जमवायचं एवढं?

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in काथ्याकूट
10 Sep 2008 - 9:56 pm
गाभा: 

मिपा कुटुंब सदस्यांनो,

http://www.misalpav.com/node/3405

वेंगुर्ल्याचं वर्णन वाचून तुम्हालाही तिथे जावंसं वाटलं असेल, ना? मी दस्तुरखुद्द रत्नागिरीचा असलो, तरी अजून वेंगुर्ल्याला गेलेलो नाही. बऱ्याचदा असंच होतं. एखाद्या सुंदर ठिकाणाचं वर्णन वाचून आपल्याला तिथे जावंसं वाटतं, पण जाणं जमत नाही. अनेकदा सोबत कुणी नसतं, ग्रुप जमत नाही, अनेक भानगडी.
मिपा च्या माध्यमातून हे जमवायचं? निदान पुण्यातल्या मिपा सदस्यांसाठी तरी हे करता येईल. एखादं जवळचं ठिकाण, उदा. श्री.ना. पेंडशांचं दापोली निवडायचं. तिथे पाहण्यासारखी अनेक ठिकाणं जवळपास आहेत. आसूद, कड्यावरचा गणपती, हर्णै बंदर, वगैरे. अगदी निसर्गरम्य. दोन दिवसांची सहल आपण सगळे एकत्रितपणे काढू शकू तिथे? संयोजनाची जबाबदारी मी घेईन. त्या निमित्तानं सगळ्यांची ओळख होईल, एक छोटेखानी स्नेहसंमेलन होईल, नवी ठिकाणं नव्या मित्रांसह पाहण्याची मजा अनुभवता येईल.
कळवा, तुम्हाला काय वाटतंय, ते!

- अभिजित.
-----------

प्रतिक्रिया

भास्कर केन्डे's picture

10 Sep 2008 - 10:52 pm | भास्कर केन्डे

छान उपक्रम हाती घेतलात. तुमचा संकल्प तडीस जावो व तुमच्या स्नेहसंमेलनाचे फोटो आम्हाला पहायला मिळोत हीच सदिच्छा!

आपला,
(परदेशी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

विसोबा खेचर's picture

11 Sep 2008 - 9:05 am | विसोबा खेचर

उत्तम कल्पना आहे!

आपला,
(सहलप्रेमी) तात्या.

धमाल मुलगा's picture

11 Sep 2008 - 9:50 am | धमाल मुलगा

मी+माझी बायको, आम्ही नक्की येऊ. फक्त शनि.रवि. असं आयोजन करावं ही विनंती.
शक्य झाल्यास त्याआधी किंवा नंतर जोडुन एखादी सुट्टी आल्यास ह्या सहलीचा जास्त आनंद घेता येईल :)

यादीत माझं नाव टाका हो.....

(स्वगतः हा माणुस मध्येच गाडी रत्नांग्रीला फिरवून कढईभर शिरा तर नाही ना खाऊ घालणार? :?)

सखाराम_गटणे™'s picture

16 Sep 2008 - 12:05 pm | सखाराम_गटणे™

>>फक्त शनि.रवि. असं आयोजन करावं ही विनंती.

हेच म्हणतो मी. मी पण येयीन

रामदास's picture

11 Sep 2008 - 10:14 am | रामदास

धमू रहा ना घरी एकटा. एकदा दार बंद केलं की बाहेर कोकण काय आणि बारामती काय ?क्या फर्क पडता है?
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

धमाल मुलगा's picture

11 Sep 2008 - 10:40 am | धमाल मुलगा

एकदा दार बंद केलं की बाहेर कोकण काय आणि बारामती काय ?क्या फर्क पडता है?
रामदासकाका, तुम्हीसुध्दा यॉर्कर टाकता?
_/\_

त्याचं काय आहे ना, की बायकोलाही फिरायला आवडतं, मग सगळे दंगामस्ती करत फिरणार म्हणजे आणखी मजा येईल ना?

आणि....कोकण काय, दिवसभरच की हो......
राम कृष्ण हरी...राम कृष्ण हरी!!!

शैलेन्द्र's picture

11 Sep 2008 - 11:03 am | शैलेन्द्र

बेफान ऊसळ्णार्‍र्या लाटेला, किनार्‍याचा आसरा लागत नाही.
सुर्याला घाबरुन संयम पाळायला, तो माझा सासरा लागत नाही...

स्वाती दिनेश's picture

11 Sep 2008 - 11:36 am | स्वाती दिनेश

मिपा ट्रॅवल्सच्या भ्रमणमंडळाच्या भारत शाखेकरता आणि कोकणसहलीकरता शुभेच्छा..
स्वाती
भ्रमणमंडळ,
जर्मनी शाखा.

आपला अभिजित's picture

15 Sep 2008 - 5:18 pm | आपला अभिजित

:S
निसर्गप्रेमी मिपाकरांची कोकणात सहल आयोजित करण्याच्या योजनेला मिळालेला अभूतपूर्व आणि उदंड प्रतिसाद पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. त्यामुळे आम्ही आमची तलवार म्यान करीत आहोत....

यशोधरा's picture

15 Sep 2008 - 11:26 pm | यशोधरा

>>>त्यामुळे आम्ही आमची तलवार म्यान करीत आहोत....

म्हंजी?? क्यांसल का काय ब्येत? :O
प्लीज येक्स्प्लेन जरा... :W

आपला अभिजित's picture

16 Sep 2008 - 10:43 am | आपला अभिजित

येणार असल्याचं एकट्या धमाल मुलग्यानं कळवलंय.

त्याच्या बायकोला तो कडेवर घेईल हो! पण त्याला कडेवर कोण घेणार? मी घेऊ की काय?

जाने दो. ब्येटर लक न्येक्श्ट टाइम.!!

धमाल मुलगा's picture

16 Sep 2008 - 2:08 pm | धमाल मुलगा

अभिशेठ,
चिंता नाय करायचं, आपन है ना...
आत्ताच जागोजागी कट्ट्यांची धूम उडालेली आहे.
त्या गौरी-गणपती वगैरे...मंडळी अंमळ 'बिज्जी' आहेत रे...
थोडी कळ काढ.
जरा सगळं स्थिरस्थावर होऊ दे, मग आपण पुन्हा विचारु, काय म्हणतोस?

बरं तू २७च्या कट्ट्याला येऊ शकशील काय?
तिथेही आपल्याला ही चर्चा करता येईल...मंडळाशी समक्ष भेटीत दोन गोष्टी अधिकच पक्क्या होऊ शकतील ना :)

चिल माडी रे...आपण वेंगुर्ला सहल नक्की करु :)
आपलं तुफानी पब्लीक नक्की येईल बघ!

प्रणित's picture

16 Sep 2008 - 11:58 am | प्रणित

तसही येत्या शुक्र. शनी. रवी आम्ही मालवणलाच आहोत.