीच्या तृणमुल काँग्रेस सरकारचे व पोलिस अधिकार्यांचे डायरेक्ट संबंध ह्या चीटफंड घोटाळ्यात सिद्ध करणारे कागदोपत्री पुरावे सिबीआय व ईतर सरकारी चौकशी एजंसीच्या हाती लागले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Sat, 02/09/2019 - 18:02

Permalink

देशाचे दामाद श्री रॉबर्ट

देशाचे दामाद श्री रॉबर्ट वाड्राजीचे भारतातले पराक्रम कमी की काय म्हणुन आता लंडनच्या पॉश एरीयात ९-१० फ्लॅट असल्याच समोर आलेल आहे. त्या बद्दलच्या बातम्या काही मोजक्या टिव्ही वाहीन्या काल परवा दाखवत होत्या. काल भाजपाच्या प्रेस कॉन्फेरेंस मध्ये अजुन खुलासा आलेला आहे. सर्व बाजुंनी गांधी परीवारावर शिकंजा आवळला जात आहे. ह्या सर्व गोंधळात श्रीमती प्रियांका गांधी वाड्रा यांनी हे सर्व आरोप फेटाळुन लावत त्या रॉबर्ट वाड्राजीच्या मागे खंबीर पणे उभ्या आहेत अस वृत्त वाहीन्याना सांगीतल आहे. पाकिस्तानात बेनाझीर भुत्तो नावाच्या पाकिस्तानच्या पंत प्रधान होऊन गेल्या ! त्यांचे पती १०% फेम असिफ अलि झरदारी यांची ह्या निमित्त्याने आठवण झाली !!
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Sat, 02/09/2019 - 18:17

Permalink

मला काय वाटतं

काही मोजक्या लोकांनी आपल्या घरच्या, ऑफीसच्या व समाजाच्या (कौंटुंबिक) कलहाचा राग येथील गरीब मिपाकरांवर काढु नये. (आठवा मुन्नाभाई आणी त्यातला नवाजुद्दीन आणी सुनील दत्तचा रेस्टे. सीन.) काही नवीन मेंढरांच्या मेंबरांच्या जिभेवर तर अक्षरशः रणचंडिका धारदार शब्दशस्रास्रांच मॉल उघडुन बसलीय....... घाबल्लो ना मी !!!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by व्ही. डी. सी. on Sat, 02/09/2019 - 18:59

In reply to मला काय वाटतं by इरसाल

Permalink

इरसाल

हा घरचा, ऑफिसचा किंवा समाजाच्या (कौंटुंबिक) कलहाचा राग नाही, हा राग आहे भ्रष्ट सत्ताधार्यावरचा, लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या, संविधानाला, संविधानिक संस्थाना मोडीत काढायला निघालेल्या भाजप नेत्यांवरचा, सत्तेच्या माजाने निर्ढावलेल्या भाजप पक्षावरचा, मोदी म्हणेल तेच खरे अशी भावना झालेल्या 'मेंढरांच्या' वरचा, मोदीने *ला गुळ आहे असे सांगितल्यावर तो गुळच आहे असे मागचा पुढचा विचार न करता छातीठोकपणे सांगणाऱ्या मंद भक्तांविरोधाचा, असा राग असू नये का?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 02/09/2019 - 19:12

In reply to इरसाल by व्ही. डी. सी.

Permalink

तुम्ही स्वतःचा पक्ष काढा कि.

तुम्ही स्वतःचा पक्ष काढा कि. सर्वसामान्य जनता म्हणवणारे येतील कि तुमच्या मागे. आणा निवडून चाळीस पन्नास खासदार मग विचारा जाब सत्ताधार्यांना हा का ना का उगाच इथे मिपावर त्रागा करून काय फायदा वाळूत मुतलं ना फेस ना पाणी
  • Log in or register to post comments

Submitted by व्ही. डी. सी. on Sat, 02/09/2019 - 19:25

In reply to तुम्ही स्वतःचा पक्ष काढा कि. by सुबोध खरे

Permalink

सुबोध खरे

स्वतः चा पक्ष काढणे, हे यावरचे उत्तर नाही! निर्ढावलेल्या सत्ताधाऱयांना ताळ्यावर आणण्याचे काम हे मतदारच करीत असतात! मतदार सुजाण असतो, कधी कोणाला सत्तेवर बसवायचे आणि कधी कोणाचा सत्तेचा आलेला माज उतरवायचा, हे त्यांना चांगले ठाऊक असते! जनतेला काही कालावधीपुरते मूर्ख बनविता येते, कायमस्वरूपी नव्हे!!!
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रम्प on Sat, 02/09/2019 - 19:33

In reply to सुबोध खरे by व्ही. डी. सी.

Permalink

बरोबर हे झाल मतदारांचे !!!

बरोबर हे झाल मतदारांचे !!! मग तुमचे क़ाय ?
  • Log in or register to post comments

Submitted by व्ही. डी. सी. on Sat, 02/09/2019 - 20:09

In reply to बरोबर हे झाल मतदारांचे !!! by ट्रम्प

Permalink

ट्रम्प

मी सुद्धा त्या मतदारांपैकी एक मतदारच असणार आहे, एवढे सुद्धा कळत नाही काय? कि 'वेड्याचे सोंग घेऊन पेडगावला जायचे'?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 02/09/2019 - 19:36

In reply to सुबोध खरे by व्ही. डी. सी.

Permalink

जनतेला काही कालावधीपुरते

जनतेला काही कालावधीपुरते मूर्ख बनविता येते काय सांगताय? मग इतक्या पिढ्या गेल्या तरी पंडित नेहरूंचे वंशज (लायकी नसताना) इथे सत्तेवर का आहेत?
  • Log in or register to post comments

Submitted by व्ही. डी. सी. on Sat, 02/09/2019 - 20:12

In reply to जनतेला काही कालावधीपुरते by सुबोध खरे

Permalink

सुबोध खरे

ते काँग्रेस वाल्यांना जाऊन विचार!!!
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Sat, 02/09/2019 - 20:00

In reply to सुबोध खरे by व्ही. डी. सी.

Permalink

व्ही. डी. सी.

व्ही. डी. सी. स्वतः चा पक्ष काढणे, हे यावरचे उत्तर नाही! निर्ढावलेल्या सत्ताधाऱयांना ताळ्यावर आणण्याचे काम हे मतदारच करीत असतात! मतदार सुजाण असतो, कधी कोणाला सत्तेवर बसवायचे आणि कधी कोणाचा सत्तेचा आलेला माज उतरवायचा, हे त्यांना चांगले ठाऊक असते! जनतेला काही कालावधीपुरते मूर्ख बनविता येते, कायमस्वरूपी नव्हे!!! पुर्ण मि पा ला काय मुर्खात काढताय काय ? तुमच्या मते दोन्ही काँग्रेस व भा ज पा नालायक आहेत मग मतदारापुढे पर्याय काय आहे ? निर्ढावलेल्या सत्ताधाऱयांना ताळ्यावर आणण्याचे काम हे मतदारच कसे काय करीत असतात ? मतदाराच्या हातात निवडणुकीत उ भ्या असलेल्या उमेदवारांपैकी एकालाच मत देता येते. निवडणुकीत उभा नसलेला लायक उमेदवाराला मत देता येत नाही. अगदी नो टा वापरुन तुम्ही झालेल मतदान बाद करुन फेर मतदान करवु शकता पण जोर जबरदस्तीने तुम्हाला अभिप्रेत असलेला लायक उमेदवार उभा न करता निवडुन आणू शकत नाही. राहता राहीला अपक्ष उमेदवाराचा पर्याय ! तुम्ही निवडलेला एक अपक्ष उमेदवार कसा काय भक्कम सरकार देणार ? डॉ साहेबांनी सागीतल्या प्रमाणे निवडणुकीत उभ राहुन नविन पायंडा पाडाच ! अन्यथा हे सर्व तुमच थोतांड आहे हे मान्य करा !!
  • Log in or register to post comments

Submitted by व्ही. डी. सी. on Sat, 02/09/2019 - 21:06

In reply to व्ही. डी. सी. by डँबिस००७

Permalink

डँबिस

थोतांड हे फक्त नमोरुग्ण लोकांचे असते!
  • Log in or register to post comments

Submitted by बाप्पू on Sat, 02/09/2019 - 19:40

In reply to तुम्ही स्वतःचा पक्ष काढा कि. by सुबोध खरे

Permalink

व्ही सी डी...

व्ही सी डी... आपली एकसारखी चालणारी व्ही सी डी जरा pause करा आणि शांत विचार करा. राफेल ची चौकशी व्हावी याचे एक तरी ठोस कारण देऊ शकाल काय? फक्त तुम्हाला वाटते किंवा युवराजांना वाटते म्हणून प्रत्येक गोष्टीची चौकशी करून कसे चालेल.?? आणि तुमच्यासारखे लोक कितीही चौकश्या करून त्याचे सत्य बाहेर आले तरी विश्वास ठेवतात का?? 2002 च्या प्रकरणात मोदीजी प्रत्येक चौकशी ला सामोरे गेले आणि निर्दोष सिद्ध झाले तरी देखील तुमच्यासारखे लोक आणि शांतता प्रिय धर्माचे लोक विश्वास ठेवतात का? अजूनही टोपीवाले लोक मोदींना अँटी मुस्लिम मानतात. त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते गाढवाला सुद्धा मत देतील. देश गेला xxxxत. याउलट हजारो शीख लोकांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या माणसाच्या किती चौकश्या झाल्या?? 90% दंगली आणि त्यामध्ये झालेले निष्पाप मृत्यू हे फेक्युलर पक्ष्यांच्या राजवटी मध्येच झालेत. किती जणांची आणि घटनांची 2002 इतकी चौकशी झाली?? किती सत्य बाहेर आले? इथे एकदा CBI चौकशी ला आली तर ती टोपी-दाढीवाल्यांची अम्मा - ममता दीदी थयथयाट करते. जावई बापू आणि खुद्द युवराज देखील जामिनावर बाहेर आहेत. आणि हे असे लोक मोदींची चौकशी करण्याचा हट्ट करतात.. वा वा वा.. !!! तात्पर्य - युवराज आणि ठगबंधन यांच्या हो ला हो मिळवून उगाच राफेल मध्ये घोटाळा आहे अशी बोंब मारत फिरण्यापेक्षा काहीतरी सबळ पुरावे आणा आणि मग बोला..
  • Log in or register to post comments

Submitted by व्ही. डी. सी. on Sat, 02/09/2019 - 20:03

In reply to व्ही सी डी... by बाप्पू

Permalink

बाप्पू, जरा डोके वापरा!

करू नका चौकशी! मतदार बघून घेतील! मग बसा बोंबलत!!!
  • Log in or register to post comments

Submitted by बाप्पू on Sat, 02/09/2019 - 20:14

In reply to बाप्पू, जरा डोके वापरा! by व्ही. डी. सी.

Permalink

हो. मी देखील तेच म्हणतोय.

हो. मी देखील तेच म्हणतोय. मतदार बघून घेतील हो. तुम्ही तुमची व्ही सी डी बंद करा आणि चार्जिंग ला लावा... 3 महिन्यांनंतर EVM हॅक करून मोदी जिंकले अशी टेप वाजवण्यासाठी चार्जिंग हवे ना.. !!
  • Log in or register to post comments

Submitted by व्ही. डी. सी. on Sat, 02/09/2019 - 20:50

In reply to हो. मी देखील तेच म्हणतोय. by बाप्पू

Permalink

बाप्पू, कसे काय? मजेत!

दिवास्वप्ने पाहायला कोणाचीही हरकत असण्याचे कारण नाही! लोकसभा निकालाचा तो दिवस जास्त दूर नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by lakhu risbud on Mon, 02/11/2019 - 10:25

In reply to बाप्पू, जरा डोके वापरा! by व्ही. डी. सी.

Permalink

थुंकलेले जाहीररीत्या गिळण्याची तयारी असू द्या

आणि सत्तापालट नाही झाला तर हे थुंकलेले जाहीररीत्या गिळण्याची तयारी असू द्या म्हणजे झाले . तेव्हा गोलपोस्ट बदलू नका !
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रम्प on Sat, 02/09/2019 - 19:31

Permalink

अहो खरे काका !!!

त्यांचा फक्त भाजपच्या भ्रष्ट्र ( अजुन सिद्ध व्हायचे आहे ) लोकांवर राग आहे !!!!! खान्ग्रेस धुतल्या तांदळा सारखा पक्ष आहे अस त्यांचा म्हणणे आहे म्हणून ते फक्त भाजप आणि समर्थकाना धुत सुटले आहेत . काहीही म्हणा व्हीडीस यांचा निगरगट्टपणा शेम टू शेम राफेल गांधी सारखा !!! सतत एकच तुनतुन वाजवत बसायच . रागा किमान त्याच्या पक्षा साठी जी जी र जी करतोय पण व्हीडीस याचं मी नाही त्यातली आणि कड़ी लावा आतली अस का चाललय ?
  • Log in or register to post comments

Submitted by व्ही. डी. सी. on Sat, 02/09/2019 - 20:00

In reply to अहो खरे काका !!! by ट्रम्प

Permalink

ट्रम्प

ट्रम्पची महामुर्खपणाची वायफळ बडबड, नव्हे तर काय?
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रम्प on Sat, 02/09/2019 - 21:25

In reply to ट्रम्प by व्ही. डी. सी.

Permalink

आपण हसे लोकांना ! शेम्बूड

आपण हसे लोकांना ! शेम्बूड आपल्या नाकाला !! अशी व्ही स डी ची अवस्था झाली आहे , स्वतः वायफळ बडबड करून या धाग्या वरील बऱ्याच लोकांची करमणुक करताय .
  • Log in or register to post comments

Submitted by व्ही. डी. सी. on Sat, 02/09/2019 - 21:41

In reply to आपण हसे लोकांना ! शेम्बूड by ट्रम्प

Permalink

ट्रम्प

शेंबूड काढून टाका आणि ताबडतोब नाकाला विक्स लावा! एखादी सर्दीवरची गोळी सुद्धा घ्या, थोडे बरे वाटेल!!!
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 02/09/2019 - 20:04

In reply to अहो खरे काका !!! by ट्रम्प

Permalink

मी त्यांना केवळ एक गोष्ट

मी त्यांना केवळ एक गोष्ट सांगितली कि सर्वोच्च न्यायालयाचा २९ पानी निकाल संपूर्णपणे वाचून पहा. In view of our findings on all the three aspects, and having heard the matter in detail, we find no reason for any intervention by this Court on the sensitive issue of purchase of 36 defence aircrafts by the Indian Government.   Perception of individuals cannot be the basis of a fishing and roving enquiry by this Court, especially in such matters.   या निकालातील समारोपाच्या परिच्छेदातील ओळी आहेत. त्यात सर्वच्या सर्व आरोपांचा विस्तृत पणे उहापोह केलेला आहे.( यामुळेच श्री अरुण शौरी, यशवंत सिंह आणि प्रशांत भूषण सध्या रफाल या विषयावर तोंड बंद करून आहेत.) विरोधी पक्ष केवळ धूळफेक करत आहेत. त्यांच्या कडे एवढे पुरावे होते तर न्यायालयात काहीच का सिद्ध करता आले नाही? गंमत म्हणजे काँग्रेस कडे कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, चिदंबरम सारखे दिग्गज वकील असून त्यांनी मात्र जनहित याचिका दाखल केली नाही. कारण त्यांना माहिती होते कि डोंगर पोखरून झुरळ सुद्धा निघणार नाही. शिवाय नाचायला गेलो तर आपला पार्श्वभाग मात्र उघडा पडेल. बाकी श्री राहुल गांधी आपल्या बुद्धीप्रमाणे बेताल आरोप करतात पण आपल्या जवळ पुरावा नाही असे संसदेत कबूलही करतात. त्याबद्दल कोणी काही म्हणत नाही न्यायालयात हरले म्हणून संयुक्त संसदीय समिती नेमा हा आग्रह. केवळ निवडणुकीच्या अगोदर राळ उडवायची हा एक हेतू. सामान्य माणसं आता या रफालच्या तुणतुण्याला कंटाळली आहेत. पण विरोधक आणि नमोरुग्ण अजून तेच रडगाणं आळवून आळवून गात आहेत. ओरडून ओरडून घसा बसेल मग गप्प बसतील
  • Log in or register to post comments

Submitted by व्ही. डी. सी. on Sat, 02/09/2019 - 20:20

In reply to मी त्यांना केवळ एक गोष्ट by सुबोध खरे

Permalink

सुबोध खरे

ठीक आहे! चौकशी करा किंवा करु नका! मतदार बघून घेतील! मग बसा बोंबलत! पुन्हा म्हणू नका, त्याचवेळी चौकशी करून घेतली असती तर बरे झाले असते!
  • Log in or register to post comments

Submitted by शलभ on Sun, 02/10/2019 - 00:15

In reply to सुबोध खरे by व्ही. डी. सी.

Permalink

लोकांना सांगताय डोकं वापरा.

लोकांना सांगताय डोकं वापरा. तुम्ही जरा वापरून निकाल तर वाचा. काय खरं काय खोटं ते तुम्हालाच समजेल. का रागा सारखं तुम्हाला जे वाटतं तेच खरं. तुम्ही कुणा एका बाजूचे नसाल ते मान्य. पण थोडं लॉजिकली बघितलं तरी तुमच्या सर्व पोस्ट्स खऱ्या खोट्याची सरमिसळ आहे ते कळतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by व्ही. डी. सी. on Sun, 02/10/2019 - 11:22

In reply to लोकांना सांगताय डोकं वापरा. by शलभ

Permalink

शलभ

लोकांना सांगताय डोकं वापरा............... ज्यांनी स्वतःचे डोके भाजप-संघ-मोदीकडे गहाण ठेवले आहे, त्यांनी दुसऱयांना डोकं वापरायला सांगणे म्हणजे विनोद नाही काय? तुम्ही जरा वापरून निकाल तर वाचा. काय खरं काय खोटं ते तुम्हालाच समजेल.............काय तेच तेच निकाल वाचा, निकाल वाचा! फडतूसपणा नुसता! मूर्ख सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा 'उल्लू' बनविले आहे! चौकशी नाही, जेसीपीईचा अहवालच नाही तर सर्वोच्च न्यायालय कसला निकाल देणार? निकाल पुराव्यांवर अवलंबून असतो, हे लक्षात असू द्या! केवळ पुराव्या अभावी मोठं-मोठे आरोपी सुटले, याला इतिहास साक्ष आहे! का रागा सारखं तुम्हाला जे वाटतं तेच खरं..................... त्या रागाचे नाव सुद्धा घेऊ नका! राहुल आणि नरेंद्र मध्ये काहीच फरक उरलेला नाही, दोघेही देश विकायला निघाले आहेत! पण थोडं लॉजिकली बघितलं तरी तुमच्या सर्व पोस्ट्स खऱ्या खोट्याची सरमिसळ आहे ते कळतंय........... सर्वकाही लॉजिक ने चालत नसते, वस्तुस्थिती महत्वाची असते, तुमच्या डोक्यात भेळमिसळ आहे, हे आता तरी मान्य कराच!!!
  • Log in or register to post comments

Submitted by शलभ on Sun, 02/10/2019 - 18:07

In reply to शलभ by व्ही. डी. सी.

Permalink

अरेरे..परिस्थिती खूप अवघड आहे

अरेरे..परिस्थिती खूप अवघड आहे तुमची. Get well soon.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • …
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • पान 10
  • …
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com