Skip to main content

पाऊले चालती … विडंबन

लेखक OBAMA80 यांनी शुक्रवार, 17/05/2024 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊले चालती बीजेपीची वाट सद्य पक्षाची सोडूनिया साथ गांजुनिया भारी इडी चौकशीने पडता हातात बेड्यांची माळ पाऊले चालती … अण्णा आबा नेते कार्यकर्ते ते पाहुनिया सारे फिरविती पाठ पाऊले चालती … येता होकार श्री पक्षश्रेष्ठींचा तसा चौकशीचा व्हावा नायनाट पाऊले चालती … सारे शांत होता पुन्हा लागे ओढ तस्सा वाहू लागे भ्रष्टाचाराचा पाट पाऊले चालती …
लेखनविषय:

वाचने 1606
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

व्वा ... एकदम सही ! 257 वाचने अन एकही प्रतिसाद नाही ! कमाल आहे मिपाकरांची !

धन्यवाद चौथा कोनाडा, मुक्त विहारि आणि अहिरावण