कच्च्या टोमॅटोची चटणी

जेडी's picture
जेडी in पाककृती
24 Oct 2018 - 10:13 pm

साहित्य -
चार ते पाच कच्चे टोमॅटो
चार ते पाच हिरव्या मिरच्या
ओले खोबरे (पाव वाटी तुकडा)
दोन ते ३ चमचे दाण्याचे कूट
१ ते २ चमचा दही
थोडा गूळ (एक छोटा खडा )
चवीपुरते मीठ
फोडणीसाठी एक चमचा तेल, मोहरी , जिरे , कडीपत्ता

कृती
कच्या टोमॅटोच्या छोट्या फोडी करून घ्याव्यात , त्यात मीठ, मिरच्या , खोबरे, थोडे जिरे , दही घालून मिक्सरला वाटून घ्यावे . वाटून झालयावर त्यात दाण्याचे कूट आणि गुळ बारीक करून घालावा. वरून जिऱ्या , मोहरी कडीपत्त्याची फोडणी करून ओतावी .

चव अतिशय अप्रतिम लागते . फोटो काढण्याचा सोस नसल्याने फोटो काढला नाही.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

25 Oct 2018 - 1:10 am | मुक्त विहारि

फोटो का नाही?

फोटो शिवाय रेसीपी म्हणजे, अमृताशिवाय स्वर्ग किंवा मतभेदाशिवाय मराठी माणूस किंवा अमिताभ शिवाय डॉन किंवा खसखशी शिवाय अनारसे किंवा चारोळीशिवाय बासुंदी.....किंवा....किंवा......किंवा....इतरही बरेच काही....

कंजूस's picture

25 Oct 2018 - 7:24 am | कंजूस

फोटोसाठी पुन्हा करा ना!

सविता००१'s picture

25 Oct 2018 - 10:34 am | सविता००१

फोटोसाठी पुन्हा करा

हो हो करते, कित्येक पदार्थ करत असुन पण फोटो काढले नाहीत म्हणुन रेसिपी टाकली जात नाही, इथुनपुढे आठवणीने फोटो काढण्यात येतील

सविता००१'s picture

25 Oct 2018 - 5:38 pm | सविता००१

कित्येक पदार्थ करत असुन पण फोटो काढले नाहीत म्हणुन रेसिपी टाकली जात नाही,
अत्यंत सहमत

मुक्त विहारि's picture

26 Oct 2018 - 12:09 am | मुक्त विहारि

+ १

श्वेता२४'s picture

25 Oct 2018 - 4:26 pm | श्वेता२४

मी कच्चे टोमॅटो शिजवून मग चटणी करते. तुमच्या पद्धतीने पण करुन बघेन. बाकी ही चटणी म्हणजे ऑल टाईम फेव्हरीट प्रकार

जुइ's picture

26 Oct 2018 - 2:21 am | जुइ

तेवढे फोटो टाका!

कंजूस's picture

27 Oct 2018 - 7:58 am | कंजूस

फोटो टेम्प्लेट
<img src="ttttttttt" width="640"/>

या टेम्प्लेटात ttttttttt च्या जागी फोटोची लिंक टाकून परत कॅापी पेस्ट करा. ( तुमच्या मायबोली लेखातूनच फोटोच्या लिंक्स मिळाल्या. या कच्च्या टोमॅटोची चटणी लेख नाही सापडला.)

मायबोली वर दुसरं कोणीतरी आहे, मी नाही

कंजूस's picture

27 Oct 2018 - 9:53 am | कंजूस

अरेच्या होय.
पण टेम्प्लेट वापरून पाहा

विवेकपटाईत's picture

27 Oct 2018 - 10:16 am | विवेकपटाईत

आवडली. बायको नेहमीच करते. दिल्लीत लोक हिरव्या चटणीत हि टमाटर घालतात.