Skip to main content

जातस त जाय

लेखक स्वामी संकेतानंद यांनी मंगळवार, 13/03/2018 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
जातस त जाय, येति रावून बी नसे काई उपाय नेजो पाच पोते तांदूर पन्नास पायल्या तूर जाता जाता हेडून घेजो मोहावरचा मोवतूर दूध देवाचा बंद करन आता तुयी गाय जातस त जाय करजो सकारी एक फोन दिसबुडता आठोन हर मैन्याले पाठवजो रुपये हजार-दोन तुयी वाट पायतीन घरवाले सप्पाय जातस त जाय सांगजो पोराले आपल्या झाडीच्या गोठी बाघ कोटी ना बावनथडी कोटी आला कई त दाखवून डाकजो अमराईतले सेंदऱ्या, गोल्या, घोटी निस्यान सोडून तं जाते वल्या खपनीमदी पाय जातस त जाय - संकेत, १० मार्च, २०१८, पुणे ------------------------------------------- हेडून म्हणजे काढून मोवतूर म्हणजे मधाचे पोळे देवाचा म्हणजे द्यायचे सप्पाय म्हणजे सगळे बाघ आणि बावनथडी या नद्या आहेत. कोटी=कुठे निस्यान =निशाण खपन म्हणजे चिखल, पाय रुततात असा थोडा घन असलेला चिखल. आमच्याकडे किचड हा चिखलाचा वेगळा प्रकार.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 5672
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

आपला मूळ घर सोडून नोकरीसाठी शहरात राहणाऱ्या सगळ्यांनाच ही कविता भावूक करेल.

नि:शब्द!! सुरेख कविता! सांगजो, करजो.... अहिराणीच वाटली.

मिपावर काही नावं अशी आहेत, की नाव वाचून धागा उघडावा आणि नेहमीच भारी वाटतं.

सुंदर, अर्थपूर्ण कविता!

सुंदर.