अडनिडी मुलं-२
मागच्या भागात काही मुलांच्या हट्टीपणाबद्दल लिहिले, काहींच्या मानसिक प्रोब्लेम बद्द्ल लिहिले... आता पोंगडअवस्थेतेतिल परिस्थिती मधुन उद्भ्वनार्या प्रश्नांविषयी...
टिचर वर्गात आली... शिकवायला सुरवात... रोज पंजाबी घालणारी टिचर आज छान, पारदर्शक साडी नेसली होती. मुलं थोडी बावरुन ... आपआपल्या वह्यात डोकं खुपसुन... थोड्या वेळाने टिचर वर्गात फेर्या मारु लागली.. आता मुलांना टिचरला अगदी जवळुन पाहणे शक्य झाले... टिचर ने वहीत डोकावले.. आणि पुढे पाठ वळताच... "कैसी दिख रही रे, मस्त ऐटम, तेरे को कैसी लगती" , एकजण चार पाच लोकांना आवाज जाईल इतपत जोराने ... टिचर ने मागे वळताच.. एक मस्त स्माईल... टिचर ने एक टपली मारली फक्त... दुसरे काय करणार होती?
एकजण स्वप्नातली राजकुमारी रोज रफ बुकवर काढायचा... त्याला सुटेबल वाक्य लिहायचा... पुर्ण वही अशा स्केचेस नी भरली होती... मुलींना तो काय काढतो ह्या बद्दल उत्सुकता होती.. मग तो क्लासमध्ये नसताना त्यांनी त्याची ब्याग उचकटुन पाहिली... तर तो छान छान स्केचेस काढुन त्या मुलीला कोठे पाहीले, कशी दिसते, कोणत्या ड्रेस मध्ये छान दिसते, कोणत्या ड्रेस मध्ये आपल्याला आवडेल... असे बरेच लिहिले होते.
एक मुलीबद्दल लेक सांगत होती... ती मुलगी खुप हुशार आहे पण ती दर आठवड्याला एक बोयफ्रेंन्ड बदलते. शिवाय तिच्या बोयफ्रेंन्डस ला नंबर आहेत. नंबर १,२,३,४,५,६,७,८,९,१०.... अजुन एक समजलेली गोष्ट म्हणजे तीला आई नाही.घरी कोणीच समजावायला नसल्याने ती असे करत असेल का?
अजुन एक मुलगी खुप हुशार, ९९ मार्क्स मिळाले की आख्खे खानदान १ मार्क कोठे गेला म्हणुन विचारणार?त्या एक मार्कचा तिला हिशोब द्यावा लागणार म्हणुन ती मुलगी सतत धास्तावलेली.. तिची आई डॉक्टर किंवा अशीच काही मेडिकल रिलेटेड जॉब करणारी . तिच्या हॉस्पिटलच्या शिफ्ट्स .. भरीतभर तिला एक सिनिअर केजीत असणारी बहीण . त्या छोट्या मुलीलाही तिला सांभाळावे लागायचे . घरात आई वडिलांची सतत भांडणे . त्या प्रेशर ने ती वैतागलेली .प्रेमासाठी आसुसलेली . मुलीजवळ तासंतास रडणारी ."वेगळं का राहत नाही?", असे एकदा माझ्या मुलीने विचारलेच. तर ती सरळ म्हणाली ,"गुडियाला कोण सांभाळायचं ?" असे ते म्हणतात ,पण शाळेतून घरी आले की अभ्यासाबरोबर तिला सांभाळायचे काम माझेच . अशा वातावरणातच तिला एक सोसायटीला मुलगा आवडू लागला , त्याच्यावर एकतर्फी प्रेम करायला लागली.त्याच्या साठी चिट्ठ्या काय ,कविता काय असे बरेच उद्योग करायची. पण ते सर्व स्वतःजवळच ठेवायची . आई बापाला तिच्याकडे बघायला सवड कोठे होती ? घरी एकत्र आले कि भांडणे . तिला जास्त काय विचारायची तर पंचाईत . सतत चेहऱ्यावर बारा वाजलेले. म्हणून पोरी पण टाळायच्या . एक दिवशी तिने स्वतःच त्या मुलाला प्रपोज केले . तो मुलगा ठामपणे नाही म्हणाला .अजून आपण खूप लहान आहोत आणि मला माझ्या करिअर वर कॉन्सन्ट्रेट करायचे आहे असे म्हणाला .मग तर हिने खूप दिवस सदम्यातच काढले . तिच्या कवितांना पूर आला . नशीब हे सर्व दहावीच्या सुरवातीलाच पार पडले आणि पोरगी क्लास शाळेत रमली .दहावीला १० सिजीपीए . मनातून मी देवाचे आभारच मानले .
अजून एक सांगायचे म्हणजे माझी लेक आई बरोबर सगळे शेअर करते तर लेक तिला सांगायची, "आईला सर्व सांग , मन मोकळं कर, म्हणजे जास्ती टेन्शन येत नाही". तर ह्या पोरीचा विचार..आपणही आपल्याला वाटणाऱ्या प्रेमाबद्दल आईला सांगावे . पोरगीने ठरवले आईला आदी आपल्या अजून एक मैत्रिणीच्या प्रेम कहाणीबद्दल सांगावे म्हणून तशी बोलायला आईबरोबर सुरवात केली तर आईने जमदग्नी अवतार धारण केला . त्या मैत्रिणीच्या घरी सांगण्याची धमकी दिली . तिच्याबरोबरची मैत्री पूर्ण तोडण्यास भाग पाडले. का ? तर अशा वागणाऱ्या मुली वाईट असतात . स्वतःच्या लेकीला असे काय वाटतंय असे कळले असते तर? तर काय केले असते आईने ? नशीब आई डॉक्टर आहे .अशिक्षित नाही.
अजून एक मुलगी ,खूप हुशार . आई वडील घटस्फोटित . पण वडील बहुदा सर्व खर्च करत असावेत . आजी मामा कडेच राहते . मामाचाही घटस्फोट झालाय . पण बाकी सर्व घर वैगेरे अगदी टॉप च्या सोसायटीत. आई तशी चांगली शिकलेली आहे . मैत्रिणी वैगेरे अगदी मापकच . स्वतः अभ्यास ,खेळ ,योगा असा ब्लॅलन्स तिने पाळलाय . पण मुलगी मला ह्याच्यावर क्रश , त्याच्यावर क्रश असे बिनधास्त सांगते . लेकीने काही काळजीत विचारले... तर म्हणते ,"काळजी करू नकोस , हा फक्त क्रश आहे . तसेही मी लव्ह म्यॅरेज च करेन . आणि तेही वयाच्या पंचविशी नंतर". ही एक दिलासा देणारी गोष्ट होतीच. मला वाटले लागली जिगीषा ची गाडी रुळावर तर कसले काय ... आईला कॅन्सर झालाय असे सांगून लेकीजवळ रडली . परत परत ती ठीक झालीय ,ठीक होतीय असे लेक सांगायची. पण परवा तिच्या आईला पाहिले ,उभा न राहता यायची ताकद . केस पूर्ण गेलेले . न जाणो तिच्या आईचं काय झालं तर काय करायचे तिने? वडील पुसटसे पण आठवत नाहीत ... आता आईचे हे असे .. घरून खोटा आधार मिळाल्याने आई ठीक होणार ह्या भ्रमात पोरगी... तिलाही आई वडिलांच्या वेगळ्या होण्याची झळ लागलीय पण ती ते असे एकावेळी दोन तीन बॉयफ्रेंड ठेवून मी वरचढ असेल, माझे खपवून घेईल त्याच मुलाशी लग्न वैगेरे करीन अशी स्वप्ने बघते . स्टील शी गोट १० सिजीपीए .असेच यश तिला आयुष्यभर मिळो आणि तिच्या आईची तरी निदान तिला साथ मिळो.
तिसरी मुलगी , आई वडील रोज भांडण . वडील आईला सतत मारायचे .सतत संशय घ्यायचे . आईचं जगणं नको केलेलं वडिलांनी . पोरगी मग दिवसभर टी व्ही मध्ये तोंड खुपसून . अभ्यास नावालाही नाही . आईला नोकरी करणे भाग होते . आई बाप नोकरी करणार . बाप घरी आला कि आईला मारणार . पोरगी दिवसभर टी व्ही सिरीयल मध्ये मग्न . बसून बसून पोरगी गोल गब्बू झाली . सर्वच आत्मविश्वास गमावलेला . हुशार नसल्याने शाळेतही कोणी मैत्री करायचे नाही . सतत काहीतरी होतंय ,पोटात दुखतंय म्हणून घरी राहणार . घरी बसून खात राहणार . नंतर नंतर बाप तिलाही मारायला लागला . मग मात्र पोरगी बिथरली . तिला सतत टोकायला लागला . मला हिला मुलगी म्हणायची लाज वाटते असे एकदा बाप म्हणाला. मग मात्र पोरगी इरेला पेटली . ह्या घरातून निघून जाऊ नाहीतर मी घरातून पळून जाईन अशी पोरगी धमकी घालायला लागली . आईनेही मग विचार करून वेगळं व्हायचं ठरवलं. शेवटी आई वेगळी राहिली लेकीला घेऊन आणि पोरगीची गाडी रुळावर आली. अभ्यास करू लागली. मैत्रिणी मिळवायला लागली . दहावीला ८. सिजीपीए . पण पुढच्या गोष्टी खूप वाईट आहेत त्याविषयी पुढच्या भागात .
वाचने
6355
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
फँटास्टिक सब्जेक्ट
In reply to फँटास्टिक सब्जेक्ट by प्रमोद पानसे
तुमचेही अनुभव शेअर करा
वाचतेय .
In reply to वाचतेय . by मालविका
सीबीएससी बोर्ड ला सिजीपिए
मुलं अडनिडी म्हणण्यापेक्षा
In reply to मुलं अडनिडी म्हणण्यापेक्षा by यशोधरा
नाही, मुलंच अडनीडी, पुढेही
In reply to नाही, मुलंच अडनीडी, पुढेही by जेडी
ठीक आहे, वाचेन, सध्या तरी मला
वाच्तोय
In reply to वाच्तोय by आनन्दा
धन्यवाद
माझा मुलगा पण मनातले सर्व
In reply to माझा मुलगा पण मनातले सर्व by विनिता००२
ते काही वयापर्यंतच शक्य आहे
In reply to ते काही वयापर्यंतच शक्य आहे by जेडी
तो आता २० वर्षाचा आहे :)
अडनिडी मुलं ....?
किस्से रंजक आहेत.
माझा मुलगा अजून लहान आहे, पण
In reply to माझा मुलगा अजून लहान आहे, पण by वीणा३
बरोबर...
गुण मिळवणे म्हणजे आयुष्याची
रोचक किस्से आणि मुद्दे