✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

खेळीया शब्दांचा

क — कर्नलतपस्वी, Sat, 08/05/2023 - 09:19
कसे स्मरतात शब्द त्यांना नित्य कवीता बांधती त्याच वाटा, त्याच लाटा, तोच चंद्रमा अन् त्याच चांदराती शिशिर तोच ,वसंत तोच,तेच क्षितिज, भुवरी टेकले उगवती अन् मावळती तीच,अंबरात तेच रंग पेरले गुंजारव तोच, तोच मधुप, तीच राधा बावरी तोच कृष्ण सावळा, तरी नित्य वेगळे कवन यावरी ‐------------------------------------------------ भरतीचा रौद्र रूप,परतीचा अंतरंग दावतो कर्कटांनी रेखाटलेला किनारा नित्य नवा भासतो कधी पूर्ण चंद्र,कधी चंद्रकोर कधी लखलखत्या चांदण्या घन तमीचा शुक्र तारा, प्रेरणा कवन बाधंण्या इवल्याशा पावलांनी कृष्ण दुडूदुडू धावतो क्रदंनी सावळ्याच्या सुर बांसूरीचा घावतो शिशिर तोच,तोच वसंत,कालचक्र धावते सृजन,विजन नित्य तरीही, रोज नवे भासते मुक्त छंदी मी असा अन शब्द माझे तोकडे शब्दांच्या खेळीयांचे वेगळेपण घाली मज साकडे.

प्रतिक्रिया द्या
6368 वाचन

💬 प्रतिसाद (10)

व्वा...! सुरेख काव्य

प्रचेतस
Sat, 08/05/2023 - 16:06 नवीन
व्वा...! सुरेख काव्य कर्नलसाहेब.
शिशिर तोच,तोच वसंत,कालचक्र धावते सृजन,विजन नित्य तरीही, रोज नवे भासते
हे खूप आवडले.
  • Log in or register to post comments

खूप सुंदर काव्य.

चित्रगुप्त
Sat, 08/05/2023 - 16:48 नवीन
'नित्य कविता बांधणारे' कवी त्याच त्याच विषयांवर 'नित्य वेगळे कवन' कसे रचू शकतात, या आदरयुक्त कौतुकात किंचित शालजोडीतीलही दिल्यासारखे वाटले. तेही मस्त.
  • Log in or register to post comments

मुक्त छंदी मी असा अन शब्द

सागरसाथी
Sat, 08/05/2023 - 19:38 नवीन
मुक्त छंदी मी असा अन शब्द माझे तोकडे शब्दांच्या खेळीयांचे वेगळेपण घाली मज साकडे माझं पण असंच असते.... इवली माझी झोळी आणि शब्द माझे तोकडे, सुगरणीच्या कौशल्याने कोंड्याचा मांडा घडे.
  • Log in or register to post comments

मस्त कविता.

विवेकपटाईत
Sat, 08/05/2023 - 21:12 नवीन
मस्त कविता.
  • Log in or register to post comments

कवीचे वेगळेपण...

कर्नलतपस्वी
Mon, 08/07/2023 - 08:23 नवीन
ना धो महानोर यांच्या शब्दात. https://youtu.be/6XmUaYiy3Xk
  • Log in or register to post comments

शेवटची ओळ...

कर्नलतपस्वी
Mon, 08/07/2023 - 08:26 नवीन
शब्दांच्या खेळीयांचे वेगळेपण घाली मज साकडे. पुन्हा वाचताना असंबद्ध आहे असे वाटल्याने खालील बदल केलाय. शब्दांच्या खेळीयांचे वेगळेपण कोड्यात मजला टाकते .
  • Log in or register to post comments

शब्दांच्या खेळीयाचे वेगळेपण घावले...

कर्नलतपस्वी
Mon, 08/07/2023 - 10:51 नवीन
शांताबाई शेळके यांचे शब्द. तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी एकांती मजसमीप तीच तूहि कामिनी तीच तूहि कामिनी ! सारे जरि ते तसेच धुंदि आज ती कुठे ? मीहि तोच, तीच तूहि, प्रीति आज ती कुठे ? - ग दि मा चें शब्द नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी ..... अनादि चंद्र अंबरी अनादि धुंद यामिनी यौवनात तू नवी मदीय प्रीत-स्वामिनी घर न प्रीतकुंज हा बैस ये सुहासिनी बैस ये सुहासिनी नवीन आज चंद्रमा अद्भुत आहे ना. म्हणून शब्दांचा खेळीया.
  • Log in or register to post comments

हिंदी चित्रपटातली अशी गीते

चित्रगुप्त
Mon, 08/07/2023 - 14:09 नवीन
आता एकदम आठवत नाहीयेत पण हिंदी चित्रपटातली सुद्धा अशी पुष्कळ गाणी असतील. विषय रोचक आहे. मागे कोणत्यातरी लेखात मी 'दिल' हा शब्द असलेली अनेक गाणी सांगितली होती ते आठवले.
  • Log in or register to post comments

सुंदर सुरेख

चौथा कोनाडा
Fri, 08/11/2023 - 21:32 नवीन
व्वा, कर्नलसाहेब, सुंदर सुरेख रचना !

&#128150 ;

एक शंका कुणी सोडवू शकतील का ? बदाम स्मायली ही चिन्हे का येत नाहीत ? पुर्वी ते वापरत वापरत मी फॅन झालो होतो !
  • Log in or register to post comments

आवडली!

रंगीला रतन
Fri, 08/18/2023 - 05:29 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा