✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

माझं हे सारं सामान गं सखू...

ध — धन्या, Tue, 09/20/2011 - 15:07
बाजाराला निघालो मी घाई घाई, पिशवीची आठवण राहीलीच नाही सामान माझं सारं आहे थोडं खाली, तू जराशी वाकशील का? माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का? तालुक्याच्या बाजाराला लागलाय सेल, केली खरेदी मी बराच वेळ माझं सामान झालंय बरंच मोठं, पिशवी जराशी फाकशील का? माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का? वाण सामान आणि ताजा भाजीपाला, मासोळीचाही मी बाजारहाट केला ताजा, कडक बोंबील माझा, तुझ्या पापलेटनी झाकशील का? माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का? सांगत असतो धन्या तो मला, पिशवी नेत जा रे नेहमी बाजाराला वापरू नये कधी हात सामानाला, आतापुरतं तू झाकशील का? माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का?

प्रतिक्रिया द्या
52653 वाचन

💬 प्रतिसाद (91)

जाहीर आभार...

मोदक
Sat, 01/19/2013 - 09:57 नवीन
मा. धनाजीराव वाकडे, तुमच्या सखूने आम्हास (कवीतेची) प्रेरणा देवून मिपाच्या काव्यविभागाची सेवा करण्याची संधी दिली याबद्दल आम्ही आपले आणि आपल्या सखूचे तहेदिलसे आभारी आहोत. :-)) बरोब्बर आपल्या चरणकमलावरून चालणारा. मोदक.
  • Log in or register to post comments

बरोब्बर आपल्या चरणकमलावरून

धन्या
Sat, 01/19/2013 - 11:32 नवीन
बरोब्बर आपल्या चरणकमलावरून चालणारा.
कसचं कसं. एक मात्र नक्की की हे काव्य आम्ही बहुतेक आमच्या मेंदूत काहीतरी "हार्मोनल इम्बॅलन्स" वगैरे होऊन आम्ही ट्रान्समध्ये गेल्यावर जन्माला आलेलं आहे. कारण त्यानंतर अशा पद्धतीच्या कविता लिहिण्याचा गेले वर्षभ प्रयत्न करत आहोत, त्यासाठी अखंड ज्ञानसाधनाही* करत आहोत. परंतू शब्द साथ दयायला तयार नाहीत. असो. * या क्षेत्रातील दोन नामवंतांची "तशी" अठरा वीस गाणी आहेत. त्या गाण्यांचं खुप वेळा पारायण करणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

>>>या क्षेत्रातील दोन

प्रचेतस
Sat, 01/19/2013 - 11:33 नवीन
>>>या क्षेत्रातील दोन नामवंतांची "तशी" अठरा वीस गाणी आहेत. त्या गाण्यांचं खुप वेळा पारायण करणे. आपल्या एका सभ्य मित्राला मात्र तशी गाणी असभ्य वाटतात म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तो ही गहन चर्चेचा विषय आहे...

धन्या
Sat, 01/19/2013 - 11:41 नवीन
त्यावर पुन्हा कधीतरी. सध्या नको. कालपासून जो धुरळा उडतोय तोच खाली बसू दया आधी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ध्रुरळा का खाली बसु द्या, अहो

५० फक्त
Sat, 01/19/2013 - 17:01 नवीन
ध्रुरळा का खाली बसु द्या, अहो गर्दी में गुड सस्ता ही म्हण माहित नाही का तुम्हाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आपले (म्हणजे तुमचे आणि आमचे) सभ्य मित्र अस्तित्वात आहेत

मोदक
Sun, 01/20/2013 - 17:11 नवीन
आपले (म्हणजे तुमचे आणि आमचे) सभ्य मित्र अस्तित्वात आहेत, ही नवीनच माहिती कळाली. :-D लोककलांचा वारसा चालवणार्‍या शिंदेंना असभ्य म्हणणार्‍या आपल्या मित्राचे नाव कळवता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आपले (म्हणजे तुमचे आणि आमचे)

धन्या
Mon, 01/21/2013 - 00:31 नवीन
आपले (म्हणजे तुमचे आणि आमचे) सभ्य मित्र अस्तित्वात आहेत, ही नवीनच माहिती कळाली.
असं म्हणणं हे आपल्या (म्हणजे तुमच्या आणि आमच्या) त्या सभ्य मित्राचा अपमान आहे. कर्मधर्मसंयोगाने आपले (म्हणजे तुमचे आणि आमचे) ते मित्रही शिंदेच आहेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

धनाजी राव....

नाखु
Mon, 01/21/2013 - 09:05 नवीन
जरा सभ्यतेची (?) व्याख्या/परिमाण ठोकताळे सांगितले तर बरे होईल म्हणजे आम्ही सभ्य (च) आहोत का/सभ्य (च)लोकांच्या कट्ट्याला जातो का हे कळेल्..तुमच्याकडे अचूक माहिती नसली तर तसे जरूर कळवा म्हणजे मोदकांना सा़कडे घालू ( तुम्हाला चालेल ना) निरागस (नाद खुळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तुम्ही मोदकरावांनाच विचारा

धन्या
Mon, 01/21/2013 - 21:55 नवीन
तुम्ही मोदकरावांनाच विचारा कसें. हल्ली ते खुपच फॉर्मात आहेत. आमच्या टुकार कवितेचे अतिटुकार विडंबन पाडूनही ते खोर्‍याने प्रतिसाद ओढत आहेत. आमच्या या प्रतिसादात कुणाला ज़ळजळ दिसली तर तो आमचा दोष नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

ह्म्म..

मोदक
Tue, 01/22/2013 - 01:52 नवीन
ह्म्म..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

काका हि कवितापण चान चान .

जेनी...
Mon, 01/21/2013 - 21:43 नवीन
काका हि कवितापण चान चान .
  • Log in or register to post comments

काका लोकांच्या लेखनाला

धन्या
Mon, 01/21/2013 - 21:49 नवीन
काका लोकांच्या लेखनाला फाटयावर मारण्याच्या दिवसांमध्ये चक्क तू माझ्या कवितेला चान चान म्हटलंस. खुप बरं वाटलं बाळा. मी ही तुझ्या कवितेला असंच चान चान म्हणेन हां. ते कुणीतरी म्हटलंच आहे ना, एकमेकां साहाय्य करु, अवघे भरु अकाऊंट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

अय्या काका पण मी कविता लिवितच

जेनी...
Mon, 01/21/2013 - 22:15 नवीन
अय्या काका पण मी कविता लिवितच नै ! तुमी लिवलेली एकदम चान हं काका :) तुमी मला बा़ळा म्हणलात ... केवडं भरुन आलं म्हनुन सांगु ... काका तुमी कुप चान आहात :) :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

लब्बाड, "मी आता कविता लिवितच

इनिगोय
Mon, 01/21/2013 - 22:28 नवीन
लब्बाड, "मी आता कविता लिवितच नै!" किंवा "मी अशा कविता लिवितच नै!" असं म्हणायचंय काय तुला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

इश्श्य ... कित्ती कित्ती

जेनी...
Mon, 01/21/2013 - 22:41 नवीन
इश्श्य ... कित्ती कित्ती मनकवडीयेगं तु :) तु पण कुप कुप चान आहेस हं इनो तै ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

अय्या!

पैसा
Mon, 01/21/2013 - 23:24 नवीन
कित्ती कित्ती शाणी ती! हा घे तुला पुस्प्गूच! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

अय्या सासुबैनी फष्ट टैम मला

जेनी...
Mon, 01/21/2013 - 23:31 नवीन
अय्या सासुबैनी फष्ट टैम मला इतका सुंदर पूस्प्गुच दिलाय :) वाकुन नमस्कार करते हं सासुबै ! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नको!

पैसा
Mon, 01/21/2013 - 23:32 नवीन
पाय ओढून पाडशील नक्की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

लै आधी

अभ्या..
Mon, 01/21/2013 - 23:37 नवीन
हे तुम्हाला लै आधी सांगितलं होतं खरडफळ्यावर. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आयडीया भारीये पण मला झेपेल

जेनी...
Mon, 01/21/2013 - 23:39 नवीन
=)) आयडीया भारीये :) पण मला झेपेल का वजन तुमचं सासुबै ?? :( आणि तरी झेपलच न तुमी पडलाच तर शेवा मलाच करावी लागेल :-/ आमचे हे पण रागवतिल बै माझ्याव :-/ कायबी चालेल पण ह्यांचा रुसवा नको बै :-/ सो पाडायचा इचार केंसल :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

माझ्या धाग्याचा सिंहगड रोड

धन्या
Tue, 01/22/2013 - 00:18 नवीन
माझ्या धाग्याचा सिंहगड रोड झाला. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

वाइस कळ काढाय तयार असलाव त

जेनी...
Tue, 01/22/2013 - 04:43 नवीन
=)) वाइस कळ काढाय तयार असलाव त तुमास्नी गडाव पोचवायची तयारी हाय ;) झेपन का??? =)) ( प्रवास बर्का :D)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

बालिका...कोण गं तुझे हे???

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/22/2013 - 09:40 नवीन
बालिका...कोण गं तुझे हे??? नाव घे नां.....!!!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

@एकमेकां साहाय्य करु, अवघे

अत्रुप्त आत्मा
Mon, 01/21/2013 - 22:41 नवीन
@एकमेकां साहाय्य करु, अवघे भरु अकाऊंट !Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हा हा हा...

ब़जरबट्टू
Tue, 10/08/2013 - 11:38 नवीन
आयला, फुटलो राव, कशी सुटली नजरेतुन.. मस्तच सखू.. :)) :)) :))
  • Log in or register to post comments

हा

सुमीत भातखंडे
गुरुवार, 10/10/2013 - 10:48 नवीन
हा हा हा...सॉलीड
  • Log in or register to post comments

=)) =))

अद्द्या
गुरुवार, 10/10/2013 - 15:01 नवीन
=)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ...

मदनबाण
गुरुवार, 10/10/2013 - 15:40 नवीन
हॅहॅहॅ... असाच एक जुना धागा आठवला ! ;) तुझी घागर नळाला लाव...
  • Log in or register to post comments

भन्नाट

टवाळ कार्टा
Sat, 01/17/2015 - 23:07 नवीन
भन्नाट मिपावरच्या "अश्या" खजिन्याची रत्ने कोणी एकत्र करुन लिंका ठेवल्या आहेत का कुठे? ;)
  • Log in or register to post comments

हा धगा वरती आला... आणि काही

मदनबाण
Mon, 01/19/2015 - 14:05 नवीन
हा धगा वरती आला... आणि काही दिवसांपूर्वीच ऐकलेल गाणं आठवलं बघा ! शिटी वाजली... गाडी सुटली... अन पदर गेला वर... पोरी जपुन दांडा धर ! बाकी हल्लीच कानावर पडलेलं गाणं सहीत देत आहे ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पप्पी दे पारुला... ;)
  • Log in or register to post comments

मदनबाण साहेब

बॅटमॅन
Mon, 01/19/2015 - 14:21 नवीन
या विषयाचा तुमचा व्यासंग दांडगा असावा. तरी 'वाट तुझी बघतोय रिक्षावाला' या मुग्ध कवितेची पूर्ण संहिता कुठे मिळाल्यास हवी आहे. आगाऊच धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

कसला व्यासंग ? आम्हाला फकस्त

मदनबाण
Mon, 01/19/2015 - 14:29 नवीन
कसला व्यासंग ? आम्हाला फकस्त "रस ग्रहण" करण्याचच सुचतं बघा ! ;) तरी 'वाट तुझी बघतोय रिक्षावाला' या मुग्ध कवितेची पूर्ण संहिता कुठे मिळाल्यास हवी आहे. ही घ्या :- http://marathisongs.netbhet.com/2014/02/rikhawala.html

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पप्पी दे पारुला... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हा हा हा, बहुत धन्यवाद!

बॅटमॅन
Mon, 01/19/2015 - 14:32 नवीन
हा हा हा, बहुत धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

धन्य धनाजीराव!!!

जडभरत
Wed, 07/15/2015 - 21:25 नवीन
धन्य धनाजीराव!!! फुल टैमपास!!! मस्तच
  • Log in or register to post comments

ऑफिस मध्ये असलेले फुकटचे नेट

अद्द्या
गुरुवार, 02/09/2017 - 13:40 नवीन
ऑफिस मध्ये असलेले फुकटचे नेट आणि नसलेले काम .. याचा रिजल्ट म्हणजे हि कविता खोदून काढणे .. आणि येड्या सारखा एकटाच हसणे
  • Log in or register to post comments

+१

सूड
गुरुवार, 02/09/2017 - 14:27 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

हे राम .!

जेपी
गुरुवार, 02/09/2017 - 15:48 नवीन
हे राम .! घरी जाऊन आधी आंघोळ करतो..
  • Log in or register to post comments

या गाण्यावरुन आनंद शिंदे

खटपट्या
Mon, 08/13/2018 - 11:19 नवीन
या गाण्यावरुन आनंद शिंदे यांचे "एका हातानं साडी वर करा, दुसर्‍या हातात सामान धरा" हे महाकाव्य आठवलं
  • Log in or register to post comments

सखी काय म्हनली आसलं....

कर्नलतपस्वी
Tue, 08/30/2022 - 22:01 नवीन
काय सांगू काका...... सामानानं पिशवी माह्यी अदुगरच भरलेली हाय तुह्या सामाना करता जागा उरलेली नाय आसलं तुहं सामान भारी पण जागा तुही चुकली लई उशीर केलासा काका....तुही संधी हुकली..... मस्त काव्य.... लईच,
  • Log in or register to post comments

वळचणीला गेललं पाणि एकदम

शाम भागवत
Wed, 08/31/2022 - 03:24 नवीन
वळचणीला गेललं पाणि एकदम जाग्यावर आणलत बघा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

कवीता लई डेजर हाय...

कर्नलतपस्वी
Wed, 08/31/2022 - 06:14 नवीन
कवीता लई डेजर हाय. काल वाचली अन डोक्यात दही झालं. बिलंदर काका अन बेरकी सखू सामान झाल जड ओझ कुठ टाकू कुठ बी टाक, इथ तीथ नको टेकू घरातलीच पिशी आन हिथ तीथ नको झाकू
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा