Skip to main content

अद्भुताचे निळे पाणी

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 31/12/2021 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीच्या अंगणात अठ्ठेचाळीस स्तंभांचा स्वर-व्यंजनी महाल माझ्या माय कवितेचा नभापार पोचतसे त्याची बेलाग ही उंची रेलचेल महालात जे न देखे रवि त्याची महालात जाण्यासाठी जिना जपल्या शब्दांचा आणि उतरण्या साठी सोपान हा गहनाचा चुनेगच्ची सौधावर नवरस पुष्करणी पितो मन:पूत तेथे अद्भुताचे निळे पाणी परवलीची एकच खूण इथे चालतसे एका हृदयीचे दुज्या सोपवावे लागे पिसे
लेखनविषय:

वाचने 2594
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

काय राव ! ह्या कवितेचे ओल्डमॉन्कचे लाल पाणी > हे नॅचरल विडंबन आहे ह्या कवितेचे अन तुम्ही म्हणता की दारु हा विषय वापरु नका विटंबनास ! श्या , काय राव , आता काय करायचं !

In reply to by प्रसाद गोडबोले

काय राव ! ह्या कवितेचे

(ओल्डमॉन्कचे लाल पाणी)

हे नॅचरल विडंबन आहे ह्या कवितेचे अन तुम्ही म्हणता की दारु हा विषय वापरु नका विटंबनास ! श्या , काय राव , आता काय करायचं !

परवलीची एकच खूण इथे चालतसे एका हृदयीचे दुज्या सोपवावे लागे पिसे
खूप छान!