मला अतिशय आवडलेले इंग्रजी सिनेमे भाग १, Wait until Dark....
डिस्क्लेमर : मला ज्या अनेक गोष्टी अजिबात जमत नाहीत, त्यापैकी चित्रपट, कविता, नाटक ह्यांचे परीक्षण लिहिणे.कदाचित माझे हे चित्रपट परीक्षण, तुम्हाला आवडणार नाही आणि ते आवडलेच पाहिजे, हा माझा अट्टाहास पण नाही.माझ्या फालतू चित्रपट-परीक्षणाचा राग तुम्ही ह्या सिनेमांवर काढू नये, ही नम्र विनंती.
=============================================
कुठलाही सिनेमा लागला की पहायचाच असतो, हा पौंगडावस्थेतला एक गूण.मग तो इंग्रजी असो किंवा हिंदी.
त्या काळात मग हीरा-मोती. रानी और लाल परी, बगदाद का चोर असे पण सिनेमे बघीतले जातात.पुढे मात्र सिनेमे बघायची आवड मंदावते आणि काही वेगळे सिनेमे बघायची ओढ लागते.ही ओढ लागयला एखादा सिनेमा किंवा एखादा मित्र पण कारणीभूत होतो.
असेच एकदा कधीतरी कटिंग आणि विडीचा आस्वाद घेता-घेता एक जण म्हणाला, "अरे, कालच मॉर्निंगला टिळकमध्ये वेट अंटिल डार्क बघीतला.मस्त सिनेमा आहे."
आमच्या त्या ग्रूपचे एक वैशिष्ट्य म्हणजे, सिनेमा बघीतला आणि आवडला (किंवा आवडला नाही) इतपतच.मुद्दाम स्टोरी सांगणे आणि उत्कंठा वाढवणे, हा प्रकार कुणीच करत न्हवते.
पौगंडावस्थेतला अज्जुन एक गूण म्हणजे, मित्रांनी सांगीतलेले सगळे पटते आणि आचरणात पण आणले जाते.बापापेक्षा मित्रांना अक्कल जास्त असते, असे समजण्याची अवस्था.
बापाने हा सिनेमा सुचवला असता, (हे पण अशक्यच.बापाचा एकच सल्ला असायचा, अभ्यास करा.) तर नक्कीच नसता बघीतला.
असो, तर मित्राने सांगीतल्या प्रमाणे हा सिनेमा बघीतला आणि मग मात्र त्याची पारायणेच केली.कधी कंटाळा आला म्हणून तर कधी दिवस फारच आनंदात गेला म्हणून. कधी झोप येत नाही म्हणून तर कधी मुद्दामहून.
मिपावर मात्र असे एका वाक्यात हा सिनेमा जरूर बघा. असे सांगता येत नसल्याने थोडी ओळख करून द्यायचा प्रयत्न करतो.
================================
कॅनडा देशातल्या, माँट्रियाल नामक शहरा मधील एक घर.एक म्हातारा माणूस, एका बाहूलीमध्ये.हेरॉइनच्या पिशव्या भरत असतो आणि लिसा (सामंथा जोन्स) नावाची एक तरूणी, त्याचे हे काम पुर्ण व्हायची वाट बघत असते.
त्याचे काम पूर्ण होताच, लिसा ती बाहूली घेवुन ते घर सोडते.आता ती त्या बाहूलीला घेवून न्युयॉर्क, अमेरिका, इथे जाणार असते.प्र्वासाच्या सुरुवातीलाच तिची एका माणसाबरोबर तोंड-ओळख होते.
न्युयॉर्कला उतरातच तिची नजर एका व्यक्ती वर पडते आणि ती थोडी बावचळते.ती व्यक्ती आता आपल्याला सोडणार नाही, हे ओळखून, लिसा ती बाहूली, प्रवासात तोंड-ओळख झालेल्या माणसाच्या हातात सोपवते.लिसा बाहेर पडताच, तिचे अपहरण होते.
आता मात्र मी इथे थांबतो.कारण पुढील सगळा सिनेमा हा बाहूलीच्या शोधावरच आहे आणि कथा सांगत असतांना कदाचित पूर्ण कथाच सांगायचा दोष पण होवू शकतो.
===================================
आता मला हा सिनेमा का आवडला?
१. मुळात सिनेमा, हे कथेचे माध्यम आणि ती कथा योग्य तर्हेने समाजापाशी पोहचवायला मदत करतात ते कलाकार आणि त्या कलाकारांना गुणांना न्याय देणार दिग्दर्शक आणि दिग्दर्शिका.हा सिनेमा बघतांना आपण फार हळू-हळू कथेत गुंतत जातो आणि काही वेळाने तर आजूबाजूला काय सुरु आहे, हे पण विसरून जातो.सिनेमा संपल्यावर लक्षात राहतो तो फक्त एक अविस्मरणिय अनुभव.
२. टेलीफोनचा अप्रतिम वापर.
३. सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय.
४. ह्या सिनेमातून मला मिळालेली शिकवण. "योग्य ठिकाणी, योग्य वस्तू, नियमितपणे असेल तर, वेळ वाया जात नाही.वस्तूंच्या जागा बदलणे, म्हणजे वेळेचा अपव्यय."
- मला अतिशय आवडलेले इंग्रजी सिनेमे भाग २, Million Dollar Baby.........
- मला अतिशय आवडलेले इंग्रजी सिनेमे भाग ३, Columbus Circle
Book traversal links for मला अतिशय आवडलेले इंग्रजी सिनेमे भाग १, Wait until Dark....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
म्स्त ओळख काकुस बघेन नक्की
वेट अनटील डार्क भारी. ऑड्री
ह्या सिनेमाचे अज्जुन एक वैशिष्ट्य म्हणजे....
आॅड्रीच्याच
+1
सिनेमा पाहिला नाही पण आता
आल्फ्रेड हिचकॉक हे एक वेगळेच रसायन होते...
रियर विंडो जबरदस्तच होता.
हीचकॉक
वेट अंटिल डार्क मस्तच आहे. पण
येस!
येस!
हा चित्रपट नक्की बघण्याच्या
मूवी साहेब,
आत्ताच बघितला "वेट अंटिल डार्क!"
हिचकॉक आणि फक्त हिचकॉकच हे करुन घेउ शकतो!
बरोबर आहे तुमचं मुवि!
दिग्दर्शन हिचकॉकची आठवण होईल असे!
बघणार.
चांगलीच ओळख करून दिलीत.
सिनेमा नक्की बघा...
मस्तं ओळख.
वेट अंटिल डार्क
फक्त ऑड्री.…।