ही बोधकथा सकाळ मध्ये पण आली होती. अर्थात काही बोधकथा या कधी पारंपारिक, कधी पाडलेल्या असतात. कुठलेही विचार मनात लोकांच्या मनात ठसवण्यासाठी बोधकथांचा खुप उपयोग होतो. पण प्रत्यक्षात 'कळतय पण वळत नाही 'अशी अवस्था असते त्या वेळी आपण नेमक्या कुठल्या बोधकथेचा वापर करतो कि करत नाही हे मह्त्वाचे. बर्याच वेळी आपली राजकीय विचारश्रेणीचा प्रभाव पाडण्यासाठी आता पाळलेल्या विद्वानांकडून अशा बोधकथा तयार केल्या जातात व प्रसारित केल्या जातात. पुर्वी राज्यकर्ते गुंड पाळत असत आता ते पुरेसे नसल्यावे विद्वान देखिल पाळले जातात. गोबेल्स तंत्रप्रणालीसाठी यांचा खूप उपयोग होतो.
प्रकाश घाटपांडे
चहा, बियर व नंतर लाल भडक कोल्हापूरी कट......... हे मात्र मस्त मिश्रण झाले आहे ह्या चर्चेत ;)
कधी तरी असा मीक्स रस घेऊन पाहवयास हवा !
पण चहा तर कुठला ही चालेल पण बियर कुठली चालेल ह्या मिश्रणला ?
राजे
(राज जैन)
( माझे विश्वप्रसिध्द, महानूभव, मानव श्रेष्ठ , मिसळपाव संस्थेमध्ये सर्वात लोकप्रिय, मराठी विश्वामध्ये विश्वविख्यात श्री श्री टीकाकार-१ ह्यांनी देलेली राजे ही नजर चूकी ने व कळपटलाने दिलेल्या दग्यामुळे प्राप्त झालेली ही पदवी आम्ही आजन्म आपल्या जवळ बाळगू !!!!! टीकाकार महाराजांना विजय असो ! )
कॉफीमध्ये मद्य मिसळले तर चालते, पण चहात चालत नाही असा आमच्या कॉलेज-कंपूतला (अवैज्ञानिक) शोध होता. नेलपॉलिशसारखा उग्र वास येणारे द्रव्यही घशाखाली ढकलू शकणार्या त्या कंपूकडून "चालत नाही" असा निर्णय आला, तो गंभीर मानला जावा. त्यामुळे कटाबरोबर चहा आणि बियर यांपैकी आमच्या टेबलावर एकच पाठवून द्या.
मराठी महाराष्ट्रातल्या कोल्हापुरातले एम सी नाही - हिंदी/पंजाबी "छावणी" राज्यातल्या 'पूना'तले ए एफ एम सी, अशी दोन व्याज अक्षरे!
खिशात पितृप्रेम खुळखुळे तोपर्यंत वसतीगृहावर उंची आय एम एफ एल ची सद्दी. महिन्याअखेरच्या ओहोटीत स्वस्त विषारी द्रवे कशात घातली तर झिंग येते ते प्रयोग. कोल्हापुरातही आमचे प्रयोगशील बंधू राहातात हे ऐकून त्या झणझणीत गावाबद्दल आदराच्या ठिकाणी आता आपुलकी निर्माण झाली आहे.
प्रतिक्रिया
बोधकथा
विद्वान
हो..
बियर
हा हा हा
चहा, बियर व
चहा आणि मद्य
भाऊ
नाही - पण कुठल्याही वसतीगृहावर होत असतील
पटले..
पूर्ण आयुष्याचं सार एका काचेच्या बरणीत चपखल बसलय!!
खुलासा..
वा... जीवनाचा संपुर्ण सार
हम्म! किती जरी व्यस्त असलं
बोधकथा
आयला