मोगँबो - ७

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
8 Apr 2020 - 11:53 pm

वर पाहिल्यावर ती कालची बाई जीना उतरत होती. खूप घाबरले. तीने मला पहायच्या आत पळायला हवे. मी स्टेशनच्या दारातून बाहेर पडले.आणि बाहेरच्या गर्दीत मिसळले. भुकेने अंगात त्राण नव्हते. चक्कर येत होती डोळ्यापुढे अंधारी येत होती तरीही चालत राहीले. पळत राहीले. आणि या दादांच्या गाडीला धडकले."
आशा सांगत होती . ऐकणारे नि:शब्द झाले होते.

मागील दुवा http://misalpav.com/node/46323

आशाचे बोलणे संपले . पण सगळे अजूनही त्याच शॉक मधे.
सारंग ने ही शांतता भंग केली.
ही जेंव्हा माझ्या बाईकला धडकली तेंव्हाच ठरवले आपल्याच वयाची आहे ही. हीची काहीतरी मदत करायची.
" अरे मदत ठीक आहे . पण हीला इथे आणायचे म्हणजे" कोणीच न विचारलेला पण प्रत्येकाच्या मनात आलेला प्रश्न हा प्रश्न विचारला असता तर इतरांनी स्वार्थी म्हंटले असते या भितीने कोणीच बोलले नाही.
" मी हीला इथे का आणली हेच विचारणार आहात ना सगळे " सारंगनेच ती कोंडी फोडली.
" अरे तसे नाही, पण यात आपण काय मदत करणार. "
" बरोबर मलाही हाच प्रश्न आहे. पण आपण सगळ्यांनी मिळून याचे उत्तर शोधायचे आहेच आपण तीला काय मदत करू शकतो हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे." सारंग.
" हे ही आपल्याच वयाची मुलगी आहे. आपली बहीण किंवा एखादी मैत्रीण जर काही अडचणीत असेल तर आपण मदत करूच ना हा विचार करुया."
" अरे पण काय मदत करायची ते तर सांग ना" खरे तर
" हे बघा सोल्युशन देण्याअगोदर प्रॉब्लेम काय आहे ते नीट माहीत असायला हवे." युसूफ कडून मॅथ्स च्या वाडेकर सरांचे लाडके वाक्य ऐकल्यावर वातावरणातला ताण जरा कमी झाला.
" बरोबर हीला काय प्रॉब्लेम्स आहेत ते कळाले तर सॉल्व करता येतील."
हे बरोबर आहे.
माझ्या मते तीचा सर्वात पहिला प्रॉब्लेम आहे तो म्हणजे तीचे नातेवाईक सापडेपर्यंत तीला रहायला सुरक्षीत जागा.
दुसरा प्रॉब्लेम म्हणजे तीच्या रोजच्या जेवणाखाण्याचा .
आणि तीच्या कपड्यांचा.
कपड्यांचा प्रश्न आम्ही सोडवू. आमचे ड्रेस चालतील
सगळे बोलत होते. पण आशा गप्पच होती. आमचे बोलणे ऐकून तीने हातात चेहेरा लपवला. काही वेळ तीचे शरीर नुसते हलत होते. स्फुंदून स्फुण्दून ती रडत होती.
"काय झाले .. रडायला. काही चुकले का आमचे" मीनाला आपले काय चुकले तेच समजत नव्हते.
" ए कळते का तुम्हाला. काही .कोणी प्रॉब्लेम्स असे जाहीर पणे सांगतं का? संध्याने आशाची मनस्थिती समजत तीच्या पाठीवर थोपटले. आशा संध्याला गळामिठी घालून रडू लागली.
"सर्वात महत्वाचे म्हणजे हीच्या रहाण्याचा प्रश्न . तो कसा सोडवायचा. " पक्या ने विचारलेला मुद्दा योग्य होताच पण महत्वाचाही होता. आणि यावर कोणाकडे काही उत्तरही नव्हते.
"आपण मोगँबो सरांना विचारू या का. त्यांच्याशी बोलून लेडीज हॉस्टेल वर काही सोय करता येईल का पाहूया."
"आणि सर चिडले तर. ! त्यांनी समजा विचारले की तुम्हाला कशाला या भानगडी हव्या आहेत तर काय करायचे? " संध्याला सरांना ट्रीप बद्दल विचारले होते त्यावेळचा अनुभव आठवला.
" चिडले तर त्यावेळेस पाहू. आत्ता ते चिडतील की कसे तेच माहीत नाहिय्ये. जे होईल की माहीत नाही ते तसेच होईल असेच का गृहीत धरून का चालायचे. लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्षन आहे हा. तुम्ही पॉझीटीव गोष्टी धरून चाला. त्या तुम्हाला मिळतीलच. सिक्रेट सिनेमात सांगितलय हे."
बरोबर आहे युसूफ तुझे आपण सरांना विचारूया.
"अरे पण आपण ते उद्या विचारणार. आजचे काय. आज ही कुठे राहील. " पक्याची शंका
" पक्या तू नुसते प्रश्न उभे करतोस. प्रश्नाऐवजी उत्तरे शोधत जा. सगळे प्रश्न सुटतील" पक्याच्या प्रश्नामुळे गण्या वैतागला. पण त्यालाही हा प्रश्न पडला होता.
युनिव्हर्सिटीच्या पेपरात विचारलेल्या प्रश्नांचे एक असते. २१ अपेक्षीत प्रश्न सम्चात ते कधीतरी येवून गेलेले असतात. त्यांची तयारी केलेली असते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या प्रश्नांची उत्तरे निदान पेपर तपासणारालातरी येत माहीत असतात. इथे एकाचे उत्तर येतेय असे वाटले की दुसरा प्रश्न तयार होत होता.
ती येईल माझ्याबरोबर. पी जी च्या आंटीना सांगेन की ही माझी आत्ते बहीण आहे म्हणून. मीना ने हा प्रश्न आजच्यापुरता तरी सोडवला.
आणि त्यानी नाही घेतलं घरात तर?
असे नाही होणार. रात्री अपरात्री मुलींना कोणा घराबाहेर नाही काढत. आणि थोड्या खडूस असल्या तरी त्या तशा चांगल्या आहेत. अगदीच पुणेरी सदाशिवपेठी नाहीत." मीनाने पक्याला टोमणा मारायची संधी सोडली नाही.
"पण आपल्याला उद्या सरांना विचारायलाच हवे. आणि नुसते विचारायलाच नव्हे तर परवानगी मिळवायला हवी. नाहीतर उद्या पुन्हा हीच चर्चा करावी लागेल आणि तेंव्हा हॉस्टेल हा ऑप्शनही आपल्याकडे नसेल. " गण्या ने समोर ठेवलेला मुद्दा बीनतोड होता.
"बरोबर आहे. आपण सरांकडे जाऊ तेंव्हा आपल्याकडे आणखी काही ऑप्शन असायला हवेत पक्या मीना संध्या गण्या काय आहेत असे दुसरे ऑप्शन आपल्याकडे असे.." युसूफ कडे काही उत्तरे असावीत .
" म्हणजे काय असणार आहेत असे ऑप्शन" सगळ्यांच्याच मनात हा काय सांगतोय याची उत्सुकता होती.
" म्हणजे समजा हं ,,, समजा सर नाही म्हणाले तर? तर काय करणार? "
काय करणार म्हणजे. ?
नाही सर जर आपल्याला नाही म्हणाले तर आपल्याकडे काय उपाय आहे.
सरांनी जर नकार दिला तर काय …. याचा कोणीच विचार केला नव्हता.
तर काय करायचे….. प्रत्येकजण हा विचार करू लागले.
"आपण पैसे गोळा करून ही ला तीच्या गावी परत पाठवू."
गण्याच्या या बोलण्यावर आत्तापर्यंत सगळ्यांचे बोलणे ऐकत असलेली आशा एकदम चमकली.
नाही मी अशी घरी परत नाही जाणार . जाईन तर लाला च्या ऑपरेशनसाठी चे पैसे गोळा करून मगच जाईन" तीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. आशाला डोळ्यासमोर मुंबईला निघायचे म्हणून निरोप देतानाची अर्धांगवाताने खचलेली आई आणि आजारी लाला आले. त्यांच्यासाठी आशा ही एकमेव आशा होती.
किती आशेने ते तिच्याकडे पहात होते.
बराच वेळ कोणीच काही बोलले नाही. आपल्या पुढे नुसती आशाच नाही तर आणखीही बरेच प्रश उभे आहेत हे समजले होते. आशाला परत पाठवणे म्हणजे त्या प्रश्नांना तोंड न देता ऑप्शनला टाकण्यासारखे होते. प्रश्नांना भिडायचेच नाही तेथे जय पराजयाचा प्रश्नच येत नाही. सगळे एकदम गुडीगुडी असते. आशाला घरी परत पाठवणे हे म्हणजे स्वतःलाच फसवण्यासारखे झाले. म्हंटले तर उत्तर दिले असे वाटणारे उत्तर.
हे असले फसवे उत्तर कोणालाच नको होते.
बराच वेळ एक विचित्र शांतता , सगळेच अवघडल्यासारखे झाले. घुसमट म्हणजे काय असते हे अनुभवाला येत होते. समोर दिसतय पण हातात सापडत नाही. आपल्या हाती या वेळी एक खूप मोठ्ठा अलिबाबाला सापडला होता तसा खजिना असायला हवा होता किंवा अलीबाबाला मिळाला होता तसा एखादा जादूचा दिवा मिळायला हवा आनि मग तो दिवा घासला की समोर आलेल्या भूताने हा अडनिडा प्रश्न चुटकीसरशी सोडवून दिला असता. असे प्रत्येकालाच वाटून गेले. पण अशी दिव्याची भूते किंवा अलिबाबाचा खजिना हे गोष्टीच्या पुस्तकातच येतात. आणि गोष्टीच्या पुस्तकातल्याच अडचणी सोडवतात…. ही अवघड शांतता नसती तर बरे झाले असते निदान हा असा विचार तरी डोक्यात आला नसता.
" सर सकाळी फिरायला जॉगिंग ट्रॅक वर येतात. सहा वाजता त्या वेळेस भेटायचं त्याना. कोण कोण येणार? " सारंग ने काहीतरी ठरवलय.
" मी येईन " मीना संध्या युसूफ पक्या गण्या सगळ्यानी एकाच वेळेस उत्तर दिले. एकवाक्यता या शब्दाचा अर्थ कळून त्यांच्या चेहेर्‍यावर हसू चमकले.
" हे बघ मीना तु आत्ता आशाला घरी घेवून जा. जाताना तुझ्या पी जी आंटींसाठी हॉटेलातून मस्त चार प्लेट इडली सम्बार घेऊन जा. म्हणजे त्यांचे निम्मे प्रश्न बंद होतील. मी पक्या गण्या आणि संध्या सकाळी जॉगिंग पार्क वर सरांना भेटतो. आणि तुम्हाला फोन करतो. चला आता उद्या सकाळी भेटूया."
सकाळी काय होणार आहे हे कोणालाच माहीत नव्हते. पण तरीही सगळेच एका ठामपणा ने उठले.
घरी जाऊन झोप येणार नव्हतीच .सकाळी मोगँबो सरांना भेटायचे होते. प्रश्नांला थेट भिडायचे होते.
क्रमश:

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

8 Apr 2020 - 11:58 pm | विजुभाऊ

मागील दुवा http://misalpav.com/node/46323

विजुभाऊ's picture

14 Apr 2020 - 4:02 pm | विजुभाऊ

मोगँबो -८ http://misalpav.com/node/46438