पिठलं - ज्वारीच्या पिठाचं

योगेश कुळकर्णी's picture
योगेश कुळकर्णी in पाककृती
21 Nov 2018 - 7:03 pm

पिठलं सगळ्यांच्याच आवडीचा प्रकार. अगदी पटकन होणारा तरीही अतिशय चविष्ट आणि रुचकर. इथेच इकड्च्या तिकडच्या धागांवर ज्वारीच्या पिठाच्या पिठल्याची रेसीपी मिळाली होती; एक-दोनवेळा केलंही होतं पण वेगळी अशी पाकृ काही नव्हती. आज मी पुन्हा केलं हे सो कृती देतोय. अर्थातच आपापल्या चवीनुसार व्यंजनं कमी, जास्त अथवा वगळणे, अ‍ॅड करणे इ प्रकार करून बरेच व्हेरीएशन्स करता येतील.
तर साहित्य -
- दोन मध्यम कांदे
- ४/५ हिरव्या मिरच्या
- ७/८ कढीपत्यांची पानं
- हळद, तेल, मीठ, मोहोरी
- लहान वाटीभर ज्वारीचं पीठ
- लागेल तसं पाणी
- जराशी बारीक चिरलेली कोथिंबीर

- एका कढईत, पॅनमध्ये तेल तापवून त्यात मध्यम बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी करावी. कांदा जरा सोनेरी लालसर होऊ द्यावा
- यात आता मीठ, हळद घालून काही सेकंद अजून परतावं म्हणजे हळदीचा कचवट वास निवेल.
- आता यात ज्वारीच पीठ पसरून घालावं आणि मिनिट भर परतून घ्यावं.
- यात आता थोडं थोडं पाणी घालत गुठळ्या मोडून घ्याव्यात आणि नंतर जरा अजून पाणी घालून पिठल्याची कन्सिस्टन्सी येऊ द्यावी. एक दणदणीत वाफ आली की पिठलं तयार आहे. वरून बारीक चिरलेल्या हिरव्यागार कोथिंबीरीनं सजवावं.

मस्त पिवळ्या-हिरव्या रंगाच सुपरटेस्टी पिठलं गरमागरम भात, चपाती, भाकरी यांसोबत खावं. चव अजून खुलवण्याकरता तेलाची थोडं जिरं आणि पावचमचा तिखट पोळवून चरचरीत लाल फोडणी (यात हवा तर लसूणही घालता येइल) वरून अवश्य घ्यावी.
सोबत शेंगदाण्याची लसूण घातलेली चटणी, कांदा, मुळा आणि हो, तळलेली किंवा भाजलेली हिरवी फटाकडी मिरची असेल तर बहार एकदम. Happy

फोटो आहे, लिंक देतो जराश्यानं...

या प्रमाणात दोन लोकांना होईल बहुतेक; पण नॉर्मली पिठलं जास्तच लागतं हा अनुभव आहे

- नक्की करून पाहा हा प्रकार. चण्याच्या डाळीच्या पिठल्याचा गुठळ्या होण्याचा प्रकार इथे अजिबातच होत नाही. (कारण ज्वारीचं पीठ मुळातच चिकट नसतं) सो माझ्यासारख्या बिगरीवाल्यांना एकदम स्मूथ पिठलं जमायला लागलंय. (मला गुठळ्यांचं पिठलही आवडतं म्हणा Wink )
- फोडणीत पीठ घातल्यावर कोरडं राहाता कामा नये, सो त्या प्रमाणात तेल; कांद्याचा ओलसरपणा साधायचा आहे. नंतर पाणी वगेरे घातल्यावर गाठी मोडणे एकदमच सोपं होतं.

प्रतिक्रिया

मनिम्याऊ's picture

21 Nov 2018 - 8:30 pm | मनिम्याऊ

आम्ही यात थोड़ी मेथी घालतो चिरुन

माझ्या १ वर्षाच्या मुलासाठी मी हा प्रकार सगळ्या पीठांचा करते आणि त्यात मिरची घालत नाही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2018 - 9:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नसता फॉल समजला जातो. धन्यवाद. ;)

बाय द वे, आपण केलेल्या पिठल्याला खरडन राहतं का ?
थोडं जळालेलं वगैरे ते मला खूप आवडतं.

मी घरच्यांना म्हणतो तुम्ही पिठलं हादडा मला खरडन ठेवा. :)

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

22 Nov 2018 - 6:19 am | कंजूस

फोटो टेम्प्लेट
<img src="ttttttttt" width="640"/>
या टेम्प्लेटात ttttttttt च्या जागी फोटोची लिंक टाकून परत कॅापी पेस्ट करा. ( तुमच्या मायबोली लेखातूनच फोटोच्या लिंक्स मिळाल्या होत्या.)

-------
बाकी ज्वारी पीठ आणि बेसन ३:१ मिसळून का करू नये पिठलं?

सविता००१'s picture

22 Nov 2018 - 7:57 pm | सविता००१

करून पाहायला हवे

मदनबाण's picture

22 Nov 2018 - 9:43 pm | मदनबाण

फोटो ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Na Ja (Official Video) :- Pav Dharia

II श्रीमंत पेशवे II's picture

23 Nov 2018 - 10:48 am | II श्रीमंत पेशवे II

काहीतरी नवीन आहे .....

आजपर्यंत फक्त बेसनाचे + कुळथाचे पिठले माहित होते ....

करून पहायला हवे ....

dhananjay.khadilkar's picture

6 Jan 2019 - 5:29 pm | dhananjay.khadilkar

nice pithla