मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गट्टे बिर्याणी

manguu@mail.com · · पाककृती
गट्टे बिर्याणी १. भात : बासमती भात दोन वाट्या धुवुन अर्धा तास भिजुन निधळून घ्यावा. अर्धा कच्चा शिजवून घ्यावा. शिजताना त्यात तेल १ चमचा, मीठ , तमालपत्र आणि बिर्याणी मसाला एक चमचा घालावे. भात बाजूला ठेवावा. २. गट्टे : एक वाटी बेसन पीठ , तेल, मीठ , तिखट, धना - जिरा पावडर घालून घट्ट मळून घ्यावे. त्याचे लांबट रोल करुन शिजवुन घ्यावेत. गार झाले की तुकडे करावेत. ३. भाज्या : कांदा , गाजर , बटाटा यांचे मोठे तुकडे , मटार , कॉर्न भात शिजून जितकी क्वांटीटी होईल , भाज्या - गट्टे ह्यांचीही साधारण तितकीच क्वांटिटी हवी, या बेताने गट्टे व भाज्या घ्याव्यात. ४. आले , लसूण , हिरवी मिरची ह्यांचे मिक्सरमधून वाटण करुन घ्यावे. कोथिंबीर व पुदिना थोडे पाणी घालून त्यांचेही स्वतंत्र वाटण करुन बाजूला ठेवावे. ५. कांदा , ड्राय फ्रूट्स गार्निशिंगला हवे असल्यास तळून बाजूला ठेवावे. ६. कढईत तेल घेऊन त्यात गट्टे फ्राय करुन बाजूला ठेवावेत. नंतर त्यात तेलात कांदा परतावा, इतर भाज्या घालून पुरेसे पाणी घालून एक वाफ येऊ द्यावी. त्यात बिर्याणी मसाला, मीठ व थोडे लाल तिखट घालावे. मग त्यात फ्राय केलेले गट्टेही घालावेत . मिक्सरमधली दोन्ही वाटणे घालावीत. नंतर दही घालून मिसळून घ्यावे. gb ७. दम देणे : कुकरमध्ये आधी तेल / तूप घालून एक कान्द्याचा थर द्यावा . त्यावर भाजी गट्टे मिश्रण एक थर घालावा . मग भाताचा एक थर घालावा. ड्राय फ्रुट , पुदिना , कोथिंबीर अधून मधून घालावी. नंतर एक वाटी दूध शिंपडावे. कुकर बंद करुन मंद आचेवर शिजवावे. खायच्या वेळी सगळे थर हलवून घ्यावेत. gbb बासमती तांदूळ , भाज्या उरल्या तर उद्या व्हेज सिझलर करावे. ( sizzler )

वाचने 22709 वाचनखूण प्रतिक्रिया 25

In reply to by शंकासुर

रमेश आठवले Mon, 06/18/2018 - 22:16
चिकन बिर्याणी ,मटण बिर्याणी, यांच्या प्रमाणे एक प्रथिन (डाळ) युक्त शाकाहारी बिर्याणी असावी असे वाटत होते. ही उणीव गट्टे बिर्याणीने भरून काढली आहे .

In reply to by रमेश आठवले

manguu@mail.com Mon, 06/18/2018 - 22:38
बिर्याणीची आणि चायनीजची व्हेज व्हर्जन्स परिपूर्ण नसतात . मटण चिकन काढून नुसत्या भाज्या वाढवून नुसता भात पूर्ण आहार होऊ शकत नाही. गट्टे , सोया चँक , छोले , मटार घालावे लागतील

मदनबाण Sun, 06/17/2018 - 13:12
अरे वा... छानच ! आवडेश. बटाट्याचे तुकडे जरा जास्त मोठे आणि जास्त झालेत असं पहिला फोटु पाहुन वाटतं.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बरखा रीतु आयी... :- Sanjeev Abhayankar [ Raag Dhuliya Malhar ]

In reply to by उगा काहितरीच

manguu@mail.com Wed, 06/20/2018 - 01:09
1. भात उर्फ बिर्याणी कालची शिल्लक होती. ती गरम केली. ताजा veg fried rice करू शकता 2. कच्च्या केल्याच्या फोडी व बटाटा फोडी फोडणीस टाकल्या . नंतर वाटीत हळद , तिखट , मीठ , जिरे पूड , धने पूड घेऊन एक वाटी पाणी घालून मिसळले व ते भाजीत टाकून हलवले. एक वाफ दिली 3. बटाटा व मटार कुकरमधून शिजवून घेतली , नंतर ते कुस्करून त्यात हळद , तिखट , मीठ , धना पूड , जिरे पूड , चाट मसाला घातला. त्यात मिक्सरमधून थोडे पोहे बारीक करून घातले ( याऐवजी मैदा , corn फ्लोर ही घालतात ) . तेल , पाणी घालून घट्ट मळून टिकक्या केल्या . त्या शॅलो फ्राय केल्या. 4. सिझलर सॉस - थोडे बटर घेऊन तव्यात लसूण , टोमॅटो चिरयन घालून भरपूर शिजवले , एकजीव केले , त्यात हिरव्या मिरच्या बारीक कापून घातल्या , टोमयटो सॉस व शेजवान चटणी घालून शिजवले , मग पाणी 40-50 मिली घालून हलवून शिजवून ठेवावे. 4. नूडल्स केले - मॅगी 5. करी प्यान गरम करायचा , त्यात कोबीची पाने रचायची , त्यावर वरचा सर्व ऐवज रचायचा , गरम होऊ द्यायचे , मध्ये मध्ये जागा दिसते तिथे बटर व सॉस सोडायचा , मस्त खरपूस धूर होतो , उरलेला सॉस घाला

In reply to by manguu@mail.com

manguu@mail.com Wed, 06/20/2018 - 01:28
भात किंवा नूडल्स एकच काहीतरी करा मिक्स भाज्या शॅलो फ्राय करून घेऊ शकता कॉर्न , मोड हेही शिजवून घेऊ शकता सोसमध्ये चिली सॉस , सोया सॉस घातल्यास चव चाम्गली येते.