सूर्यकमळ
सखे, तुझ्या अंतरीची मी तळमळ झालो
तुझ्या कोमल हृदयाची अस्वस्थ कळ झालो
नजर तुझी सैरभैर शोधत राहते मला
मी देहातून तुझ्या वाहणारी रक्त सळसळ झालो
तू पिऊन नजरेने मला होतेस तृप्त तृप्त
मी प्रीतफुलोरी जगण्याचे तुझ्या बळ झालो
तू नित्य करतेस आराधना प्रीतीची माझ्या
मी काळजाचा तुझ्या नितळ तळ झालो
तुझ्या निखारल्या चेहऱ्यावर माझ्या आठवांचे मधुर भाव
मी तुझ्यात वाहणाऱ्या प्रीतझऱ्याची खळखळ झालो
फुलोर हसते भाळी तुझ्या माझ्या नावाचे कुमकुम लाल
मी कपाळीचे तुझ्या सूर्यकमळ झालो
- सुनील दौलत खोडके
वाचने
779
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आवडली...
छान.
धाडसी अहात.