बातमी
Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ५
त्या सॅलरी स्लिप त्याने बँकेत जमा केल्यावर त्याने (आनंदाने) एक बातमी दिली तुझी सॅलरी २,००,००० पेक्षा कमी आहे त्यामुळे तुझं लोन फक्त १,७०,००० एवढच होऊ शकत... (काय???? बाकीचे १,८०,००० कुठून आणु.) मी माझ्या मैत्रिणीला फोन केला मी ३. ५० लाख जमा करू शकत नाही आहे. तर तू मला थोडी मदत करशील का या वर माझ्या चुलत सासूबाई आजारी आहेत माझा नवरा चेकबुक आताच घेऊन गेलाय त्यामुळे मी काही मदत करू शकत नाही तुझं तुला पाहावं लागेल. (अरे हि तर म्हणत होती कि तुझ्या पैशांची जबाबदारी मी घेते, कमी पडलं तर मी मदत करेन ) मी गप्प बसलेली पाहून ती बोलली अग त्या खूप सिरिअस आहेत त्यामुळे मी तुला मदत नाही करू शकत.
Qnet क्युनेट : आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी
आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी
शेवटी तो दिवस उगवलाच.....
त्यादिवशी सकाळी ऑफिसला निघतांना उंबरठ्यावरच एक डांग्या शिंक आली होती. त्या आवाजाने पॅसेजच्या सिलिंगवरील एक पालीचं पिल्लू अंगावर पडलं नाही पण घाबरून दरवाज्याच्या फटीतून घरामध्ये घुसलं. 'मार दिया जाय, या छोड दिया जाय' हा विचार करण्यात काही सेकंद गेली. ते पिल्लूही "चार दिवस रहाते, किडा-मुंगी खाते, धष्ट-पुष्ट होते, मग तू मला मार" असं चुकचुकत गेल्याचा भास झाला म्हणून लगबगीने दरवाजा लॉक करून निघालो. लिफ्टमधे माझ्याबरोबर तिन-चार काळे कपडेवाले होते. (थायलंडमधे राजासाठी वर्षभर "दुखवटा" असल्याने लोकांचे काळे कपडे नेहमीचेच झालेत).
आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे पुस्तकाला पारितोषिक
माझ्या अनुवादाला,
"आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे" ह्या
ब्रिगेडिअर हेमंत महाजन लिखित पुस्तकाला,
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे,
’लोकहितवादी रा.ब.गोपाळ हरी देशमुख’ पारितोषिक देण्याचे ठरले आहे.
इष्ट जनांस आमंत्रण आहेच.
नवाझ शरीफ और प्रेस नोट
प्रत्येक देश बऱ्याच वेळा बर्याच प्रेस नोट्स रिलीज करत असतो.
डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन ह्या गव्हर्मेंट डिपार्टमेंट कडे ते काम असते.
त्यात एखाद्या देशाबरोबर झालेला करार,एखाद्या माननीय परदेशी व्यक्ती चे अभिनंदन वगैरे बातम्या प्रसिद्धीला दिल्या जातात.
ईट्स रुटीन प्रोसिजर,त्या प्रेस नोट मध्ये अगदी संयमित,संतुलित आणी ऑफिशियल भाषा वापरलेली असते.
कणकवली येथे होणारे श्री सुभाष पाळेकर ह्यांची नैसर्गिक शेती विषयी व्याख्यानमाला....
प्रिय मिपाकरांनो,
दिनांक २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर ह्या दरम्यान श्री.सुभाष पाळेकर ह्यांची "नैसर्गिक शेती विषयी व्याख्यानमाला" कणकवली येथे होणार आहे.
अधिक माहिती साठी श्री.सुनिल सावंत (९९६९५३४४३९) किंवा श्री. अमोल पाळेकर (९८८१६४६९३०) ह्यांच्याशी संपर्क साधावा.
मी जाणार आहेच.
आपलाच,
(शेतकरी) मुवि
ता.क. ====> सध्या माझ्याकडे आंतरजालाची जोडणी नसल्याने, वेळ मिळेल तसा मिपावर येत जाईन.
{मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }
पेर्णा
"याड लागलं, याड लागलं" अशा फॉरिन ऑर्केस्ट्रासहीत मोबाइलची रिंग वाजली.
नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, सुरवातीला‘०७१५२’ आणि शेवटी डबल झीरो… अरे हा तर वर्ध्यावरुन आलेला, म्हणजे विदर्भातील दिसतोय. सोन्याबापू तर आला नाही ना सुट्टीवर? का कुणा विदर्भवासीवर अन्याव झाला आता?
‘हॅलो…’
आता कुणा टिपिकल वर्हाडी हेल कानावर पडणार म्हणून आनंद झाला.
21 ऑक्टोबर हुतात्मा स्मृती दिन
अजय-अतुल लाईव्ह वगैरे...!
नुकताच अजिंठा महोत्सवात सुप्रसिद्ध गायक-संगीतकार जोडी, अजय-अतुल यांच्या लाईव्ह कार्यक्रमात गाणे सुरु असताना मधेच ट्रॅक बंद झाल्याने गाणे थांबले आणि ही जोडी फक्त ओठ हलवत गाण्याचा अभिनय करत असल्याचे प्रेक्षकांना पहायला मिळाले. प्रेक्षकांना हा धक्का होताच, पण मोठ्ठ्या रकमेचे तिकीट घेऊन असे झाल्याने फसवणुकीची भावना झाली, आणि बरेच प्रेक्षक उठून गेले असे बातम्यांवरून समजते. कांही वृत्तवाहिन्यांच्या बातमीप्रमाणे ट्रॅक बंद पडल्यावर गायक आणि वादकांनी खरेच गायला-वाजवायला सुरुवात केली तेव्हा एनर्जी लेव्हल मधे कमालीचा फरक पडून गाणे नीरस झाले.