नेदरलँड्सची सफर भाग -४
नेदरलँड्सची सफर भाग -४
एक दिवस ऍमस्टरडॅम मध्ये फिरण्यात घालवून दुसऱ्या दिवशी आम्ही क्यूकेनहॉफ येथे ट्युलिप उत्सव पाहण्यास सज्ज झालो.
या उत्सवाची तिकिटे तुम्हाला जालावर काढता येतात आणि हि तिकिटे शिफॉल विमानतळापासून तुम्हाला क्यूकेनहॉफला नेणे आणि आणणे या दोन्ही प्रवासाचा खर्च गृहीत धरूनही काढता येतात. हि सोय फारच चांगली आहे. कारण अगोदरच लिहिल्याप्रमाणे शिफॉल विमानतळ हा सर्व वाहतुकीनी युरोप आणि बाकी सर्व जगाशी व्यवस्थित जोडलेला आहे. त्यामुळे युरोपातील आणि बाहेरील पर्यटक तेथे रेल्वे, विमान किंवा बसने सकाळी येऊन संध्याकाळी परत जाऊ शकतात. असो.
आम्ही बस पकडून शिफॉलला पोहोचलो तेथे अक्षरशः दर मिनिटा दोन मिनिटाला क्यूकेनहॉफसाठी बस जात होती. त्यात बसून आम्ही तेथे पोहोचलो.
जगातील एक आश्चर्य वाटेल इतकी सुंदर बाग आहे. जगनियंत्याने जितके रंग असतील ते इतक्या कलात्मकतेने तेथे ओतले आहेत कि अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटावे. त्याबद्दल काहीही न लिहिता मला जमेल तितकि प्रकाश चित्रे टाकत आहे.
याच साठी केला होता अट्टाहास असे वाटून आल्याचे सार्थक झाले असे वाटले. तरी आम्हाला तेथे जायला थोडा उशीर झाला कारण काही काही ट्युलिप सुकायला लागले होते आणि सुकलेले ट्युलिप तेथील कर्मचारी काढून टाकीत असत ज्यामुळे गर्द असलेले काही ताटवे थोडेसे विरळ झाल्याचे जाणवते.
आमच्या सौ ला थंडी सोसत नाही त्यामुळे एप्रिल च्या ऐवजी मी मध्ये आल्याने असे झाले परंतु एकंदर हवामान फारच उत्तम होते अन थंडी गुलाबी होती बोचरी नव्हती.
सगळे फोटो माझ्या निकॉन ३३०० कॅमेऱ्याने काढलेले आहेत एकतर पोर्ट्रेट किंवा ऑटो मोड वर काढलेले आहेत. त्यातील जवळ जवळ ३०० फोटो चा दुवा येथे देत आहे. ज्याला पाहिजे त्याने हा दुवा उघडून पाहावा आणि फोटो आवडला तर हवा तेथे वापरावा.
(टीप -- फोटो खाली माझे नाव/ श्रेय कृपया टाकू नये). परमेश्वराने दिलेल्या या अनमोल स्वर्गीय ठेव्यावर माझा कोणताही हक्क नाही
https://photos.app.goo.gl/fG1YQgCm68Be3yHA8
वाचने
17040
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
फोटो छान!
सुरेख आहेत ट्युलिप!!
सुरेख.
छान फोटो...
ट्युलिप आवडले.
वाह! नेत्रसुखद!
वाह! नेत्रसुखद!
अप्रतिम!!!
जब्राट आहेत फोटो
सुंदर फोटो, डोळे निवले.
मस्त
अप्रतिम !!
अप्रतिम !!
सुंदर फोटो ! अप्रतिम जागा आहे
मस्त...
वाह!
जबरी फोटो !!! तुमचा हेवा
अप्रतिम !
रेड शर्ट, क्रीमी पॅण्ट + लायनींग ड्रेस
In reply to रेड शर्ट, क्रीमी पॅण्ट + लायनींग ड्रेस by अर्धवटराव
--/\--
अप्रतिम !!!!!!
लाजवाब फोटो.
अप्रतिम
डोळ्यांचे पारणे विनामूल्य .....
अप्रतिम फोटो. ट्युलिप्स याची
मस्त फोटो