सलाम अभिनव बिंद्राला!!!

गिरीराज's picture
गिरीराज in जनातलं, मनातलं
11 Aug 2008 - 11:19 am

सक्काळी सक्कळी टि.व्ही. लावला तर दूरदर्शन स्पोर्ट्स वर अभिनव बिंद्राला पदक मिळाल्याचीच

बातमी सांगणे चालू होते. १०मी एयर रायफ़ल गटात त्याने पदक मिळवले. पण कोणते ते काही लवकर

कळेना. आणि सुवर्णपदक मिळाले हे सांगितले तर कानांवर विश्वास बसेना! शेवटी विश्लेषकांनी त्यांचे

बोलणे आटोपते घेऊन थेट प्रक्षेपण दाखवायला सुरवात केली तेव्हा अगदी आपणच पदक मिळवले

इतपत मी हवेत तरंगायला लागलो.२८ वर्षांचा सुवर्णपदकांचा दुष्काळ त्याने संपवला. प्रथमच वैयक्तिक

सुवर्णपदक हा एक इतिहासही घडवला. पदकप्रदान समारंभ बघतांना पापणी मिटवू नये असेच होत होते.

श्वास अगदी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत टि.व्ही.चा आवाज वाढवून भारताचे नाव आणि ऐकण्यासाठी

प्राण कानात गोळा करून ऐकत होतो. चीनच्या गतविजेत्या आणि यावेळेच्या रजतपदक विजेत्या झू

किनान च्या डोळ्यांत अश्रू तरळून गेले. क्षण आला अभिनव बिंद्राच्या पदक प्रदानाचा! पण पठ्ठ्या

अगदी शांत आणि संयमी निघाला. ज्या अविचलतेने त्याने शेवटचा शॉट घेतला त्याच शांतपणे त्याने

पदकाचा स्वीकार केला. आता वेळ होती भारताच्या राष्ट्रगीताची! ’जन गण मन’ ची धून वाजवणे सुरू

झाले आणि आपला तिरंगा चीन आणि फ़िनलंडच्या राष्ट्रध्वजाच्याही काही ईंच वर हळूहळू सरकू

लागला. मन अगदी भरून आले. एक गौरवाचा क्षण मी अनुभवत होतो!

आता सगळे मिडियावाले चेकाळतिल. अभिनव बिंद्राने काल काय खाल्ले होते,कोणत्या देवाचे नाव घेतले

होते ईथपासून त्याने कोणत्या रंगाची अंडरवियर घातली होती ईथपर्यंत चर्चा झडतिल. स्वतःचे काही

कर्तुत्व नसलेले राजकारणी त्याचे श्रेय आपल्याला कसे आहे हे पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न

करतिल.आपल्याला त्याचे काही देणेघेणे नाही! जो संयम आणि चिकाटी दाखवत अभिनव ने सुवर्णपदक

मिळवले आहे त्याबद्दल एक अभिमान मनात राहील. आपले राष्ट्रगीत वाजवले जात असतांना तिरंगा

वरवर जात असतांना सगळेच विसरायला झाले होते. आता मिडियाचे चेकाळणे सहजतेने सहन करतांना

तोच एक क्षण सतत डोळ्यांसमोर येत राहील. सलाम अभिनव बिंद्राला!

क्रीडाअभिनंदन

प्रतिक्रिया

अनिल हटेला's picture

11 Aug 2008 - 11:22 am | अनिल हटेला

अगदी मनातल बोललात !!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

विद्याधर३१'s picture

11 Aug 2008 - 11:23 am | विद्याधर३१

अतिशय उत्कट भावना व्यक्त केल्या आहेत. उन्नत होत जाणारा तिरन्गा पाहून असेच वाटले....

विद्याधर

प्रगती's picture

11 Aug 2008 - 11:30 am | प्रगती

सक्काळी सक्काळी अगदी छान बातमी दिलीत. :)
पदकप्रदान समारंभ बघतांना पापणी मिटवू नये असेच होत होते.

श्वास अगदी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत टि.व्ही.चा आवाज वाढवून भारताचे नाव आणि ऐकण्यासाठी

प्राण कानात गोळा करून ऐकत होतो. तुमच्या भावनांशी सहमत.

मनिष's picture

11 Aug 2008 - 12:09 pm | मनिष

आता सगळे मिडियावाले चेकाळतिल. अभिनव बिंद्राने काल काय खाल्ले होते,कोणत्या देवाचे नाव घेतले होते ईथपासून त्याने कोणत्या रंगाची अंडरवियर घातली होती ईथपर्यंत चर्चा झडतिल. स्वतःचे काही कर्तुत्व नसलेले राजकारणी त्याचे श्रेय आपल्याला कसे आहे हे पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करतिल.आपल्याला त्याचे काही देणेघेणे नाही!

जो संयम आणि चिकाटी दाखवत अभिनव ने सुवर्णपदक मिळवले आहे त्याबद्दल एक अभिमान मनात राहील. आपले राष्ट्रगीत वाजवले जात असतांना तिरंगा वरवर जात असतांना सगळेच विसरायला झाले होते.

सहमत!!!

स्वाती दिनेश's picture

11 Aug 2008 - 12:09 pm | स्वाती दिनेश

अतिशय उत्कट लिहिले आहेस,आवडले.
अभिनवचे अर्थातच खूप खूप अभिनंदन!
स्वाती

साती's picture

11 Aug 2008 - 12:45 pm | साती

अतिशय उत्कट लिहिले आहेस,आवडले.
हेच म्हणते.
जणू स्वतःलाच पदक मिळाल्यासारखा आनंद झाला.

साती

सहज's picture

11 Aug 2008 - 12:57 pm | सहज

अगदी असेच म्हणतो.

गिरीराज मनापासुन लिहले आहेस. आवडले.

अभिनव बिंद्राचे अभिनंदन.

भारताला ऑलिंपिक मधे सुवर्णपदक!!!! शॉल्लेट!!!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Aug 2008 - 2:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

खूप छान लिहिला आहे हा लेख!
आणि अर्थातच अभिनव बिंद्राचं अभिनंदन!

प्रियाली's picture

11 Aug 2008 - 2:56 pm | प्रियाली

सकाळी उठल्या उठल्या अत्यंत आनंदाची बातमी.

अभिनंदन अभिनवचे आणि भारताचे.

मदनबाण's picture

12 Aug 2008 - 9:38 am | मदनबाण

सहमत..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

अजिंक्य's picture

11 Aug 2008 - 12:32 pm | अजिंक्य

स्वातीताईंशी सहमत!
-अजिंक्य
www.ajinkyagole1986.blogspot.com.

केशवसुमार's picture

11 Aug 2008 - 1:08 pm | केशवसुमार

गिरीशेठ,
आपले राष्ट्रगीत वाजवले जात असतांना तिरंगा वरवर जात असतांना सगळेच विसरायला झाले होते.
आता मिडियाचे चेकाळणे सहजतेने सहन करतांना
तोच एक क्षण सतत डोळ्यांसमोर येत राहील. सलाम अभिनव बिंद्राला!

क्या बात है!!
अतिशय उत्कट भावना व्यक्त केल्या आहेत!! अभिनंदन!!
अभिनव चे हर्दिक अभिनंदन!!
(अभिमानाने छाती फुगलेला) केशवसुमार

पक्या's picture

11 Aug 2008 - 1:15 pm | पक्या

भावना छान शब्दात मांडल्या. आवडले.

विसोबा खेचर's picture

11 Aug 2008 - 1:24 pm | विसोबा खेचर

आता वेळ होती भारताच्या राष्ट्रगीताची! ’जन गण मन’ ची धून वाजवणे सुरू झाले आणि आपला तिरंगा चीन आणि फ़िनलंडच्या राष्ट्रध्वजाच्याही काही ईंच वर हळूहळू सरकू लागला. मन अगदी भरून आले. एक गौरवाचा क्षण मी अनुभवत होतो!

हे डोंगराच्या राजा, केवळ सुरेख लिहिलं आहेस...! जी चाहता है की तेरा हाथ चूम लू! :)

झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा..! :)

आता सुवर्णपदक मिळालं हा भाग सोडून द्या, परंतु तरीही आमचा भारत केव्हाही ग्रेटच!

इतके दिवस साला भारताला सुवर्णपदक मिळत नाही, भारत असाच आहे, तसाच आहे, अशी बोंब मारणार्‍यांची थोबाडं आता गप्प होतील...! :) साला, आम्ही आहोत हे असे आहोत. यायचं तर इथे या, रहायचं तर रहा नायतर चालू पडा! :)

बिन्द्राशेठ, जियो साला...! लेका तुला पदक मिळालं त्याचं सेलिब्रेशन आम्ही येत्या बुधवारी ग्लेन मोरांजी या सिंगल माल्ट स्कॉचने करंणार! :)

आपला,
(भारतप्रेमी) तात्या.

चंबा मुतनाळ's picture

11 Aug 2008 - 1:45 pm | चंबा मुतनाळ

गिरीराज, फारच छान आणि उत्कट लिहीले आहेस.

अभिनव भिंद्राचे अभिनंदन!

भडकमकर मास्तर's picture

11 Aug 2008 - 2:55 pm | भडकमकर मास्तर

शेवटचा शॉट १० .८ चा मारला त्याने...
भन्नाट ....काय कूल होता तो...
साईना सुद्धा क्वॉर्टरला पोचली...
झकास...
आता अजून काही जणांनी उत्तम कामगिरी करावी अशी आशा...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आन्या's picture

11 Aug 2008 - 4:32 pm | आन्या

अभिनवचे मनःपुर्वक अभिन्नदन!
पदक प्रदान करताना 'जन गन मन' धुन सुरु झाली ,मन भरुन आले!
+१ सहमत!!!

विकास's picture

11 Aug 2008 - 5:17 pm | विकास

अभिनवचे यश हे भारतासाठी शुभारंभ ठरूंदेत. नाहीतर तितक्यातच पोटं भरून आपण (म्हणजे खेळाडू नाही, तर ऑलिंपिक समिती, राजकारणी, फंडर्स आदी) निवांत होउ शकतो...

आता सगळे मिडियावाले चेकाळतिल. अभिनव बिंद्राने काल काय खाल्ले होते,कोणत्या देवाचे नाव घेतले होते ईथपासून त्याने कोणत्या रंगाची अंडरवियर घातली होती ईथपर्यंत चर्चा झडतिल. स्वतःचे काही कर्तुत्व नसलेले राजकारणी त्याचे श्रेय आपल्याला कसे आहे हे पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करतिल.

अहो म्हणून तर इंग्रजीत म्हण आहे: सक्सेस हॅज मेनी फादर्स बट फेल्यूअर इज ऑर्फन...(यशाचे पितृत्व मिळवायला बरेच जण पुढे येतात पण अपयश हे मात्र पोरके असते).

टाईम्स मधे अभिनवच्या मथळ्यांनतर लगेच लल्लूने बाजी मारली - फुकटचा रेल्वे पास देऊन :)

म.टा. पहा - अभिनवचे कौतूक केले यात नवल नाही. पण त्या आधी नेमबाजांचा फ्लॉप शो! अशी बातमी देत असताना, अंजली भागवत, अवनीत कौर आणि समरेश जंग यांच्या अपयशाबद्दल ज्या पद्धतीने लिहीले आहे ती भाषा काही चांगली वाटली नाही. कोणी हे विसरू नये की अभिनवला अथेन्स मध्ये अपयश आले होते. तो खचला नाही आणि आज त्याने जिंकून दाखवले... हेच इतर पण करून दाखवतील पण त्या साठी अनाठायी जशी प्रसिद्धी नसावी तशीच टिका केली तरी खच्चीकरण करणारी माध्यमांची भाषा आणि राजकारण्यांसकट जनतेची कृती नसवी असे वाटते.

आणि हो अजून एक क्रिकेट व्यतिरीक्त इतर खेळात पण मजा असते आणि आपण स्वतःचे आणि देशाचे नाव मोठे करू शकतो हे सर्वांनाच ध्यानात ठेवावे लागेल.

तरच हा एक शुभारंभ ठरेल...आणि चक दे अभिनव असे म्हणता येईल!

धमाल मुलगा's picture

12 Aug 2008 - 12:26 pm | धमाल मुलगा

अगदी हेच म्हणतो.

अभिनवचे यश वादातीत आहेच. समस्त देशवासियांच्या भावनाही. ह्या दोन्हींचा आदर आहेच.
ह्या यशाबद्दल अभिनवचे हार्दिक अभिनंदन.

पण त्याबरोबरच श्री.विकास ह्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरही थोडासा विचार नक्कीच होणे गरजेचे.

शितल's picture

11 Aug 2008 - 6:00 pm | शितल

सलाम अभिनव बिंद्राला!

आमचाही सलाम.:)

अनिकेत's picture

11 Aug 2008 - 6:26 pm | अनिकेत

तो ब्लॉग लिहीतो.
http://abhinavbindra.blogspot.com
जाऊन त्याचं अभिनंदन करा.

आणि राज्यवर्धन राठोर सुद्धा लिहीतो.
http://chillyrathore.blogspot.com/
त्याच्या पोस्टमधला तिसरा व्हिडिओ पहा. अगदी त्याच्या खांद्यावरून घेतला आहे.
ती टार्गेट्स आपल्याला दिसत पण नाहीत, आणि हा माणूस चक्क उडवतो.

याव्यतिरिक्त अनेक भारतीय-विदेशी ऍथलीट्स ब्लॉग्स लिहीतात.
लेनोव्होची ऑलिंपिक ब्लॉगर्सची यादी खाली आहे.
http://summergames.lenovo.com/contributors.php/?language=en

चतुरंग's picture

11 Aug 2008 - 7:16 pm | चतुरंग

आपले राष्ट्रगीत वाजवले जात असतांना तिरंगा वरवर जात असतांना सगळेच विसरायला झाले होते.
आता मिडियाचे चेकाळणे सहजतेने सहन करतांना
तोच एक क्षण सतत डोळ्यांसमोर येत राहील. सलाम अभिनव बिंद्राला!

क्या बात है!!
अतिशय उत्कटतेने लिहिलेले तुझे स्फुट आवडले. गर्वाने आणि अभिमानाने छाती विशाल झाली!
अभिनंदन 'अभिनव' 'भारत'!! :)

चतुरंग

संदीप चित्रे's picture

11 Aug 2008 - 7:42 pm | संदीप चित्रे

मेल चेकायला घेतली आणि भारतातून एका मैत्रिणीने चॅटवर सांगितलं... लगेच 'तू नळी'वर जाऊन चित्रफित पाहिली ...
अहाहा... 'जन गण मन ... ' वाजलं जाताना पाहून आणि ऐकून काय वाटलं ते सांगताच येत नाही.
-------------
गिरी -- मिडीयाबाबत एकदम सहमत :)

चतुरंग's picture

11 Aug 2008 - 9:21 pm | चतुरंग

अरे हे 'तू नळी' वर आहे हे माहीत नव्हतं पण आत्ताच ऐकलं आणि आनंदाने रडलो! :)

चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

12 Aug 2008 - 9:34 am | भडकमकर मास्तर

आनंदाने रडलो
असेच झाले.... काल दिवसभर तेच पाहत होतो आणि पुन्हा पुन्हा पाणी यायचंच डोळ्यात...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

छोटा डॉन's picture

12 Aug 2008 - 10:02 am | छोटा डॉन

चतुरंगशेठ आणि आंद्याभाई, तुमच्याशी अगदी शब्दशः सहमत आहे ...
काल कामाच्या लोडमुळे हापीसात व घरी केबल नसल्याने "व्हिडीओ" पाहिलाच नाही ...

आज आल्याआल्या पहिल्यांदा तो पाहिला आणि शब्दशः डोळ्यात पाणी आले हो ...
ते भारतीय राष्ट्रगीत व त्यावेळचा अभिनवचा धिरगंभीर चेहरा ...
सलाम !!!

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

स्वाती दिनेश's picture

12 Aug 2008 - 12:40 pm | स्वाती दिनेश

आत्ताच युट्युबवर हे पाहिले आणि गिरीराजच्या शब्दातली उत्कटता अनुभवली.डोळ्यातल्या पाण्यात तिरंग्याचा,देशाचा आणि अभिनवचा अभिमान होता.
स्वाती

ऋषिकेश's picture

11 Aug 2008 - 11:45 pm | ऋषिकेश

बिंद्राला पदक घातल्यावर तिरंगा वर जात असताना राष्ट्र्गीत वाजू लागलं आणि खरंच अंगावर रोमांच उभे राहिले.... डोळे डबडबले!धन्य बिंद्रा!.. धन्यवाद बिंद्रा!

बाकी गिरीराज, तुमचा शब्दन शब्द इतका उत्कट आहे.... खुप खुप खुप खुप आवडले तुमचे लेखन!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Aug 2008 - 7:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिंद्राला पदक घातल्यावर तिरंगा वर जात असताना राष्ट्र्गीत वाजू लागलं आणि खरंच अंगावर रोमांच उभे राहिले.... डोळे डबडबले!धन्य बिंद्रा!.. धन्यवाद बिंद्रा!

बाकी गिरीराज, तुमचा शब्दन शब्द इतका उत्कट आहे.... खुप खुप खुप खुप आवडले तुमचे लेखन!