अॅड्व्होकेट रत्नपारखी यांची शेपटा हि कविता मिसळपाव साठी पाठवत आहे. तुम्ही सर्व कवितेचा आनंद घ्याल अशी अपेक्षा.
एस. एस. सी. ला बसलो होतो प्रथम परीक्षेस
एकाग्रतेने प्रश्न सोडवा आदेश उपदेश
पेपर पहिला , घंटा पहिली क्षण उस्सुक्तेचा ,
माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशी चा .
मानेला ती देऊनी झटका नकळत सवयीने ,
लिहू लागली पेपर मधली पानावर पाने .
मऊ रेशमी मोहक काला, शेपटीचा भार
तिचा तत्क्षणी येउनी पडला माझ्या बाकावर ,
तीन तासही एक चित्त मी तिच्या शेपटात
एक ओळही लिहिली नाही उभ्या पेपरात
शेवटची ती घंटा झाली , आलो भानावरी
कळले आता अपुले जिने गावी खेडयावरी.
शेती वरती मोते वरती माझी उपजीविका ,
शिक्षणास मी आज पारखा , शुभदा प्राध्यापिका
केसांनी त्या गळा कापला अलगद जी माझा ,
परी बैलांच्या पिळून शेपटा जगतो हा राजा
| लेखनविषय: |
|---|
वाचने
24219
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
जोशीसाहेब,
प्रियाली,
In reply to जोशीसाहेब, by प्रियाली
धन्यवाद!
In reply to प्रियाली, by विवेक ठाकूर
शेपटा हि कविता मराठीत टाइप
पाटील, लै भारी !
In reply to शेपटा हि कविता मराठीत टाइप by दिग्विजय पाटील
खिक्क... भारी आहे...