काणकोण

मनाचा एकांत - सरोवरातील नाव

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
26 Nov 2016 - 12:46 pm

['मनाचा एकांत' ही शृंखला इथे संपत आहे.
सगळ्या कवितांना मनापासून दाद देणाऱ्या,
त्यातल्या काहींचे विडंबन पाडणाऱ्या सर्व रसिकजनांचे दिल से आभार! :)]

पहाडातला जख्ख दद्दू
सरोवरात नाव सोडून
पलीकडे निघून गेला
तेव्हापासून,
नाव हलत नाही, डुलत नाही,
पण जराशीही कुजत नाही!
सरोवरात कुणाला येऊ देत नाही,
सरोवरातून कुणाला जाऊ देत नाही!
सरोवरभर तिचीच प्रतिबिंबे खोलवर....
भरल्या सरोवरातल्या रित्या नावेसाठी,
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!

शिवकन्या

कविता माझीकाणकोणकालगंगाभावकवितामुक्त कवितासांत्वनाशांतरसवावरसंस्कृतीवाङ्मयकवितासाहित्यिकजीवनमानप्रवासभूगोल

(लिहितो विडंबन स्वतःच साठी)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
23 Nov 2016 - 12:51 pm

लिहितो विडंबन स्वतःच साठी
समोर दिसता कच्चा माल
शब्द कल्पना यमके सारी
आपसुक धरती त्यावर ताल

विषय निवडीचा नसे विकल्प
चारोळी, गजल की पोवाडा,
जो कविने विषय मांडला
त्यावरी केवळ तुटून पडा

वाचून किंवा दुर्लक्षूनही
डोळ्यांपुढती नाचत राही
मग डोक्याची होते मंडई
लेखणी खुपसून फाडून खाई

लिहा लिहा तुम्ही लिहा कविता
धीर जराही मनी न धरा!
जोरात चालूदे गिरणी तुमची
पिठही पाडा भराभरा

विषय सत्वरी ना मिळतो जर तर
उघडा गालीब किंवा ग्रेस
उडवा धुरळा यमकांचा की
वाचन करता यावा फेस

आरोग्यदायी पाककृतीकाणकोणकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडनागद्वारभूछत्रीअद्भुतरसइतिहासकृष्णमुर्ती

(काळी असे कुणाची)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
19 Nov 2016 - 10:11 am

लैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले....

काळी असे कुणाची, आक्रंदतात तेची,
मज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे,

सांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही,
ही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे,

काही करु पहातो, नसतात लोक तेथे,
पूसता कळे असे की, तो लायनीत आहे,

परीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे,
की भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे,

-(पैजारबुवा) आनंदीआनंद

mango curryअदभूतआता मला वाटते भितीकाणकोणकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडनागद्वारबालसाहित्यभूछत्रीवाङ्मयशेतीरौद्ररसबालकथाउखाणेशुद्धलेखनऔषधोपचारकृष्णमुर्ती

मनाचा एकांत - चिमण्या

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
23 Sep 2016 - 8:40 am

डाव्या हाताच्या मुठी एवढ्या चिमण्या
हा हा करतात
या जीवघेण्या ओसाडीत....
कुठे दाणे टिपत असतील?
कुठे पाणी शोधत असतील?
घरटे कुठल्या आडोशाला असेल?
यांच्यात यांचे दफन कसे करत असतील?
कोण करत असेल?
चिमण्या निमित्त असतात............
आपल्याच छाटलेल्या मनाचे
हे तासनतास भिरभिरणे असते.....
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!

---- शिवकन्या

अदभूतअनर्थशास्त्रअविश्वसनीयकविता माझीकाणकोणकालगंगाधोरणवावरसंस्कृतीवाङ्मयकवितासाहित्यिकसमाजजीवनमानभूगोल

... असंही होतं ना कधी कधी....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
17 Sep 2016 - 10:32 am

... असंही होतं ना कधी कधी....
अंगणातलं सुखाचं बी
बहरातली पाखरांची गाणी
हरवून जातात कुठंकुठं....
पण मनाचा सर्च कायम असतो
दिसलं जरी एखादं पातं हिरवंगार
मनातलं मांजर हसतंच कि मजेदार!

... असंही होतं ना कधी कधी....
बियांना कोंब येईपर्यंत
आपलाच नसतो पेशन्स !
दु:खाच्या माजणार्या ताणावर
आपलाच नसतो कंट्रोल!
वैफल्याने सगळंच उकरून फेकून देतो,
पण तशा वैराण रानातही
एखादे रानफुल हसून बोलतंच कि
एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि!
... असंही होतं ना कधी कधी....

अदभूतअभय-लेखनकविता माझीकाणकोणफ्री स्टाइलमुक्त कवितासांत्वनाधोरणवावरकवितामुक्तकसाहित्यिकजीवनमान

मनाचा एकांत - cursor च्या सुईने

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
13 Sep 2016 - 12:00 pm

cursor च्या सुईने
inbox मधील पत्रे
क्लीक्लिक्लीक्लिकत शेवटी
हव्या त्या पत्राशी आल्यावर,
अत्तराच्या डोळ्यांनी पहातवाचत,
blank page वर नजर खिळवून
काय काय लिहून पाठवायचे परत
याचे तासनतास जाळे विणतेच कि मन!
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी?

शिवकन्या

अनर्थशास्त्रकविता माझीकाणकोणवावरकवितामुक्तकसाहित्यिक

मनाचा एकांत - रवा आणि खसखस

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
2 Sep 2016 - 11:36 pm

रवा आणि खसखस
वेगवेगळे करायची
शिक्षा भोगताना,
सूक्ष्म नजरेने,
एकाग्र चित्ताने,
वेचत राहते मन
जनामनातले साम्यभेद
तासनतास,
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!

शिवकन्या

कविता माझीकाणकोणमुक्त कविताकविता

कोण?

मिसळपाव's picture
मिसळपाव in जे न देखे रवी...
26 Aug 2016 - 1:45 am

उन जळत रणरणे, मृग़जळास लांबवी
सकल जनही त्रस्त ते, दु:ख दाटले मनी

जीव कसा तगमगे, जन गृहात कुंठती
वाटसरू कुणी नसे, वाट उरे एकली

ग्रीष्माने त्रासून हा, आसमंत पेटवी
सूर्यही बघ जळतसे, सागरास आटवी

अवेळ हीच साधूनी, आस तुझी का गमे?
तृष्णा ही मज गिळे, कंठ तुझा शुष्कवी

भेटीलाच माझिया, सांग कोण परी निघे?
ग्रीष्माला वारूनिया, कोण सखी अवतरे?

काणकोणकविता

मनाचा एकांत - ब्लड

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
20 Aug 2016 - 2:21 pm

'ब्लड आहे..... फास्ट सोडून नाही चालत!'
मऊ शीर, तीक्ष्ण सुई
लक्क काळीज, डोळ्यात पाणी
थंड एसी, मंद दिवे
पांढऱ्या भिंती, एकट रात्री!
तासाला थेंबभर या गतीने
ठि ब क ते रक्त रात्रभर....
जखडलेल्या शरीराने
श्रमलेल्या डोळ्यांनी
हुं कि चू न करता
बघत राहतो आपण
रक्ताची journey........
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!

-- शिवकन्या

कविता माझीकाणकोणकरुणमांडणीवावरवाङ्मयकवितासाहित्यिकजीवनमानऔषधोपचार

सुखासन

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
12 Aug 2016 - 12:49 am

आले कोण गेले कोण
कवतुक आता वाटत नाही ,
कुणी थांबले हसून बोलले
मनात किणकिण वाजत नाही ,
पानाफुलापक्ष्यांसाठीही
दार सुखाचे उघडत नाही
.
.
.
इतके माणूस छिलून निघते
एकांताच्या सुखासनावर!

-शिवकन्या

कविता माझीकाणकोणमुक्त कविताकरुणवावरवाङ्मयकवितासाहित्यिकजीवनमान