प्रेम कविता

कदाचित (भयगुढ कविता)

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जे न देखे रवी...
22 Feb 2017 - 11:00 am
कदाचित ही फक्त हवा असेल जी चाल करून येतीये विव्हळणाऱ्या जीर्ण फांद्यांना खिडक्यांवर फटकारतीये कदाचित हा फक्त पाऊस असेल जो ढगांना प्रसवतोय दाराछतातून टपटपून अंगावर बर्फशहारे आणतोय कदाचित ह्या फक्त सावल्या असतील ज्या श्वापदांसारख्या दिसताहेत सराईत शिकाऱ्यासारख्या मला चारीबाजूंनी घेरताहेत कदाचित हा फक्त कावळा असेल जो आत्ताच खिडकीवर धडकलाय रक्ताळलेली चोच आदळून काचांना तडे देत सुटलाय कदाचित हा फक्त भास असेल कुणीतरी जोरात किंचाळल्याचा आपोआप दिवे विझल्याचा अन मानेवरच्या उष्णगार श्वासांचा कदाचित भासच असेल हा कदाचित स्वप्न असेल कदाचित... ती आली असेल
प्रेम कविताभयानककविताशब्दक्रीडा

१०० नंबरी प्रेम

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जे न देखे रवी...
14 Feb 2017 - 10:47 am

---------------------------------------------
बायकांच्या बडबडीने जेव्हा
इच अँड एव्हरीजण कंटाळला
'रोज शंभरच शब्द बोलायचे'
सरकारने नियम काढला

मला फारसा त्रास नव्हता
नेहमीच मी कमी बोलायचो
गप्पा,भांडण,उपदेश
मोजक्या शब्दांत मांडायचो

नियम लागू व्हायच्या थोडं आधी
मला भलताच नाद लागला
एका गोग्गोड बडबड्या पोरीवर
नकळंत जीव जडला

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तिला
प्रपोज करायचं ठरवलं
शंभर शब्द काय बोलायचे
गणित मांडायला घेतलं

प्रेम कविताहास्यकविताप्रेमकाव्यभाषाशब्दक्रीडा

तुझ्या अंतरीची (चारोळी)

पराग देशमुख's picture
पराग देशमुख in जे न देखे रवी...
6 Feb 2017 - 3:44 pm

तुझ्या अंतरीची, मला जाण आहे;
जरी गीत माझे, तुला ताण आहे.
जरी ना निथळली, कधी कांत माझी;
तुझे पावसाळे, मला रोष आहे.
..............................................मुकुंद

अभय-काव्यकविता माझीप्रेम कविताभावकवितामुक्त कविताकविताचारोळ्याप्रेमकाव्यमुक्तकव्युत्पत्तीशब्दक्रीडा

कधीतरी.....

पराग देशमुख's picture
पराग देशमुख in जे न देखे रवी...
29 Jan 2017 - 3:41 pm

उकलत मनाची पाकळी
सांज हळवी होते; कधीतरी.....

भिजवून पापणी ओली
रात्र हळवी होते; कधीतरी.....

चुकवून पाहारे सारे
नजरा-नजर होते; कधीतरी.....

मोडून मनाची दारे,
तिची आठवण
उच ...!
येते;
ऊ...च...!!ऊ...च...!!!

(इतक्या रात्री कोण आठवण करतय कोण जाणे ?)
कधीतरी.....
-मुकुंद

gazalprayogअदभूतकविता माझीकाहीच्या काही कविताप्रेम कविताफ्री स्टाइलभावकवितामराठी गझलमुक्त कवितारतीबाच्या कविताअद्भुतरसकविताचारोळ्याप्रेमकाव्यमुक्तकगझल

म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....

पराग देशमुख's picture
पराग देशमुख in जे न देखे रवी...
27 Jan 2017 - 7:26 pm

अजून एक काव्यकथा घेऊन आलोय,
अजून एक हृदयव्यथा घेऊन आलोय.
वेदना जुनीच...,
पावसामुळे पुन्हा फुललेली,
कॉफीच्या वादळासह,
पुन्हा मनात सललेली.

अंगणभर पसरलेला पाऊस, कुंपणाशी गुंतलेला गारवा,
उंच भिंतीच्या आडोशाला, गारठलेला पारवा |
गारठलेला मी, अन् थिजलेल्या स्मृती,
जुन्या जखमा पालवण्याच्या, पावसाच्या या जुन्याच रिती ||
म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....

prayogकविता माझीकाहीच्या काही कविताप्रेम कविताफ्री स्टाइलभावकवितामुक्त कविताविराणीकरुणकथाकविताप्रेमकाव्यमुक्तकप्रतिशब्दशब्दक्रीडासाहित्यिक

स्पर्श वेडे

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
27 Jan 2017 - 12:29 pm

स्पर्श वेडे चांदव्यात रूतलेले
खुळ्या अंबरी भाव फुललेले

गेले ढळलेल्या टिपूर रानातूनी
कवडसे गुंतवीत शुभ्र घाटातूनी

शीळ घालीत पवनाच्या दारी
सुरांनी विणली नक्षी त्यावरी

झाकले आभाळ उधाणलेल्या तिमिरातूनी
किलबिल्या रात्री मोकाट फिरूनी

डोळ्यांत बिलगणारे ते काजळनाते
हसूनिया हे ह्रदयातूनी गाते

चांदण्यात उतरूनी आला मुलूख
सुटे गुंता नसे चांदणे नसे तिमिर
नक्षत्रे सारी फिकी ते तुझे चंद्रमुख

प्रेम कविताप्रेमकाव्य

भिजू दे निशा

अनिल इन्गले's picture
अनिल इन्गले in जे न देखे रवी...
27 Jan 2017 - 12:23 am

अंगणातील जाई हरवली सुगंधात
लोटूनी भय ये तू क्षणात

पांघरली कुसूमांनी रात्र काजळी
शहारतो गारवा राहूनी वल्लरीत
कोवळे चांदणे पानापानांत उतरले
लहरतो चांदवा पाहूनी जलात

चोरपाऊलांच्या मार्गातील धुंद झाली रेती
लाजिरे गुलाब हसले मोरपिसात
नजरेचे म्रूग लागले दौडू
सजे माणिक हिरव्या त्रूणात

ये सामोरी कर दूर चलबिचल
पायघड्या ठेवूनी उभा मी परसात
अधीर डोळ्यांत डुले काजवा
भिजू दे निशा दिव्य तुझ्या सहवासात

प्रेम कविताप्रेमकाव्य

भिजू दे निशा

अनिल इन्गले's picture
अनिल इन्गले in जे न देखे रवी...
27 Jan 2017 - 12:21 am

अंगणातील जाई हरवली सुगंधात
लोटूनी भय ये तू क्षणात

पांघरली कुसूमांनी रात्र काजळी
शहारतो गारवा राहूनी वल्लरीत
कोवळे चांदणे पानापानांत उतरले
लहरतो चांदवा पाहूनी जलात

चोरपाऊलांच्या मार्गातील धुंद झाली रेती
लाजिरे गुलाब हसले मोरपिसात
नजरेचे म्रूग लागले दौडू
सजे माणिक हिरव्या त्रूणात

ये सामोरी कर दूर चलबिचल
पासघड्या ठेवूनी उभा मी परसात
अधीर डोळ्यांत डुले काजवा
भिजू दे निशा दिव्य तुझ्या सहवासात

प्रेम कविताप्रेमकाव्य

ती एक वेडी

निओ's picture
निओ in जे न देखे रवी...
22 Jan 2017 - 5:26 pm

ती एक वेडी
जुन्या आठवणींचा कोष
मनाच्या कोपऱ्यात ठेवणारी
एक दिवस तिच्याही नकळत
हा कोष जाणिवेत आला
बघता बघता त्यातनं
एक सुंदर फुलपाखरू निघालं
तिच्या तळहातावर अलगद बसलं
अगदी विश्वासानं
ती कुतूहलाने त्याच्याकडे पाहत राहिली
त्याची ओळख पटवू पाहू लागली
हळूच त्याने पंख मिचकावले
तिला वाटलं
ते काहीतरी बोलतंय मिश्कीलपणे
ओळख पटली
ती हसली
तिच्या कल्पनेपेक्षाही ते आकर्षक निघालं
त्याच्या रूपानं हरखून गेली
जुन्या आठवणीत हरवून गेली
एकटेपणी त्याच्याच विचारात डुंबून गेली

कविता माझीप्रेम कविताभावकवितामुक्त कविताशांतरसकलाकविताप्रेमकाव्यमुक्तक

एका लग्नाची ऐकीव गोष्ट.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
9 Jan 2017 - 10:18 am

(गद्य,पद्य वेचे.)

तू मला पहायला आला होतास
सफेद प्यॅन्ट अन सफेद फुल शर्ट
काळा सावळा असलास तरी दिसलास स्मार्ट

तू नेसली होतीस अंजरी साडी
ब्लाऊझवर होती नक्षी वाकडी तिकडी
गोरीपान होतीस अन दिसलीस फाकडी

मी कांदेपोहे घेऊन आले होते
तू मान खाली करून बसला होतास
दोन चमचे खाल्यावर वर बघून हसलास
उजव्या गालावरच्या खळीमुळे मोहक दि़सलास

जाताना मी गेलो पोपटाच्या पिंजर्‍या जवळ
तुच पोपटाला विचारत होतीस कोण रे तो?
पोपट मला म्हणाला चोर चोर
ते ऐकून तू जोरात हसलीस

प्रेम कविताप्रेमकाव्य