अर्थक्षेत्र : टेक्निकल अनालिसिस : भाग - ०
लहानपणी, म्हणजे अगदी आजूबाजूचे भान आल्यापासून (समजायला लागल्यापासून म्हणण्यात काही हशील नाही कारण अजून फारसे काही समजतच नाही. विशेषतः लोकांचे वागणे.) ते अठरा एकोणीस वर्षाचा होईपर्यंत मी आईबरोबर भाजी आणायला बाजारात जात होतो. मार्केट किंवा बाजार ह्या संज्ञेशी झालेली हि पहिली ओळख होती. पण भाजी कशी घ्यावी हे शिकण्यासाठी मी आईचा हात धरून बाजारात प्रवेश केला नव्हता तर अचानक कधीतरी उसाचा रस पिण्यासाठी आई मला गुर्हाळात घेऊन जात असे. (परमोच्च आनंदाचा क्षण असायचा तो, कारण उसाचा रस आजतागायात माझा विक पॉइंट आहे पण आता आई नाही आणि मधुमेह आहे म्हणून रसाला सुट्टी.) हे बाजारात जाण्यामागचे माझे मूळ कारण होते. आज कार्यशाळेत येणारी मुले पाहतो तेव्हा त्यांना देखील भरपूर आणि झटपट पैसे ह्या उसाच्या रसाचे आकर्षण असल्याचे जाणवते. पण हा उसाचा रस केव्हा मिळेल ते माहित नसायचे त्यामुळे अनेक फेऱ्या वाया जात असत. कारण नेमका केव्हा आई उसाचा रस घेऊन देते ह्याचे गणित मांडता येईल इतके टोकाचे वैचारिक किंवा स्वार्थीपण आले नव्हते. कारण ते गणित मांडता आले असते तर मी नेमक्या दिवशीच आई बरोबर गेलो असतो.
बालमनावर आजूबाजूचे लोक संस्कार जास्त करतात तसे मला माझ्या आजूबाजूच्या लोकांनी जेव्हा पढवले कि अरे आई कोणत्या वारी किंवा किती दिवसांनी रस घेऊन देते ते शोधून काढ म्हणजे तुला कळेलच की आपल्याला उसाचा रस नेमका केव्हा मिळेल. सोप्पे आहे.
इथे अॅनालीसीसशी पहिली ओळख झाली. मग आईचे बिहेविअर अनालैझ करताना दमछाक झाली तरी आज आपल्याला उसाचा रस मिळेलच हे काही खात्रीपुर्वक सांगता येईना आणि मी तो नाद सोडून दिला.
जेव्हा आपण असे अनेक नाद सोडतो, ज्यात आपला स्वार्थ दडलेला असतो, तेव्हा नकळत आपण चिडचिडे होतो माझेही तसेच झाले. मी रोज येतो तरी आई कधीतरीच उसाचा रस पाजते तिला माझी कदर नाही टाईप विचार मनात येऊन मी आईच्याच चुका काढायला सुरुवात केली. पण ह्या लुटूपुटूच्या भांडणातूनच माझ्यापुरता का होईना मार्केट अॅनालिसिसचा जन्म झाला.
लांबच लांब पसरलेल्या भाजी मार्केटला संपूर्ण आणि सविस्तर (म्हणजे भाव विचारतच.) फेरी मारणे आणि मग ठराविक ठिकाणी भाजी घेणे हे आईचे ठरलेले बाजारहाट मॉडेल होते. मी आधी तिथूनच रडायला सुरुवात करत असे.
“सगळ्या भाजी मार्केटला फेरी मारायची काय गरज आहे?
जे तू नंतर घेणार ते इथे मार्केटमध्ये शिरल्या शिरल्याच तर मिळते आहे.” पण कालांतराने कळले कि तिची स्वतःची अशी पद्धत होती चूक कि बरोबर तो भाग वेगळा पण संपूर्ण मार्केटला फेरी मारून आज बाजार कसला आहे आणि कसा आहे ? कधी मटारच भरपूर दिसत असत, कधी टोमेटो भरपूर दिसत असत, कधी गाजर भरपूर आणि काही भाज्या मार्केटमधून गायब झालेल्या असत. तर काही नव्याने पुन्हा आलेल्या दिसत असत ह्यावरून ती मार्केटचा अंदाज घेऊन मग आपल्याला काय हवे आहे ते ठरवत असे. सिझनला स्वस्त म्हणून मिळणारे मटार घेताना रोजच्या जेवणात वाढायला लागणारी भाजी घेणे अपरिहार्य आहे हे लक्षात ठेवतानाच घरातल्या कुठल्या मेम्बरला काय आवडते ? कुणाला काय आवडत नाही ह्याचे भान आणि वडलांनी दिलेले मासिक बजेट ह्या सगळ्याचा ताळमेळ ती कसा घालत होती ? इतक्या सगळ्या आणि इतर अनेक प्रश्नांची उत्तरे हि अॅनालिसिस ह्या विषयाशी नकळत झालेली ओळख होती. पुढे पुढे मी स्वतः भाजी आणायला सुरुवात केली तेव्हा देखील असंख्य चुका करून ठेवत आलो आहे. वडलांना खुश करायला जेव्हा कारली आणली तेव्हा दुसर्या दिवशी सणाला कुणी कारली करते का ? आणि नंतर ती पिवळी पडून खराब होतात ह्यावर लेक्चर तर कधी फ्लॉवर आणला तर तो महागडा असल्याने बजेट बिघडवतो हा सूर लागायचा. थोडेफार कळून देखील मी तिच्यासारखी उत्तम बाजारहाट कधीच करू शकलो नाही. तसे का ह्याचे कारण ही कालांतराने मला कळत गेले आणि आज मी माझ्यापुरती तरी उत्तम बाजारहाट करतो. पण मुद्दा असा कि बाजाराशी लहान वयात नकळत जोडली गेलेली नाळ आणि त्याचा पुढे जाऊन केलेला अॅनालिसिस हि सवय वेगवेगळ्या (फटाक्यांपासून ते केमिकल्स,लॉजिस्टिक,फ्रुट्स, प्लास्टिक, स्टेशनरी, बिल्डींग मटेरियल, मेडीकल ईक्विपमेंट) मार्केट्स मधून सातत्याने भ्रमण केल्याने मला लागली. शेवटी शेअर बाजारात येऊन थांबलो आहे इथून पुढेही कुठेतरी जाईन ईश्वर जाणे. सतत समोर दिसणाऱ्या गोष्टींचा अॅनालिसिस करायची सवय लागण्याचा दुष्परिणाम आपण स्वतःचा अनालिसिस करत नाही असा होत असावा असे मला माझ्या उदाहरणावरून वाटते. कुठलेही मार्केट आपल्या आतून सुरु होते आणि आपल्या आतच संपते आपण ते बाहेर शोधतो असा अध्यात्मिक शोध हि कधीतरी फ्लॅश होतो.
हे सगळे इथे देण्यामागचे कारण टेक्निकल अनालिसिस वर जेव्हा आणि जसे वेळ मिळेल तसे खरडावे असे वाटते आहे. त्याची हि पूर्व पीठिका आहे.
बी एस इ सेन्सेक्स ५०० ते ८०० च्या रेंज मध्ये होता बहुतेक,१९८८ साल, नीटसे आठवत नाही पण हर्षद भाई मार्केट बाहेर फारसे प्रसिद्ध नव्हते तेव्हा कुणीतरी मला मार्केटमध्ये घेऊन गेले ते आज ३८००० ची पातळी मार्केटने गाठली आहे. प्रत्येक लाटेवर स्वार नवी मंडळी इथे आली काही बुडाली, काही तरली आणि काही शिकली उत्तम ट्रेडर झाली. पण जी ट्रेडर झाली ती मंडळी ट्रेडिंगच्या पॅशनने आली होती आणि म्हणूनच टिकली. पण सगळीकडे हात मारणारी आणि दुसऱ्यावर विसंबून ट्रेड करणारी मंडळी काही टिकली नाहीत. ती दोनतीन लाटां नंतर परत परत येत राहिली जात राहिली. पण मग त्यांना इतका तिरस्कार निर्माण झाला मार्केटबद्दल कि विचारायची सोय नाही. आपण आपलाच अनालिसिस केला नाही आणि मार्केटला दोष देत राहिलो तर ते कितपत योग्य आहे हा प्रश्न देखील त्यांना पडू नये ह्याचे आश्चर्य वाटत राहते.
मार्केट अॅनालीसिसचे असंख्य प्रकार असू शकतात पण सामन्यतः शेअर्सच्या किमतीतील चढ उतारांचे विश्लेषण म्हणजे टेक्निकल अॅनालिसिस असा संकुचित विचार केला जातो. मार्केट कायम पुढेच चालते असा अनुभव आहे पण पुढे चालताना ते दोन पावले मागे येते आणि चार पावले पुढे चालते जसे पंढरीच्या वारीत वारकरी हातात टाळ आणि मुखी विठूचा गजर करत दोन पावले पुढे चार पावले मागे चालतात अगदी तसेच. पण नवख्या माणसाने त्यात शिरायचे म्हंटले तर तो अडखळतो, बाहेर फेकला जातो आणि पुन्हा आत शिरून तो हि वारकरी होतो. त्याक्षणी त्याने केलेला त्या लयीचा अभ्यास हा पण टेक्निकल अॅनालिसिसच.
पण आपण शेअर मार्केट बद्दल बोलत असल्याने त्याच्या टेक्निकल अॅनालीसीसकडे वळूया. शेअर मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालीसीसटेक्न म्हणजे रोजच्या भावात होणाऱ्या चढ उतारांचे केलेले विश्लेषण आणि त्या आधारे उद्याची त्या विशिष्ठ शेअरची किंवा निर्देशांकाची चाल कशी असेल ते शोधण्याचा केलेला प्रयत्न. एक लक्षात घ्या आपण चाल कशी असेल म्हणतो आहोत किंमत नाही. म्हणजे तो वारकरी दोन पावले मागे येतो आहे का चार पावले पुढे सरकतो आहे ते शोधण्याचा केलेला प्रयत्न. टेक्निकल अॅनालीसीस कुणाला सोपा आणि कुणाला कठीणत्तम वाटतो. पण ह्या टेक्निकल अॅनालीसीसचे अनेक भाग विभाग आहेत जे सर्वच कठीण नसतात आणि सगळेच वापरण्याची गरज नसते. आपल्या बुद्धीला झेपेल त्या विभागात मन रमवावे, दोस्ती करावी आणि आपली चाल मार्केटच्या चालीशी जुळवून घ्यावी.
वाचने
40701
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
सहीच !! लिहत रहा !!
लेख आवडला
उत्तम!आवडले!
रोचक...
सुरेख लिखाण
In reply to सुरेख लिखाण by समीरसूर
केवळ नशिबाचा
In reply to सुरेख लिखाण by समीरसूर
शेम हिअर
मस्त. दुसऱ्या धाग्यावरील (
In reply to मस्त. दुसऱ्या धाग्यावरील ( by यशोधरा
दुसरा धागा...
In reply to दुसरा धागा... by समीरसूर
नाही, हर एकाचे बोलणे मनावर
In reply to नाही, हर एकाचे बोलणे मनावर by यशोधरा
गुड
In reply to गुड by समीरसूर
खिक! तुमच्याइतके चपखल कोणाला
In reply to खिक! तुमच्याइतके चपखल कोणाला by यशोधरा
खिक! अवांतर तुम्हीच सुरु केले...
In reply to खिक! अवांतर तुम्हीच सुरु केले... by समीरसूर
शाब्दिक मारामारी फक्त ठराविक
In reply to शाब्दिक मारामारी फक्त ठराविक by टवाळ कार्टा
आणखी काही लिहायचे असेल तर त्या धाग्यावर लिहू
In reply to शाब्दिक मारामारी फक्त ठराविक by टवाळ कार्टा
पटले
ज्ञानव,
अप्रतिम लेखमाला असेल ही
लेखमाला उत्तम होणार यात शंकाच नाही...
In reply to लेखमाला उत्तम होणार यात शंकाच नाही... by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद
छान!
प्रतिसादकर्ते
In reply to प्रतिसादकर्ते by ज्ञानव
कोणाची करंगळी?
In reply to कोणाची करंगळी? by टवाळ कार्टा
सिनियर
In reply to सिनियर by ज्ञानव
तुला खरे काय ते ठाऊक आहेच.
छान सुरुवात.
सुरुवात छान केलीय, पुभाप्र.
मिपावर असा धागा यावा
लेखनशैली अतिशय आवडली
लेखमाला लिहायचा उत्तम निर्णय
In reply to लेखमाला लिहायचा उत्तम निर्णय by उपेक्षित
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by ज्ञानव
नवीन कायद्याने आता हे शक्य
वा ! मस्त !! सुरूवात तर छान
In reply to वा ! मस्त !! सुरूवात तर छान by उगा काहितरीच
पदव्युत्तर डिप्लोमा
@ ज्ञानव,
छानच झालीय सुरवात. _/\_
एक गृहपाठ :
अनालीसिस
दिल्या घेतल्या वचनांची शपथ
सिक्सर