होळी आली की आपोआप डोळ्यासमोर येतं ते म्हणजे पुरणपोळी, रंग, मौजमजा आणि थंडाई...... :)
तसं बघायला गेलं तर थंडाई राजस्थानातला अतिशय लोकप्रिय पेयपदार्थ. महाशिवरात्रीला याचा महादेवाला नैवेद्य दाखवला जातो. उत्तर भारतात थंडाईचं खास महत्व असतं ते होळीच्या दिवशी. या दिवशी थंडाईमधे भांग मिसळली जाते.
या सगळ्यामुळे होळीचा आनंद द्विगुणीत होतो....पुरणपोळीची पाककृती यापुर्वी मिपावर दिलेली आहे (http://www.misalpav.com/node/1371)त्यामुळे होळीची दुसरी खासियत आज देण्याचा प्रयत्न करणार आहे.
साहित्य :
१ लिटर दूध
१/२ कप साखर ( दळुन घेतलेली )
१०-१२ काळीमिरी
थोडंस केशर
१/४ कप बदाम
२ मोठे चमचे खसखस
२ मोठे चमचे बडिशोप
१/२ मोठा चमचा वेलची पावडर
१८-२० पांढरी मिरी
कृती :
वरील सर्व साहित्याची मिक्सरमधुन अगदी बारीक पुड करुन घ्या. दुध उकळुन पुर्णपणे गार करुन घ्या. गार झालेल्या दुधात वरील पुड घालुन फ्रिजमधे ३-४ तासासाठी गार करायला ठेवा. नंतर या थंडाईसोबत होळीची मजा लुटा. :)
फोटो अंतरजालावरुन साभार !
फोटो अंतरजालावरुन साभार !
वाचने
11835
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाय !!!! मार
वा !! थंडाई
>>दाम्या
In reply to वा !! थंडाई by टारझन
गचकलो !!!!!!!!!! *
थंडावलो
मिन्टे... १०
In reply to थंडावलो by परिकथेतील राजकुमार
अगदी
In reply to मिन्टे... १० by मृगनयनी
आवडली
काय होणार मग..
In reply to आवडली by रेवती
तात्या,
In reply to काय होणार मग.. by प्राजु
घ्यायला
In reply to तात्या, by मिंटी
थोडं
In reply to घ्यायला by प्राजु
सही
असेच
अगं काळी
In reply to असेच by शितल
ओ.के. आता
In reply to अगं काळी by मिंटी
नक्की ये.....
In reply to ओ.के. आता by शितल
पौष्टीक...
या गरमीला उतारा..
छान
छान
खास उन्हाळयासाठी