काही महत्वाचे
१. मिपाकर हा फेसबुक समूह.
फेसबुक नियमितपणे वापरणार्या मिपाकरांनी इथे अवश्य सामील व्हावे.जगभरच्या मिपाकरांना जोडण्यासाठी हा प्रायव्हेट समूह आहे.याचा उपयोग असा की काही चांगला वाचनीय धागा असल्यास इथे सांगावे.साधारण धाग्याचा विषय सांगितल्यास अजून चांगले.साहजिकच फेसबुक लगेच त्याचे नोटिफिकेशन मिपाकर्स ग्रुपच्या सदस्यांना पाठवते.यामुळे धाग्याचे वाचक वाढतील शिवाय धागाविषयासंबंधी माहिती असणारे अजून काही माहिती धाग्यावर देतील.काही वेळा मिपाकरांच्या कामाचे असे विषय जे मिपावर काही कारणाने चर्चिणे शक्य नाही किंवा ज्याचे निवेदन देता येणे शक्य नाही त्याबद्दलही इथे सांगता येईल.अजूनही बरेच फायदे यामुळे होऊ शकतात.
https://www.facebook.com/groups/163835483668577/?ref=share
----------------------------------------------------
२. Simple Notepad App
मिपावर क्रोममधून लिहिताना बरेचदा कटकटीचे होते.मागचे नि पुढचे अक्षर मिक्स होते.ते खोडत बसावे तर अजून काही फजिती होते.या सगळ्या तापाऐवजी ही खाली दिलेली अॉफलाईन अँड्रॉईड अॅप वापरुन पहा.लेखन साठवून ठेवणे,लेखन सुलभता,भरपूर सेटींग्ज असे बरेच फायदे या अॅपचे आहेत.वापरा म्हणजे कळेलच.
https://play.google.com/store/apps/details?id=org.mightyfrog.android.simplenotepad
(तळटीप: याची जाहिरात केल्याबद्दल मला काहीही आर्थिक लाभ मिळत नाही.केवळ मिपा लेखनसुलभ नसल्याने मिपावर न लिहिणार्या मिपाकरांना लेखनसुलभता मिळावी यासाठी सुचवत आहेत.)
---------------------------------------------------
३. Lipikaar Marathi App
देवनागरीतून मराठी लेखन वेगाने करण्यासाठी ही खाली दिलेली अँड्रॉईड अॅप मी बर्याच वर्षांपासून वापरतो आहे.यामुळे एकंदरीतच टायपिंगचा वेगही वाढतो असे ज्यांना ज्यांना मी या अॅपबद्दल सांगितले त्यातल्या बर्याचणांनी सांगितले आहे.आपणही वापरुन पहा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.lipikaar.android.keyboard.marathi
(तळटीप: याची जाहिरात केल्याबद्दल मला काहीही आर्थिक लाभ मिळत नाही.केवळ आंजावर देवनागरीतून लेखनाचा वेग वाढावा यासाठी सुचवत आहेत.)
प्रतिक्रिया
धन्यवाद
qक्रोम मधुन मराठी आरामात टाईप
धन्यवाद, उपयुक्त माहिती इथे
मी मिन्ग्लिश अनुप्रयोग
गुगल हँडराटींग बेस्टे !