कटर

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in पाककृती
1 Nov 2018 - 8:58 pm

.

डेक्कन वर जागा मिळेल तिथे स्कुटर पार्क केली व चालायला सुरवात केली
डेक्कन पेट्रोल पंपाजवळ एक जण टोस्ट सॅन्डविच बनवणारा आहे
तो कांदा कापत होता
चॉपिन बोर्ड वर नाजूक बारीक कापलेल्या चिरलेल्या कांद्याचा ढीग होता
त्याच्या हातून सूरी घेत मी ब्लेड च्या थिकनेस चा पाते चिमटीत धरुन अंदाज घेतला
खिश्यातुन पैसे काढत विचारणा केली सूरी कुठून विकत घेतली -मला मिळेल का इत्यादी
पण तो माहिती देण्यास नाखूष दिसला -"साब वो सूरी बनाने वाला गाव को गयेला है -वापस नाही आने वाला
"ठीक आहे" म्हणत मी रुपाली ला आलो चहा घेतला
थोडक्यात ब्लेड चे पातळ पाते हे कांदा बारीक कापण्याचे सिक्रेट होते
डोक्यात विचार होते --अन क्लिक झाले
रुपालीच्या बोळात व्हीनस चे स्टेशनरी दुकान होते तिथून कटर घेतला
बोटाच्या चिमटीत पकडून ब्लेड ची थिकनेस चेक केली
ती मला हवी तशी होती
घरी आल्यावर कटर च्या साहाय्याने कांदा कापला
बारीक नाजूक कापला गेला
कांदा कापायाला मी हल्ली कटर वापरतो
जरूर एकदा ट्राय मारा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

2 Nov 2018 - 10:30 am | मुक्त विहारि

कापला कांदा तर उत्तमच, नाहीतर वायरिंगच्या कामाला उपयोगी पडेलच.

उगा काहितरीच's picture

2 Nov 2018 - 8:58 pm | उगा काहितरीच

कांदा बारीक कापायला हे यंत्र वापरतो. किंमत कमी , वापरायला एकदम सोपे , बारीक कांदा कापण्यासाठी खूपच उपयोगी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वापर झाल्यावर धुऊन ठेवणे पण खूपच सोपे आहे.

उगा काहितरीच's picture

2 Nov 2018 - 8:59 pm | उगा काहितरीच

लिंक गंडली वाटते Pigeon Handy Vegetable & Fruit Chopper
http://dl.flipkart.com/dl/pigeon-handy-vegetable-fruit-chopper/p/itmemrh...

मुक्त विहारि's picture

2 Nov 2018 - 10:53 pm | मुक्त विहारि

त्यापेक्षा कटर उत्तम.हातासरशी धूउन होतो.

उगा काहितरीच's picture

2 Nov 2018 - 11:08 pm | उगा काहितरीच

हं मान्य करतो की , चाकू धुण्यासाठी जितका वेळ आणि श्रम लागतात त्याच्या फार फार तर २ पट वेळ लागेल पण तेही फार नव्हे. हे ही हातासरशी धुऊन ठेवता येतं . त्याबदल्यात फायदे पण खूप मिळतात . डोळ्यातून पाणी न येणे वगैरे .

सस्नेह's picture

3 Nov 2018 - 1:37 pm | सस्नेह

Pigeon Handy Vegetable & Fruit Chopper
हे यंत्र मीही वापरते. कांदा छान बारीक चिरला जातो. पण मध्यम किंवा किंचित जाड हवा असेल तर काही उपयोग नाही.
धुवायला अवघड नाही, पण त्यातून चिकटलेला कांदा बाहेर काढताना फार वैताग येतो आणि वेळ लागतो.

उगा काहितरीच's picture

3 Nov 2018 - 4:58 pm | उगा काहितरीच

कांदा कापल्यानंतर मग मी नंतर टोमॅटो काढतो. आहे नाही तोही कांदा फोडणीत टाकल्या जातो. प्लस टोमॅटो चाकूने कापताना जो भाग (पाणी) वाया जातो तेही वाया जात नाही. मला भाजीत वगैरे मोठा मोठा कांदा अजिबात आवडत नाही व अंडा भुर्जी वाल्यांसारखा सफाईदार पणे कापताही येत नाही म्हणून माझ्यासाठी तरी हे कटर खूपच उपयोगी आहे.

लई भारी's picture

20 Nov 2018 - 1:50 pm | लई भारी

मी पण अलीकडेच घेतलं हे, आणि हेच प्रतिसादात डकवायला आलो होतो :)

mrcoolguynice's picture

4 Nov 2018 - 10:09 am | mrcoolguynice

Good Idea...
Thanks AK