श्रीगणेश लेखमाला - आयुष्य आणि छंद यांचे समीकरण!
आयुष्य आणि छंद यांचे समीकरण!
असे नशीबवान कमीच असतात, ज्यांना आपल्या छंदाचे रूपांतर आपल्या करियरमध्ये करता येते. काही सुखी असेही असतात, जे आपल्या करियरबरोबरच आपले छंद छान जोपासतात. काही टक्के असे असतात, जे लहानपणापासून एखाद्या कलेवर किंवा छंदावर मनापासून प्रेम करतात, पण आयुष्यातल्या जबाबदाऱ्यांमुळे आपले हे प्रेम मनातच ठेवतात. पण मग कधीतरी अशीदेखील वेळ येते की आयुष्य 'settle' होते आणि मग आपले ते जुने, पहिले प्रेम मान वर काढते.... आणि पति/पत्नीची 'त्या' प्रेमाला हरकत नसते, त्यामुळे मग ते जोपासलेदेखील जाते. काही मात्र माझ्यासारखे असतात, ज्यांना मुळात आपली आवड, छंदच माहीत नाहीत. म्हणजे माझा एकच प्रचंड आवडणारा असा छंद नाही. मला सगळेच करायला आवडते. जे काम करते आहे, त्यावर माझे मनापासून प्रेम आहे. तितकेच प्रेम लेखनावर आहे. अधूनमधून कविता करतानादेखील मला तितकाच आनंद होत असतो. उत्तम कलाकृती पाहायला आवडते - मग ते नाटक असो किंवा सिनेमा किंवा मग उत्तम कलाविष्कार. सगळे सगळे आवडते आणि करूनदेखील बघावेसे वाटते. त्यातूनच गेल्या वर्षी अनुभवलेल्या एका कलाविष्काराची आवड मनात निर्माण झाली आणि लगेच प्रयत्नदेखील सुरू केला. गेल्या वर्षी मी राजस्थानच्या सहलीला गेले होते. राजस्थानचे ऐतिहासिक महत्त्व आणि उत्तमोत्तम राजवाडे, हवेल्या हे तर नक्की पाहण्यासारखे आहे, त्याचबरोबर तिथे अनेक कलादेखील पाहायला मिळतात. त्यातलीच एक कला आहे सुंदर सुंदर मातीची भांडी बनवणे (Pottery). खरे सांगायचे तर मातीची भांडी असे म्हणून ते लोक तयार करत असणार्या, विविध आकाराच्या, कलाकुसर असणाऱ्या त्या वस्तूंना भांडी नाही म्हणावेसे वाटत. विविध प्रकारचे मातीचे दिवेदेखील ते बनवतात. मात्र हे सगळे त्याच मातीच्या रंगाचे.
त्या वस्तू बघून माझ्या मनात आले की जर या वस्तू छान रंगवल्या, तर घरातील एखादा कोपरा एकदम घराचे वेगळेपण दाखवून देईल. 'Aesthetic look' बदलून टाकेल. दिवाळीमध्ये मातीचा कंदील लावता येईल. झाले! मनात आले आणि मग मुंबईमध्ये अशा प्रकारच्या विविध आकारांच्या आणि त्यावर उत्तम कोरीवकाम असणाऱ्या वस्तूंची शोधाशोध सुरू केली. मात्र कितीही प्रयत्न केला तरी मला हव्या तशा वस्तू मुंबईत मिळत नव्हत्या. त्याच वेळी काही कामानिमित्त मी पुण्याला गेले आणि पुण्याच्या बाणेर भागात मला अगदी राजस्थानला बघितल्या होत्या तशा वस्तू मिळाल्या. अगोदर केवळ प्रयोग करून बघायचे ठरवले होते. म्हणून मग कोरीवकाम असलेली एकच फूलदाणी किंवा तसेच काहीसे म्हणता येईल अशी वस्तू घेतली. पोस्टर कलरच्या लहान बाटल्या घेतल्या आणि दोन ब्रश. घरी आल्या आल्या रंगकाम सुरू केले आणि खरेच आजूबाजूचे जग विसरले. तो अनुभवच शब्दातीत होता. जवळजवळ पाच तास मी रंगकाम करत होते. माझ्या आजूबाजूला काय चालू आहे याची मला फिकीर नव्हती. मी आणि माझी फूलदाणी इतकेच जणू काही जगात उरले होते.
त्या अनुभवानंतर मी मुद्दाम बाणेरला परत गेले आणि मग येताना गाडी भरून वेगवेगळ्या आकाराच्या आणि कलाकुसर असणाऱ्या वस्तू घेऊन आले. मी इतक्या वस्तू आणल्या आहेत की माझा नवरा घराच्या एका कोपऱ्याला अलीकडे कुंभारवाडा म्हणायला लागला आहे.
मात्र मी सगळ्यांच्या मतांकडे दुर्लक्ष करून अधूनमधून जसे जमेल तसे हे रंगकाम करत असते. माझ्या एक लक्षात आले आहे की जर तुम्ही रंगात रंगलात, तर मन प्रसन्न राहते. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. अर्थात कदाचित आपल्याला जो छंद आवडतो, त्या छंदाचा अनुभवदेखील प्रत्येकाला हीच भावना देत असेल, असे मला वाटते. पण आता आणखी काहीतरी नवीन मिळेपर्यंत हे रंगकाम नक्की करणार आहे!
वा! सुरेख रंगकाम. लेखामध्ये,
In reply to वा! सुरेख रंगकाम. लेखामध्ये, by यशोधरा
हेच प्रश्न
मस्तच
कोणते रंग ?
छान !
मस्तच.
सुरेख!!
ज्योती, मस्त रंगकाम!
सुरेख झालं आहे.
मस्त. आवडले!!!
आगळा छंद
सुंदर छंद ! सगळ्या वस्तूंची
रंगसंगती खूपच छान आहे.
वा.
सर्वांचेच मनापासून आभार या
खूप छान आवडले
वा! रंगकाम खूप सुंदर दिसतंय.
मस्त...
सुंदर .........
भारी
सुन्दर
@ ज्योति अलवनि,
आपल्या कौतुकाबद्दल सर्वांचेच
खूप छान कलाकृती केली आहेत तुम्ही. कर्जत ते चौक फाटा ह्या रस्त्या
अरे वा! खरच मुद्दाम जाऊन बघीन
Baner la nemaka konatya
Baner la nemaka konatya bhagat or thikani ya matichya vastu milalya?
"प्रत्येक गोष्ट करायला आवडते"