✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

असा पिझ्झा बेस द्या मज आणुनि सजविन मी जो चीझ टॉपिंगज् ने

च — चामुंडराय, Tue, 04/03/2018 - 08:30
असा पिझ्झा बेस द्या मज आणुनि सजविन मी जो चीझ टॉपिंगज् ने बेक करुनि त्यास ओव्हन मध्ये खाईन मी तो आनंदाने थिन क्रस्ट वा थिक असो वा मिट असो वा मिटलेस असो वा शर्करावगुंठित सोडयासंगे खाईन मी तो आनंदाने हाय कॅलरी लो फायबर तयाला एक्स्ट्रा चिजचा थर पोषणमूल्ये असो नसो वा खाईन मी तो आनंदाने मिट लव्हर्स वा मार्गारिटा वरती एक्स्ट्रा चीझ मारा नानाविध टॉपिंग्ज संगे खाईन मी तो आनंदाने चीज असो वा व्हेजि असो वा स्मॉल मीडियम लार्ज असो वा चिकन टिक्का वा चिकरोनी खाईन मी तो आनंदाने चीज-न-कॉर्न, मार्गारिटा पेरी-पेरी अथवा फियेस्टा पॅराडाईज वा पनीर मखानी खाईन मी तो आनंदाने पनीर तंदुरी, चिकन विंग्ज अन गार्लिक चिझी स्टिक्स नानाविध सॉस संगे खाईन मी तो आनंदाने मिरीण्डा पेप्सी किंवा कोला बेसिल पेस्टो वा मोझरेला काँडिमेंट्स हे अकम्पनीला खाईन मी तो आनंदाने नकोच टॉपिंग्ज, नकोच बेस तयार आयता पिझ्झा बेस्ट मेड टू ऑर्डर पिझ्झेरियातुनी तयार पिझ्झा द्या मज आणुनी फस्फसत्या त्या पेय्या संगे खाईन मी तो आनंदाने भेदून टाकीन सारी वसने फास्ट फूडच्या मेदवृद्धीने केशवसुत _/\_

प्रतिक्रिया द्या
5413 वाचन

💬 प्रतिसाद (6)

(No subject)

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/05/2018 - 15:06 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

श्री. केशवसुत्ताले वरिजिनल

गवि
गुरुवार, 04/05/2018 - 15:13 नवीन
श्री. केशवसुत्ताले वरिजिनल करवियले.. श्री. चामुंडराये पिझ्झायै करवियले.
  • Log in or register to post comments

=))

सूड
गुरुवार, 04/05/2018 - 19:05 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

=))

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 04/06/2018 - 15:33 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

श्री गगनविहारीले कॉमेन्ट लिखवियले, श्री मिपाकराले एन्जॉय करवियले

चामुंडराय
Sat, 04/07/2018 - 03:02 नवीन
श्री गगनविहारीले कॉमेन्ट लिखवियले ...  श्री मिपाकराले एन्जॉय करवियले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आपल्या तोंडात पिझ्झा पडो हि सदिच्छा. :)

चामुंडराय
Sun, 04/08/2018 - 02:02 नवीन
ऑल पिझ्झा बॉईजचे आभार्स. आपल्या तोंडात पिझ्झा पडो हि सदिच्छा. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा