संडे स्पेशल (बटर चिकन)

स्वाती राजेश's picture
स्वाती राजेश in पाककृती
27 Jan 2008 - 2:32 am

बटर चिकन
साहित्यः
मॅरिनेशनः-
१/४ किलो बोनलेस चिकन पिसेस
१/४ टी.स्पून आलं पेस्ट
१/४ टी.स्पून लसूण पेस्ट
१/४ कप दही
चिमूटभर हळद
मीठ

ग्रेव्ही:-
१/२ कप बारीक चिरलेला कांदा उकडून घेणे.
१/२ टी.स्पून आलं पेस्ट
१/४ टी.स्पून लसूण पेस्ट
१ कप टोमॅटो प्युरी ( टोमॅटो उकडून साल काढून बारीक केलेले)
१टे.स्पून काजुची पेस्ट
१ टी.स्पून कसूरी मेथी
१टी.स्पून गरम मसाला
१/४ टी.स्पून धना जिरा पावडर
१/२ टी.स्पून लाल तिखट पावडर
१/४ कप क्रिम
२ टे.स्पून बटर
कोथिंबीर
मीठ

१.मॅरिनेशन चे सर्व साहित्य चिकनला लावून १ तास बाजुला ठेवावे.
२.उकडलेल्या कांद्याची पेस्ट करणे.
३.१टे.स्पून बटर घेवून त्यात मॅरेनेट केलेले चिकन ३/४ फ्राय करावे व बाजूला ठेवावे.
४.उरलेले बटर घेऊन त्यात कांदा पेस्ट, आलं-लसूण पेस्ट घालणे, कांदा गुलाबी होईपर्यंत परतणे. नंतर त्यातगरम मसाला, धणे-जिरे पावडर,तिखट आणि कसुरी मेथी (थोडी तव्यावर परतवून हाताच्या तळव्यावर बारीक करून टाकणें).
५नंतर टोमॅटो प्युरी,मीठ, काजु पेस्ट आणि चिकन पीसेस घालून झाकुन ग्रेव्ही शिजवायला ठेवणे.
६ग्रेव्ही तील थीक झाली कि क्रिम घालून २/३ मिनिटे शिजवणे आणि कोथिंबीर घालुन सर्व्ह करणे.

टीप;
वरील चिकन प्रथम शिजवून न घेता मीठ व तेलाचा हात लावून ओव्ह्न मध्ये भाजून घ्यावे व सोलून मांसल भाग काढून घ्यावा.
दोन्ही पैकी कोणतीही पद्धत अवलंबली तर चालते.
ओव्हन मध्ये भाजलेल्या चिकनची खमंग चव लागते.

पाकक्रियाआस्वादमांसाहारीचिकनपंजाबीग्रेव्ही

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

27 Jan 2008 - 2:35 am | इनोबा म्हणे

स्वातीजी... बटर चिकन ही तर माझी कमजोरी आहे.
धन्यवाद!

(चिकनवेडा) -इनोबा

प्राजु's picture

27 Jan 2008 - 2:39 am | प्राजु

मस्त रेसिपी.
खरं तर आजपर्यंत मी नॉनव्हेज पदार्थ केले नाहीत कधी. पण तुझी रेसिपी वाचून करावे असे वाटू लागले आहे. नाही जमलं तर तुझ्याकडे यावे असा विचार आहे. :)
- प्राजु.

विसोबा खेचर's picture

28 Jan 2008 - 11:51 am | विसोबा खेचर

स्वातीताई,

नेहमीप्रमाणेच सुंदर पाककृती...!

आता पुढची पाककृती कुठली? आता मिपाकरांना काय खिलवताय याची वाट पाहतो आहे! :)

आपला,
(खादाड) तात्या.

तरी एक खाद्यवेडा म्हणून ही कृती वाचली.
मॅरिनेट केल्यावर चिकन फ्रिजमधे ठेवावे असे काहीसे माझ्या मावसभावाशी बोलतानाचे स्मरते - कारण बाहेर ठेवल्यास, लावलेल्या मिठामुळे त्याला किंचित पाणी सुटण्याची शक्यता असते.
बरोबर की चूक आपण सांगू शकता.

चतुरंग

स्वाती राजेश's picture

29 Jan 2008 - 3:44 pm | स्वाती राजेश

आपण जरी चिकन/मटण मॅरिनेट केले तरी तरी ते रॉ असते.
ते फ्रिज मध्ये ठेवावे कारण This procedure is essential to reduce the risk of food poisoning: chickens are potential carriers of salmonella and if birds are cooked from frozen state there is the risk of the requied degree of heat to kill off salmonella not reaching the centre of the birds.
रॉ मटण हे बॅक्टेरीया पसरवू शकतात.
म्हणून खाली दिलेल्या काही गोष्टी पाळाव्यात..
१.नेहमी चंगल्या क्वालीटीचे /माहिती तील दुकानातून मटण/चिकन आणावे.(refrigerrated)
२.आणलेल्या दिवशी वापरावे किंवा फ्रिज करावे.झाकून ठेवावे.
३. मटण /चिकन शिजवल्यानंतर १ तासात वापरावे किंवा थंड झालेवर refrigerrate किंवा फ्रिज करावे.
४.परत वापरताना थॉ करून वापरावे.

म्हणून मोठ्या होटेल्स मध्ये मटण्/चिकन मॅरिनेट करून फ्रिज मध्ये १०/१२ तास ठेवतात.
फ्रिज मध्ये ३० तास त्याला काही होत नाही असे एका पुस्तकात वाचले आहे.

धोंडोपंत's picture

29 Jan 2008 - 1:00 pm | धोंडोपंत

स्वाती ताई,

अतीव सुंदर पाककृती. क्या बात है |

तुमच्यासारख्या सुगरणीकडून अशाच उत्तमोत्तम पाककृती मिपावर येत राहोत.

आपला,
(खवैय्या) धोंडोपंत

झकास कोंबडीवड्याची पाककृती येऊ द्या. वडे हळद घातलेले बरं का?

आपला,
(भुकेला) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

स्वाती राजेश's picture

29 Jan 2008 - 3:56 pm | स्वाती राजेश

धोंडोपंत भाऊ,
तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल.

इथे एवढे खवय्ये असतील याची कल्पना नव्हती.
तात्या , प्राजु, चतुरंग आणि विनायक यांचीही मी आभारी आहे.
मी तुमच्या रेसीपी च्या फर्माइशी पुर्ण करण्याचा करण्याचा प्रयत्न करेन.