Skip to main content
लेखक क्रांती यांनी शुक्रवार, 06/09/2019 06:05 या दिवशी प्रकाशित केले.

कला



इथे ताल चुकलेला तिथे सूर दुभंगला सुखासुखी जमते का सम साधण्याची कला?
शब्द भिडता शब्दाला अर्थ बापडा खंगला कवितेला स्वच्छ, स्पष्ट अंत दिसला आपला
रंग बेरंग झालेला विद्ध अशक्त कुंचला फलकाची मूक खंत 'म्हणू नका चित्र मला!'
माती बोले पाषाणाला 'धातू वेठीस धरला मूळ रूपाचा विध्वंस अशी कशी शिल्पकला?'
जन्म चुकांचा काफिला अंधपणात चालला कौशल्य ना कारागिरी तरी सार्थकी लागला?
जीव आला, जीव गेला श्वास घेतला, सोडला फक्त भाराभर चिंध्या हाच ऐवज उरला


वाचने 15557
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

जीव आला, जीव गेला श्वास घेतला, सोडला फक्त भाराभर चिंध्या हाच ऐवज उरला
हे जे काही लिहिलय ना... दंडवत क्रांती तै

क्रांती तै?? खूप खूप दिवसांनी.. कुठे गायबली होतीस गं? माती बोले पाषाणाला 'धातू वेठीस धरला मूळ रूपाचा विध्वंस अशी कशी शिल्पकला?' खतरनाक! _/\_

आधुनिक, आधुनिकोत्तर वगैरे वगैरे कलांचा नेमका मर्मभेद. आर्ट्स्कुलात शिकत असतानाच्या काळात अतिशय फडतुस लोकांनी केलेली ॠषितुल्य कलावंतांची केलेली हेटाळणी आठवून आजही मन विद्ध होत असते. .

बर्‍याच काळाने तुमची कविता वाचावयास मिळाली !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा दिल तेरे लिये धड़कता है... :- Aashiqui