राजमा गस्सी
वाचने
8694
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
भारीच झालीय की गस्सी. मात्र ह्यात श्रावणघेवडा असतोच आणि त्याने अजून भारी चव येते.
In reply to भारीच झालीय की गस्सी. मात्र by प्रचेतस
श्रावण घेवडा वाळल्यावर राजमाच होतो ना :)
धन्यवाद!
In reply to श्रावण घेवडा वाळल्यावर राजमाच by Bhakti
पण तो हिरवा शेंगेचा अजून भारी
काय झटपट पदार्थ होत आहेत!!
नवीन प्रयोग आवडला.
बाकी राजमा वेगळा आणि श्रावण घेवडा वेगळा. गस्सी प्रकार विडिओतून कळला परंतू मला कडधान्ये उसळ स्वरुपातच फार आवडतात. त्यात त्यांचा खमंगपणा खुलतो. सिंधी पदार्थ 'दाल पकवान' मधली दाल ( चणाडाळ किंवा मूग उसळ) पाहा.
राजमा उसळ जेव्हा हिमाचल प्रदेश किंवा काश्मिरी पद्धतीने होते ती अप्रतिम लागते. त्या उसळीत राजमाच चालतो इतर डाळी चालणार नाहीत. एकदा का असा राजमा भात खाल्लात तर पुन्हा कधी राजमा इतर भाज्यांत घालणार नाहीत.
पुरी,पोळी,याबरोबर खाण्याची दक्षिणेकडची भाजी म्हणजे नारळाचे दूध घालून केलेली रस्सा भाजी. होस्पेटला खाल्ली होती.
या गस्सीबद्ल पुन्हा शाबासकी.
नवीन वर्षासाठी एक गोड पदार्थ(स्वीट डिश)करून पाहा.
१) सुके जरदाळू आणि सुके अंजिर (चार चार किंवा सहा सहा घेणे.)
२) थोड्या पाण्यात थोडीच साखर टाकून सहा तास भिजवणे. मऊ झाले पाहिजेत.
३) जरदाळूंना एक काप देऊन बीबदाम बाजूला काढून अंजिरांसह त्याच पाण्यात दहा मिनीटे शिजवणे. पाणी आटले तर उत्तम. गार करणे.
४)दूध आणि पाण्यात कस्टर्ड पावडर (मक्याचे पीठ असते सुवासिक पिवळे) लावून शिजवून तयार करणे. साखर फार घालायची नाही.
५)एका डिशमध्ये दोन दोन जरदाळू,अंजीर ठेवून त्यावर तयार झाले कस्टर्ड टाकून खायला देणे.
( साखर फार घालून जरदाळू/अंजिरांचा मूळ गोडवा घालवायचा नाही.)
[ ही डिश आमच्या ऑफिस कॅन्टिनला अधुनमधून देत असत जेवणाच्या थाळी बरोबर अनलिमिटेड].
In reply to नवीन वर्षासाठी एक गोड पदार्थ by कंजूस
मस्तच! नक्की बनवेल.
अगदी अगदी. मी हेच म्हणणार होतो.
काश्मिरातील चावल राजमा ,पृथ्वीवरील स्वर्गातले स्वर्गीय जेवण.
आता मिस करतो. त्याच्या जागी आता महाराष्ट्रात मिसळपाव शोधतो.
वाह गस्सी आवडली.
मी अशाच रेसिपीने बऱ्याच रसभाज्या बनवते पण यामध्ये गाजर आणि उडीद-हरभरा डाळ जास्तीची आहे.
सेम असंच करून बघेन आता.
राजमा बनविण्याची नवी पद्धत आवडली.
लवकरच करून बघेल
राजमा गस्सी भारी दिसत आहे.
राजमा मी कधीतरी खातो पण त्याचा विशेष चाहता नाही. मसाल्यात
१/२ चमचे मेथी दाणेवाचल्यावर पदर्थाला थोडी कडवट चव येइल की काय असा प्रश्न पडला...
In reply to राजमा गस्सी भारी दिसत आहे. by टर्मीनेटर
प्रमाण कमी करूया किंवा नाही वापरले तरी चालेल :)
भारीच झालीय की गस्सी. मात्र