सर्किटजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
जें बरे होतें तें सलवार खमिस मधें होतें.तेंच जरा साडीचोळी मधें किंवा नऊवारींत निराळें
पहा कीं हो.! "जे होते ते बरे होते की" असें म्हणत "टिळक श्रेष्ठ की आगरकर श्रेष्ठ असें म्हणत राहिलो आहो.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
जा विसरून त्या स्मृति या क्षणी
अन परतवून टाक त्या आठवणी
पण काका आम्हाला कुठेही ती साडी चोळी अथवा नऊवारी वाली दिसली नाही (कदाचित आमच्याकडे "तशी" द्रुष्टी नसेल ;) )
(सामानाच्या प्रतिक्षेत :D ),
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
गणा मास्तरजी,फटूजी,
आपल्याही प्रतिक्रिये बद्दल आभार.
जे( काव्य) बरे होते ते हिंदीत(सलवार खमिस मधे) होते.
ते ह्या किंचीत अनुवादात
मराठीत झाले(साडी चोळीत,नऊवारीत झाले)
काव्याने आपला पेहराव बदलला.तर त्यात काय बरे चुकले?
जसे पहाल तसे दिसणार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
काव्य बरेच होते
पण हल्ली साडी चोळी नौवारी राहिली नाही.
जीन्स आली आहे.
तुमच्या प्रतिभीचे कौतुक करावे तितके थोडे.
पण पेहराव बदलुन जीन्स केली तर काळाला सुसंगत होईल, कसे?
सामान मात्र आलेच पाहिजे.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
गणा मास्तरजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
"पण हल्ली साडी चोळी नौवारी राहिली नाही.
जीन्स आली आहे."
साडे बारा तासांच्या अंतरावर असलो तरी आधूनीक टेकनॉलाजीमुळे आठदहा इंटरनॅशनल चॅनल वरून पहाताना "जीन्स " आल्या आहेत ते नजरेतून चूकलं नाही.
"पण पेहराव बदलुन जीन्स केली तर काळाला सुसंगत होईल, कसे?"
पण जीन आल्या किंवा ब्लाऊझ गेले तरी "नऊवारी" चा छाप गेलेला दिसत नाही आणि जाणार नाही.
"पाणी थेंब थेंब गळं" हे ’दादानी" म्हटलं तेव्हा अश्लिल झालं होतं पण अजून "यम टीव्ही" वर "चोप्रा" तेच गाणं "ढोप्रा" पर्यंत" नऊवारी" नेसून चघळून चघळून म्हणत असताना मिटक्या मारीत पहाणारे जीन घातलेले दर्शक आहेत.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
भोईरजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
खरां लिवलां कां जल्ल्ला भारी वाटतां.तुमच्या कडून अशी प्रेरणा मिळाल्यावर अशीच आणखी कविता करूक माका जोश येतां.
डोचक्यात तांच तांच चालू असता मां.मग झंयच्या थंय कागदावर गिरपटून ठेवतंय.आणि तुमच्या सारख्या मायबाप वाचकांची याद इली की संगणकावर बसतंय.आणि एकदा टाईप करूक लागलंय मां! मग काय विचारूं नका डेक्कन क्विन च्या वेगान ओळी येतंत लिहून.
तुमचे सलाम माका लाख मोलाचे.
असोच कृपा लोभ ठेवा मायबापानूं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
सामान हा शब्द का टाळला आहे. तो तर जस्साच्या तस्सा वापरता आला असता.
किंवा त्या ऐवजी "पसारा" हा शब्द चालला असता
एका चांगल्या गाण्याचा अणुवाद करायचा अट्टाहास वाटला.
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
विजुभाऊजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
खरं आहे आपलं म्हणणं.आपण सुचविलेला शब्द वापरून कवितेचा "अणुवाद"करण्याचा अट्टाहास झाला नसता कदाचित.पण गम्म्त काय आहे कविता लिहिताना किंवा अनुवाद करताना लिहिणार्याला जो शब्द "उज्जू " वाटतो तो त्याच्याकडून लिहिला जातो.हे ज्याचे त्याचे "उज्जू" शब्द वापरले जात असल्यामुळे एकाच आशयाच्या कवितेच्या निर्मितीत वेगवेगळेपणा आणला जातो.आणि म्हणूनच "एकतेत विविधता" निर्माण होते.
निरनीराळ्या रंगामुळे गुलाब विविध रंगात दिसतात.एखादा गुलाब घेऊन ह्याचा रंग जर का जरा असा असता तर ह्या गुलाबाचा "जुलाब" करण्याचा हट्टाहास झाला नसता असं म्हटल्या सारखं होईल.
गुलाबाला रंग देणं जसं आपल्या हातात नसतं तद्वतच कविता करणं किंवा अनुवाद करणं हे त्यावेळेला सुचलेल्या "उज्जू" शब्दावर अवलंबून असतं.ती होऊन गेल्यावर त्याच्यावर प्रतिक्रिया करताना कुणीतरी "Hind side twenty twenty" करण्याचा अट्टाहास करतो असं मला वाटतो.
शब्द जसाच्या तसा वापरून कविता अनुवादीत होत नसावी तसं केल्यास त्याला "भाषांतरीत" असं म्हणावं लागेल.
शब्द जसाच्या तसा वापरून अनुवाद करायचा नसल्याने आणि थोडा आशय बदलायच्या दृष्टीने लिहिण्याचा विचार केल्याने मी "किंचीत अनुवाद"असं कवितेला शिर्षक दिलं आहे.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
मेरा कुछ सामान ?
आभार
वा
छान...
जसे पहावे तसे दिसते
काव्य
"चोप्रा " नऊवारी "ढोप्रा" पर्यंत नेसून "यम टीव्ही" जीन आली तरी
जल्ला क
खरां लिवलां की जल्ला भारी वाटतां.
हम्म!
आभार
सामान हा
गुलाबाचा जुलाब