शांतरस

जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
18 Dec 2019 - 8:07 am

कवि एका जनार्दनी श्री गुरुदत्ताचा भक्त जाणा ।
श्री गणपती देवी पार्वती महादेव
वीष्णू ब्रह्मा आदी देवतांचे नमन म्हणा।
सर्वांना आपलेसेकरी हिंदूधर्माच्या सकारत्मक
भगव्या उत्क्रांती कळसाचा उद्घोषम्हणा।
जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा ।
आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।।

विवीधगुणात्मक ख्रिसमसट्री देव हा जाणा। सगुणी अवतार वनस्पतीलोकीचा राणा।
राम भेटी मुग्ध म्हणे जये हनुमाना । गुरुवर्य येशुयोगीबोले त्रिमुर्तीअनेकदेवाद्वैत सर्वाठायी जाणा।
जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा । आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।।

गणेश पावलेदेशभक्तिप्रेरणात्मकभक्ति गीतमाझ्यासवेमार्गदर्शनमुक्त कविताविठ्ठलशिववंदनासमुहगीतशांतरसकविता

माहेर, सासर

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
8 Dec 2019 - 4:53 am

माहेर, सासर

नदीच्या त्या किनारी साजण माझा उभा
कधीचा वाट बघतो माझी जीवाचा तो सखा

अल्याड गाव माझे त्यात मी राहिले
पल्याड त्याचे गाव कधी नाही पाहिले

चिरेबंदी साचा भक्कम असे माझे घर
नाही दिसत येथून घर त्याचे आहे दूर

मनात त्याची सय मध्येच जेव्हा येते
त्याचाकडची वाट नजरेला खुणावते

मनी लागली हुरहुर कसे असेल सासर
कसे का असेना मी शेवटी सोडेन माहेर

- पाषाणभेद
०८/१२/२०१९

प्रेम कविताभावकविताअद्भुतरसशांतरसकविताप्रेमकाव्य

वेदनाच मला मिळू दे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
17 Nov 2019 - 11:34 pm

नकोत आनंददायी संवेदना
हे प्रभो वेदनाच मला मिळू दे
हरवू दे माझा मी पणा
त्यासाठी मजला धिर दे

सुख असे हे की डाचते मला ते
तेच ते कणखर मनाला पंगू बनवते
भौतिकाच्या मागे न लागो शाश्वत असा अशिष दे

ऐहीक श्रीमंत असूनही मदतीचा हात नाही
कशाला मग उगाचच मी दानशूर मिरवत राही
तुझ्या हातांची सर येण्याची मजला बुद्धी दे

तावून निघावे भट्टीत सोने मग दागिणा बनण्या
त्यासम माझे मन होवूदे तयार तुझ्या कडे येण्या
घण संकंटांचे घाल पाठी, मळली वाट मला न दे

- पाषाणभेद
१७/११/२०१

भक्ति गीतशांतरसकविता

कविता : भेट मित्रांची…

bhagwatblog's picture
bhagwatblog in जे न देखे रवी...
5 Nov 2019 - 3:11 pm

आठवणींना उजाळा
भावनांचा उमाळा
शब्दात जिव्हाळा
दोस्तीचा सोहळा…. भेट मित्रांची…

मित्रांची सतत मस्ती
कधी मस्तीची सक्ती
सख्याची जीवापाड दोस्ती
कधी दोस्तीत कुस्ती…. भेट मित्रांची…

मित्र कमी बोलणारा
परी डोळ्यात जपणारा
दोस्त शब्दात खेळणारा
पण शब्दासाठी धावणारा…. भेट मित्रांची…

कविता माझीफ्री स्टाइलशांतरसकवितामुक्तक

भक्ति गीत: सप्तशॄंग गडावर जायचं

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
17 Oct 2019 - 10:49 am

मला ग बाई वाट गावली, माझ्या नशिबानं
सप्तशॄंग गडावर जायचं, नवरात्रीत चालून ||धृ||

हाती धरली कावड
गोदेच्या निर्मळ पाण्यानं ||१||

गड झाला हिरवा
साथ दिली पावसानं ||२||

घर माझं भरलं
धन धान्याच्या राशीनं ||३||

जगण्याची रीत दावली
देवी सप्तशॄंगीनं ||४||

नवसाला पावली आई
आशीर्वाद दिला तिनं ||५||

पुजा करून ओटी भरीन
कुंकू लावीन हातानं ||६||

सगे सोयरे झाले सोबती
पायी चालती आनंदानं ||७||

दर्शनाची आस लागली
घाईनं उचलते पाऊलं ||८||

कृपा असू द्यावी भक्तांवरी
विनवणी करी पाषाण ||९||

शांतरसधर्मकविताभक्ति गीत

तुझ्या भेटीला आलो दत्ता

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
28 Sep 2019 - 5:22 am

तुझ्या भेटीला आलो दत्ता
सत्वरी या आता ||

तुझ्या मंदीराची केली वाट सोपी
नसे काही चिंता, मनी आस मोठी
वाट पाही दर्शनाची, तुम्ही प्रकटा ||

भक्तांची दु:खे करुनीया दूर
दिले जीवनात सुख भरपूर
सर्वांचा वाली तू तूच आमचा त्राता ||

पाहूनिया रुप होईल मनाची शांती
नसे आस कसली, तिच विश्रांती
सखा तूच गुरू तूच तूच होई दाता ||

ब्रम्हा विष्णू महेश तिन लोक शक्ती
तुझ्या ठाई एक झाले, व्यापूनी सृष्टी
रुप दाखवा तुम्ही दारी आलेल्या भक्तां ||

- पाषाणभेद
२८/०९/२०१९

भावकविताशांतरसकविता

पाहूणा पाऊस

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
27 Sep 2019 - 12:33 am

मी म्हणाले पावसाला तू येतोस कधी
ब-याच दिवसात भेटला नाही
तो म्हणाला मी तर येतच असतो नेहमीसारखा
पण तूच माझ्याशी बोलत नाही

मग मी त्याचे स्वागत करायचे ठरविले
अगदी जवळ गेल्यासारखे भासविले
पण त्याचे मनात काही वेगळेच असेल
जवळ येवून त्याने सा-यांनाच कवेत घेतले

शांतरसकवितामुक्तक

ओले केस

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
26 Sep 2019 - 5:18 am

केस ओले न्हालेते
आले प्रेमाचे भरते

(पावसात केस ओले
प्रेमाचे भरते आले) ( आपआपल्या मगदुराप्रमाणे केस ओले करावेत!)

शिडकावा ओल्या थेंबांचा
चिंब भिजवून देण्याचा

गोरी काया ओलेती
तुझे लावण्य दाखवती

गाली लाज आलेली
शृंगाराविना सजलेली

अशी सामोरी ललना
मन हरखले ना !

साडी लपेटून उभी
येते कवेत कधी?

- पाषाणभेद
२६/०९/२०१९

माझी कविताशांतरसकविताप्रेमकाव्य

इंद्रधनू

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
28 Jul 2019 - 4:01 am

इंद्रधनू

(आकाशात इंद्रधनुष्य पाहील्याने माझी मुलगी हरकली आहे अन ती मला बोलावते आहे.)

आकाशी ते इंद्रधनू आले
अहा!
चला बाबा बघा
ते पहा! ते पहा!!

कितीक मनोहर मोदभरे
आकाशीचे रंग खरे
कमान तयाची वाकली
माझ्यासवे पहा बरे

दवबिंदूवर प्रकाश पडूनी
आले ते वर उसळूनी
उल्हासीत झाले मी
चटकन या तुम्ही

वर्ण वरी घेई तांबडा
तदनंतर ये नारंगी पिवळा
चमके तो रंग हिरवा निळा
घेवूनी पारवा जांभळा
आकाशी व्यापली प्रकाशमाला

मुक्त कविताशांतरसकवितामुक्तक

निर्झर

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
15 Jul 2019 - 8:01 pm

निर्झर

निर्झर होता एक बारीकसा; हिरव्या डोंगरातून वाहतसा
असुनी तो लहान छोटा; ठावूक नव्हत्या पुढल्या वाटा ||

धरतीवरच्या वर्षावाने; जीवन त्याचे सुरू जहाले
धरणी जाहली माता ती; अल्लड खट्याळ उदकाची ||

नित नवीन भरून जलाने; ठावूक त्याला भरभरून वाहणे
चंचल उत्कट उल्हासीत पाणी; घेवूनी जायी दो काठांनी ||

पुढेच मिळाली सरिता त्याला; सवे वाहण्या पुसे खळाळा
विचारही न करता तो मिळाला; निर्मळ नदीत एकरूप जाहला ||

- पाषाणभेद
१५/०७/२०१९

Nisargशांतरसकविताजीवनमान