३. सलग २ प्रतिसाद देऊ नयेत.
मला वाटते त्या कथेत दर्जा चांगला रहावा म्हणून एका दिवशी एका लेखकाने एकच प्रतिसाद द्यावा, भेंड्या सारखे धडाधड लिखाण नको. अश्याने जास्त विचार केला जाइल व कथा चांगली रंगेल.
मी एका अख्ख्या कादंबरीचे प्वाईंट्स तयार केलेले आहेत. ह्यात कुणाला इंटरेश्ट असल्यास, चार पाच जणांनी मिळून ही कादंबरी लिहावी हा मानस आहे. त्यासाठी मिसळपाव हे मात्र योग्य माध्यम आहे असे मला वाटत नाही. त्यासाठी विकी सारखी सोय असावी असे वाटते. पाच नावे आल्यावर मी हा "उपक्रम" सुरू करेन.
- सर्किट
कर्ना,
ल्येका भेंड्या काय गोष्ट काय..येक वर्षाचा उपास संपल्यावानी तुजी खादाडी चाललीया!!..चालू दे चालू दे.. येकदम जुनं दिवस पुन्ना आल्यासारकं वाटलं बग!!
बरेच दिवस काहीतरी लिहायसाठी हात खाजतो आहे पण च्यायला ह्या फुटकळ लेखकाला कोण सन्धी देणार अन स्वतःच॑ मातेर॑ करुन घेणार?
आता मिळतोच आहे चान्स तर घ्यावा म्हणतो वाहत्या ग॑गेत हात धूउन...
बघा बुवा आमची लेखणी तुम्हाला चालते का ते!
(अत्य॑त थरारक, गु॑ग करणारा, सिद्धहस्त, वाचकप्रिय(???) रटाळ फुटकळ लेखक ---मायमराठीच॑ अहो-दुर्भाग्य, दुसर॑ काय?)
- आपला 'णम्र',
धमाल.
कर्णा उपक्रम चांगला आहे...पण किती वेळ ताणून धरतोयस्...एकदाचं चालू कर कि...च्यायला!डोक्यात असलेले विचार कधी एकदा दुसर्यांच्या डोक्यावर फोडतोय असं झालंय...
बाय द वे...दुर्योधनाने तुला 'रिझ्यूम' फॉरवर्ड करायला सांगीतलाय,...धृतराष्ट्र अंकलनी नुकतंच 'धृतराष्ट्र ऑप्टीकल्स' नावाचं एक चष्म्याचं दूकान टाकलंय-चक्कर मारून जा...कुंती आंटी तुझी आठवण काढत होत्या...जमल्यास फोन कर...जोश्यांची द्रौपदी कुलकर्ण्यांच्या अर्जुनाबरोबर पळून गेली... हस्तीनापूर कॉलनीत फ्लॅट घेतलाय म्हणे...त्याचा भाऊ भिम आमच्या बाजूच्याच जिममधे इन्स्ट्रक्टर आहे,तुझी त्याच्याबरोबर खुन्नस आहे म्हणून सांगतोय,पाहिजे असेल तेव्हा सांग चार-पाच पोरं पाठवून रट्टे द्यायला लावतो...संजयला नुकताच 'परसो तक' मधे 'रिपोर्टरचा' जॉब मिळालाय ...तुझी 'कवचकुंडले'कुरीयरने पाठवली आहेत,पोचल्यावर फोन टाक...बाकी विशेष काही नाही...पत्राचे उत्तर जरुर देणे...वाट पाहत आहोत.
(इति'हास्य'प्रेमी) -इनोबा
सध्या इझरेल लेबनॉन्मध्ये समझौता करण्याच्या मिशनवर आहे. शंकररावांना चश्मा घ्यायचाय. तीन डोळ्यांचा. धृतराष्ट्रांच्या दुकानात असल्यास कळवावे. शुक्राचार्यांकडे नवा स्टॉक आलेला आहे. कृष्णरावांच्या साड्यांच्या दुकानांत सेल लागलेला आहे. मेनका बारचे नूतनीकरण झले. आबांच्या हस्ते अनावरण झाले. यामध्ये नवीन बारबाला आलेल्या आहेत. द्रोणाचार्यांच्या क्लासची नवी शाखा लवकरच उघडत आहे. जास्त फी जास्त गुण हे त्यांचे ब्रीद आहे. अंगठा देणा-यास गोल्ड मेडल देणार. सैरन्ध्रीने नवीन ब्यूटी पार्लर उघडले आहे. काल त्यात देव आनंद गेला. परंतु बाहेर अमीर खान आला. एकता कपूरने मालिका संन्यास घेतला आहे. वाजपेई यापुढे शाहरुख च्या स्टाईलमध्ये बोलणार आहेत. रिकी पाँटिंग खरे बोलण्याचे क्लास काढणार आहे. पहिले मेंबर म्हणून डॅरिल हेअर, मार्क बेन्सन व स्टीव्ह बकनॉर यांनी नावे नोंदवली. जॉर्ज डब्लू बुश शांततेचे पाठ देणार. प्रमुख प्रपाठक इझरेलचे पंतप्रधान.
शिळ्या बातम्याचे बातमीपत्रक संपन्न होत आहे. आता पाहा पुढील कार्यक्रम .......
प्रतिक्रिया
मी नाही,
क्षमस्व
सूचना
माझी एक जुनी कल्पना
मी चालेन का?
सर्किटदेव
माझ्या आठवणीप्रमाणे
झ्याक
वही अन पेन घेउ॑द्या की र॑,मला बी....
काठी न घोंगडं घेऊ द्या की रं ...
मीही
माझी ही..
ह्म्म..रेडी..
सुरूवात तर करा.....
वा वा...
नारद
वा रे गड्या...
???
स्तुत्य उपक्रम
खुपच छान