मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाप ….

मनिष · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
सगळ्या बापांसारखेच, आपल्या बापालाही काही कळत नाही याची खात्री पटल्यानंतर… मला ह्याच शाळेत का घातलं? फुटबॉल ऐवजी क्रिकेटला का नाही टाकलं? असे आरोप केल्यानंतर… बाप आहे ना, तो चुकतोच. आपल्यासारखा स्मार्ट तो मुळात नसतोच हे समजून चुकल्यानंतर… मग तू स्वतः बाप झाल्यावर, वैतागून पोरांना ओरडून झाल्यावर प्रेमाने जवळ घेतल्यानंतर… कधीतरी आठवेल का तुला लहानपणी तू शांत झोपल्यावर, कित्येकदा तुझ्या केसांमधून हात फिरवत, हळूच तुझी पापी घेऊन, तुला एकटक पहात असतांना भरून आलेले माझे डोळे. माझ्या गालांवरून ओघळणारे ते पाणी कधीतरी उतरेल का तुझ्या डोळ्यात, माझ्या हळव्या आठवणीने मी नसल्यानंतर? ~ मनिष (28/5/2018)

वाचने 3082 वाचनखूण प्रतिक्रिया 15

पहिली चार कडवी जबरदस्त आवडली. त्यानंतरचे पाचवे मात्र संदीप खरेंनी लिहील्यासारखे वाटले. म्हणजे काटाकिरची मिसळ खाताना मधेच एक घास चितळ्यांच्या श्रीखंडाचा अला तर कसे वाटेल? तसे काहीसे वाटले. बाप म्हणजे अस्सल गावरान कोल्हापुरी मटन रस्सा असतो नुसता जाळ. पहिल्या घासात डोळ्यातन पाणी काढणारा. आमचा बाप असाच आहे, आणि तो जसा आहे तसाच आवडतो पैजारबुवा,