प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(४)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
21 Aug 2008 - 10:32 am

मागील दुवे
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(१) http://misalpav.com/node/2158
: प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(२) http://misalpav.com/node/2266
:प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(३) http://www.misalpav.com/node/2327

तुझ्या बाबतीत नेहमी असेच व्हायचे. तू येउन जायचीस आणि मी तो असताना तुलाच पहात बसायचो तुझे हावभाव , ते डोळे बारीक करुन हसणे कानावर येणाया बटा बोटाना गुडाळत सावरणं काहीतरी मिश्कील विचारुन डोळ्याच्या कोपयातुन हळुच माझे हावभाव निरखणे . तु गेल्यावर ते मला सगळे आठवत असायचे. विसरणे हा काही प्रकार असतो हे त्या क्षणना मान्यच नसायचे. तू नाहीस हे जाणवायचेच नाही.
आजही तसेच होते. माझे आयुष्य तू भरुन आहेस. तू आणि तूच हेच माझे आयुष्य आहेस.

अब ये आदत डालनी होगी
बगैर तुम्हारे जीने की
मुर्दोंको भे आद्त होती है
बगैर सास लिये मज़ार मे सोने की
उन्हे तो खैर इन्तज़ार
होता है कयामत का
हमे तो वो भी नसीब नही
कयामत से गुजर चुका
इन्तज़ार करें भी तो किसका
दूसरी कयामत आये
ये शायद होगा नही
अब इतनाही है बस में
उम्मीद में रहें
कोई मकसद से वस्ल(पहचान) की
या अवस्थीत मी किती काळ होतो कोण जाणे. ती एक तंद्री होती. त्यातुन जागे व्हावेसेच वाटत नव्हते.
ती स्वप्नवत अवस्था संपुच नये आपण काळ वेळ तसेच गोठवुन ठेवावे असे वाटायचे.
स्वप्नांचा शेवट होऊ नये म्हणुन रात्रीला कोणी थांबवुन ठेवावे. सकाळ होऊच नये. तू तशीच माझ्या विचारांत असावेस आपण काही स्वप्ने पहावीत ती खरी होण्याची आशा धरवी. त्या आशेवर नवी स्वप्ने रचावीत ती पूर्ण व्हावीत म्हणुन जगाच्या अंतापर्यन्त जीव तोडुन धावत सुटावे.स्वप्नांचा पाठलाग करणाया स्वप्नांचा पाठलाग करावा.
वेड्या लोकाना असेच वातत असते. शहाणे यातुन मुक्त होतात. अन जगण्यातला रस हरवुन बसतात.

हम ख्वाबों मे जीते है
ख्वाबों मे महल बनाते हैं
दीवाले उठती हैं , छत बनते हैं
....................रंग भरे जाते हैं
फ़िर उनमें लोग आ बसते हैं
वो भी ख्वाब देखते हैं
और जुट जाते है उन्हे बनाने में
फ़िर उनके जज्बात भी आते हैं
साथ साथ रहकर
एक दूसरे से टकराते है
झगडते है, जशन मनाते है
मिलते है बिछडते है
खुशी, रुसवाई, गम
सब तो आते हैं ख्वाबों के उस महल में
अपने अतीत का बोझ ढोते हमे भी
खुशी, रुसवाई, गम देते हैं
सुबह होते होते
हम जाग जाते हैं
अपने देखे ख्वाब
बनने मे जुट जाते हे
मी माझ्याच नादात असतो अचानक मला जाणवते की काहितरी वेगळे घडतेय. हवेत एकाएकी काही वेगळेच जाणवु लागते. पाउस येणार असल्याची ग्वाही उगाचच कोणीतरी घेउन देतेय असे भास होऊ लागतात. मातीचा सुगंध पानांची सळसळ जाणवु लागते. पाउस नसतो तरीही हे सारे आपल्या अवती भवती जाणवु लागते. हवेत एक प्रकारचा उत्साह भरुन ओसंडत असतो. एखादी सकाळ अशी स्वत:च्याच मस्तीत उगवते.

आज मौसम कुछ
अपने में ही मस्त हैं
गुनगुनी धूप में
दरख्त भी लहलहा रही है
अपने पतोको झिलमिलाते देख
खुदपें ही फ़ूल बरसा रहे हैं
फ़िज़ा का असर
हम पर कुछा यूं हुवा है
डाल पर बैठा कौवा भी
चहकता लग रहा है
पास मे बहते नल की आवाज
झरने सी लगती हैं
सडकसे गुजरती भीड भी
खुशमिज़ाज़ लगती हैं
दिन भी कुछ अलगसा
खुशगवार लगता है
शायद सुबह की पहली रौशनी
तुम्हारे आने की
आहट ले आयी हैं

तू असताना मी काही वेगळाच असतो. तू नसतानाचा मी वेगळा असतो. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हण ना. तू असताना मी उत्साहाचा झरा असतो बडबड्या असतो. काय बोलु काय नको असे होत असते मला.तू नसतानाही मी बडबड्याच असतो फ़रक फ़क्त इतकाच की मी स्वत:शीच बोलत असतो मनातल्या मनात. प्रत्येकजणच असा बडबड्या असतोच की. तू पण असेच म्हणायचीस. तुझं मनातल्या मनात बोलणे मला काहीवेळा ऐकु यायचे. मी तुला विचारायचोही की तू हा विचार करते आहेस का म्हणुन? तुला आश्चर्य वाटायचे. मल ते कसे कळाले म्हणुन विचारायचीस.....मी काही न बोलता गालातल्या गालात हसायचो. "जा:नक्को सांगू" म्हणत तू काही क्षण लहान मुलासारखे गाल फ़ुगवुन रुसुन बसायचीस. क्षणभरानी डोळ्याच्या कोप-यातुन माझ्या कडे पहायचीस.आणि आपली नजर भेट झाल्यावर तो रुसवा विसरुन एकदम खळखळुन हसायचीस. तुझे ते काचा फ़ुटल्यासारखे खळ्ळकन हसणे अजून माझ्या कानात आहे.
तुझ्या शंका तरी काय अफ़ाट असायच्या. काय तर म्हणे कोप-यावरच्या आजीनी त्यांच्या आयुष्यात कधी प्रेम केले असेल ? त्यांच्या त्याबद्दलच्या भावना कशा असतील
आणि त्यावर तुझी कॊमेन्टही मस्त असायची
अब एहसास भी होता है कभीकभी
रुखसार की शिकन और झुर्रीयोंसे
के कभी दिलपर जख्म भे हुवे थे
घायल भी हुवे थे आखों से
अब तो पर्दा भी नही रखते है
वो माशा अल्ला इन्शा अल्ला भी नही कहते
बस टिकटीकी बांधे रहते है
दस नंबर के चश्मे की आडमे... आखोंसे

आपले ही असेच काहीतरी होईल ना .......

अब हम रौशनदान नही रखते हैं
दियासलाई , शमादान की जरुरत महसूस नही होती है
आप की आदत आती है कभी
रौशन कर जाती है दिल को
फ़ानूस बनकर....
.
..
.
अपना तो जमना बीत गया
यह कहकर भी एक अर्सा हुवा
मगर वो टीले की तरफ़
जाती कच्ची सडक आज भी
वैसी हैं अपने मे मगन
उस कोने के पेड तक
आजभी कभी जाता हुं
कुछ धूल से उठाता हुं
तुम्हारी आहट को छुता हुं

हे असे भविष्यातल्या भूतकाळात डोकावणे आपण का करत असतो. मी मनाला समजावतो. वर्तमानात जगायला सांगतो.
भूतकाळ बदलता येत नाही भविष्यकाळ जगता येत नाही. आपली अवस्था दही टांगल्यासारखी असते.
मग मी एकटक त्या पाउल वाटेकडे पहात रहातो. काय विचार करत असतो कोण जाणे. मधेच मला काहीतरी ओळखीचे भेटते.

वह सन्नाटा और सुनसान सडक
कुछ दूर वो छ्होटीसी ईमारत
आसमान मे उडते कुछ परिंदे
और बूढे बरगद की सरसराहट
पैरों के नीचे दबते सूखे पत्ते
और कुच सूर्ख मिट्टी
कच्ची सडक पर अपने पैरों के निशान छोडता हुवा
मै कुछ देर चलता रहा
मेरे साथ सडकपर कुछ और भी निशान थे
शायद तुम्हारे कदमों के होंगे
चलो इसी तरह सही
हम कदम से कदम मिलाकर तो चली.

(क्रमश:)

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

21 Aug 2008 - 10:35 am | सखाराम_गटणे™

खुप दिवसांनी भावनात्मक वाचायला मिळाले.
काही ओळी खुप भावल्या.
चालु द्या.

सखाराम गटणे
हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.

शेखर's picture

21 Aug 2008 - 10:37 am | शेखर

हा ही भाग मस्त जमला आहे...

>> मी काही न बोलता गालातल्या गालात हसायचो. "जा:नक्को सांगू" म्हणत तू काही क्षण लहान मुलासारखे गाल फ़ुगवुन रुसुन बसायचीस.

हे मस्तच

शेखर

वैद्य's picture

21 Aug 2008 - 11:03 am | वैद्य (not verified)

आमचे प्रतिसाद हली असेच असतातः

बूढे बरगदकी सरसराहट

ह्या वयातही विजुभौंनी प्रेम चांगलेच ह्यांडल केलेले आहे. अभिनंदन.

पण टवाळकी असाईड, असे आम्हाला तरुणपणी लिहिता आले असते, तर काय मजा आली असती ?

-- वैद्य

पावसाची परी's picture

21 Aug 2008 - 11:19 am | पावसाची परी

खुपच मस्त लिहिलय्......अगदी मनातल खोल तळाशी जे आपण आपल्याशी बोल्तो तस्च लिहिलय
सुन्दर!

इनोबा म्हणे's picture

21 Aug 2008 - 11:49 am | इनोबा म्हणे

मस्त लिहीलंय बरं का!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

रामदास's picture

21 Aug 2008 - 12:24 pm | रामदास

चमकतोय बरं.

अवलिया's picture

21 Aug 2008 - 6:52 pm | अवलिया

विजुभावु
आपण तुमचे लय म्हंजे लय फ्यान आहोत
येवु द्या अजुन पटापट

शितल's picture

21 Aug 2008 - 7:03 pm | शितल

नेहेमी प्रमाणे हा ही भाग प्रेममय झाला आहे. :)

डोमकावळा's picture

21 Aug 2008 - 7:10 pm | डोमकावळा

छान लिहीलय विजूभाऊ
छानच...

अब एहसास भी होता है कभीकभी
रुखसार की शिकन और झुर्रीयोंसे
के कभी दिलपर जख्म भे हुवे थे
घायल भी हुवे थे आखों से

आवडलं.

मनस्वी's picture

21 Aug 2008 - 7:16 pm | मनस्वी

मस्तच लिहिलंय विजुभाऊ.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

आनंदयात्री's picture

21 Aug 2008 - 7:29 pm | आनंदयात्री

उन्हे तो खैर इन्तज़ार
होता है कयामत का
हमे तो वो भी नसीब नही
कयामत से गुजर चुका

क्या बात है सातारवी !

. तू असताना मी उत्साहाचा झरा असतो बडबड्या असतो. काय बोलु काय नको असे होत असते मला.तू नसतानाही मी बडबड्याच असतो फ़रक फ़क्त इतकाच की मी स्वत:शीच बोलत असतो मनातल्या मनात

ह्म्म .. !!

मेरे साथ सडकपर कुछ और भी निशान थे
शायद तुम्हारे कदमों के होंगे
चलो इसी तरह सही
हम कदम से कदम मिलाकर तो चली.

का चिरफाड करताय विजुभाउ ... अगदी ठिक्कर-ठिक्कर केलत !! शेवट अप्रतिम !!

तुझे ते काचा फ़ुटल्यासारखे खळ्ळकन हसणे अजून माझ्या कानात आहे.
जिए जिए ;)

विजुभाऊ's picture

22 Aug 2008 - 9:48 am | विजुभाऊ

प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे आभार

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मदनबाण's picture

22 Aug 2008 - 10:02 am | मदनबाण

"जा:नक्को सांगू" म्हणत तू काही क्षण लहान मुलासारखे गाल फ़ुगवुन रुसुन बसायचीस. क्षणभरानी डोळ्याच्या कोप-यातुन माझ्या कडे पहायचीस.आणि आपली नजर भेट झाल्यावर तो रुसवा विसरुन एकदम खळखळुन हसायचीस. तुझे ते काचा फ़ुटल्यासारखे खळ्ळकन हसणे अजून माझ्या कानात आहे.
मस्तच !!

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

वाचताना पुन्हा त्याच मूड मधे गेलो.......