इंद्रधनू

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

इंद्रधनू

रक्तकेशरी सूर्यदिशा मी समजून घे रे कधी मलाही,
कसा कळेना तुला आवडे मावळतीचा रंग गुलाबी..

अवखळ हसरा झरा होऊनी बागडते मी तुझ्यासभोती,
निळी जांभळी कोसळते मी शोधतोस तू शब्द गुलाबी..

हिरवा नाजूक कोंब प्रीतीचा लपवू बघते सार्‍यांपासून,
मोहरते मी तुझ्याच 'पाशी', असे छेडसी सूर गुलाबी..

धम्मक पिवळी होऊन येईन, बंध जगाचे तोडून येईन,
अंतर सारे मिटवू जाता होईन मी आरक्त गुलाबी..

मृद्ग़ंधासम हळवे नाते, सांभाळाया तुझ्याच हाती.
सोपवून मी विश्वासाने मिटता डोळे, स्वप्न गुलाबी..

H

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

6 Nov 2018 - 11:51 am | यशोधरा

सुंदर..

मित्रहो's picture

6 Nov 2018 - 6:59 pm | मित्रहो

छान खूप सुंदर.
गुलाबी रंगाच्या दिशेने होणारा प्रवास आवडला.

प्राची अश्विनी's picture

7 Nov 2018 - 9:27 am | प्राची अश्विनी

यशोधरा, मित्र हो, धन्यवाद.:)

नूतन सावंत's picture

7 Nov 2018 - 10:09 am | नूतन सावंत

सुंदर

टर्मीनेटर's picture

7 Nov 2018 - 3:55 pm | टर्मीनेटर

छान कविता.
हि कविता वाचताना स्क्रीन वर इंद्रधनुतले जवळपास सगळेच रंग दृष्टीस पडत होते त्यामुळे जास्त रिलेट करता आली.

सविता००१'s picture

7 Nov 2018 - 5:11 pm | सविता००१

मस्त कविता

प्राची अश्विनी's picture

8 Nov 2018 - 7:26 am | प्राची अश्विनी

_/\_

प्रचेतस's picture

8 Nov 2018 - 9:55 am | प्रचेतस

सुरेख कविता.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

11 Nov 2018 - 1:16 am | मिसळलेला काव्यप्रेमी

हिरवा नाजूक कोंब प्रीतीचा लपवू बघते सार्‍यांपासून,
मोहरते मी तुझ्याच 'पाशी', असे छेडसी सूर गुलाबी..

क्या बात!!

पद्मावति's picture

11 Nov 2018 - 2:24 pm | पद्मावति

सुरेख, खुप आवडली गं कविता.