एकदा मला झाली सर्दी
नाकात झाली फारच गर्दी
नाकावाटे फर्र् फर्र..
चालू नुसते दिवसभर
खॉक् खॉक् अधून मधून
त्यावर औषध सुंठ-लसूण
बेजार खोकून नाक पुसून
काय काय घेता मधामधून
गणपती बापा मोरया
सर्दीतून मज तार या
तारलेस जर सर्दीतून
शंभर मोदक देईन आणून
बाप्पा म्हणाला खरं आहे तुझं
ऐकून तर घे तू म्हणणं माझं...
मलाही झाली आहे सर्दी
नाकात झालीय् फारच गर्दी
एवढसं नाक तुझं तर..
माझा जरा विचार कर...!
-झेल्या
प्रतिक्रिया
19 Jan 2009 - 10:46 am | आपला अभिजित
शेवट फार मस्त आहे!
जे न देखे रवी, ते देखे कवी!!
-अभिजित.
(मिपा वरच्या आमच्या सदस्यखात्याची एक्स्टेंडेड आव्रुत्ती )
19 Jan 2009 - 11:01 am | डोम्बिवली फास्ट
छान आहे मित्रा कविता,
तुला अनुभव आहे वातट॑ सर्दीचा, २ दिवस मला ही होती सर्दी औषध घेतल॑ ६ डोस, प्रत्येकी ४ गोळ्या २ दिवस .
डोम्बिवली फास्ट :- 9.33 pm. @ CST
19 Jan 2009 - 10:00 pm | अनामिक
बाप्पाला स्वेटर घालणारे तुम्हीच तर नाही ना?
अनामिक
20 Jan 2009 - 10:26 am | झेल्या
बाकी जबरदस्त टायमिंग साधून हा प्रश्न विचारलात...
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
20 Jan 2009 - 11:21 am | सुनील
बाप्पाला स्वेटर घालणारे तुम्हीच तर नाही ना?
=)) =)) =))
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
20 Jan 2009 - 5:20 pm | लिखाळ
हा हा हा .. मस्त आहे कविता...
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
बाप्पा शिंकला तर काय होईल ? :)
21 Jan 2009 - 1:08 pm | झेल्या
सर्वांचे मनापासून (फर्रर्रर्र्) आभार..!
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
21 Jan 2009 - 4:04 pm | अश्विनि३३७९
मजा आली..
21 Jan 2009 - 4:06 pm | अश्विनि३३७९
मजा आली..
24 Jun 2012 - 3:09 pm | मन१
:)