✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"शिक्षा ठोठवतान गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी काय ?"

श
शितल यांनी
Wed, 07/16/2008 - 09:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
28908 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

क
किर्ति Wed, 07/16/2008 - 09:22 नवीन

आवडला

मला लेख खुप आवडला आणि तुझा आभिमान हि वाटत आहे
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 07/16/2008 - 09:25 नवीन

>>गरीबी

>>गरीबी अत्यत वाईट शाप दोन वेळेचे पोट भरल्यावर सगळी तत्वे जीवनात अगिकारली जातात खरं आहे शीतल.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 07/16/2008 - 10:32 नवीन

ऑफ्कोर्स

ऑफ्कोर्स !! शितल देवी, शिक्षा ठोठवतान गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी शिवाय वरील लेख वाचुन सुन्न झाल्या सारख वाटल... बिन कामी कोर्टाच्या खेपा मीही मारल्यात.... त्यामुळे कदाचीत कोर्ट - कचेरी,पोलीस ह्याविषयी फार - फार वाइट अनुभव गाठीशी आहेत.. असो... तुम्ही जज च्या पी ए होतात .. मग तुम्हाला सिस्टीम चान्गली माहिती असेल.... मी उघड्या डोळ्यानी पाहिलये... असो.... लेख मात्र छान आहे..... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
स
सूर्य Wed, 07/16/2008 - 10:44 नवीन

माझे मत

लेख आवडला. पार्श्वभुमी लक्षात घ्यावी हे मत लेख वाचुन अजुन पक्के झाले आहे. - सूर्य.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 07/16/2008 - 10:55 नवीन

शहानिशा

शितल, अशा प्रकारची नोकरी करताना एकदम खंबीर मन लागते. धन्य आहेस तू. मला वाटतं की शिक्षा ठोठावताना गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी, पण तिच्या खरेपणाची पूर्ण शहानिशा करावी. नाहीतर उद्या कोणीही अट्टल गुन्हेगार खोटे चित्र उभे करून सुटेल. तुझे अनुभव वाचायला आवडतील. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 07/16/2008 - 14:26 नवीन

असेच म्हणतो

खरेपणाची पूर्ण शहानिशा करावी. हे महत्वाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
इ
इनोबा म्हणे Wed, 07/16/2008 - 11:01 नवीन

शिक्षा

शिक्षा ठोठावताना गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली जातेच. लेख वाचुन खरेच सुन्न झाल्यासारखे वाटले. गरीबी अत्यत वाईट शाप दोन वेळेचे पोट भरल्यावर सगळी तत्वे जीवनात अगिकारली जातात अगदी बरोबर कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 07/16/2008 - 11:06 नवीन

नैतीक / अनैतीक हे सापेक्ष असते.

पैगंबर म्हणतात की न्याय आणि अन्याय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाला दिलेला न्याय हा कोणावरतरी अन्याय करत असतो. फाशी जाणाराची मुलेबाळे उघडी पडतातच की. फासे पारध्यांच्यात एकदाही चोरी/ डाका न घातलेल्याचे लग्न होत नाही. नैतीक / अनैतीक हे सापेक्ष असते. अन्यथा तत्वासाठी लढणारा दहशवादी / आणि स्वातन्त्र सैनीक यात फरक कसा होऊ शकतो. स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह. किंवा जेहाद ही कल्पना कुराणातल्या इतर लोक भटकलेल्या मार्गाने जात आहेत त्याना योग्य मार्ग दाखव या वरुन आलेली आहे. काफिर ( मार्ग भटकलेले / अल्लावर श्रद्धा न ठेवणारा). प्रत्येक वेळेस जर गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेत बसले तर कायदा / नियम हा नाममात्र होईल आणि निवाडा देण्यार्‍याला काय भासले याला महत्व येईल. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 07/16/2008 - 11:15 नवीन

अगोदरच

अगोदरच कोकण भागात मजुरीला फारसा वाव नाही, त्याला ८ /९ महिण्याचा एक मुलगा होता,बायको पोटभर जेवण मिळत नसल्याने आजारी असायची, त्या त्याच्या लहानग्याला २ दिवस आईच्या दुधा शिवाय काही मिळाले नव्हते आणि त्या माऊलीच्या पोटात ही अन्न नसल्याने तीला दुध ही नाही. पण ह्याला जबाबदार कोण? ज्या माणसाचं काहीही कयमस्वरुपी उत्पन्न आहे त्याने बायको, मुलगा या फंदात पडावंच का? चोरी ती चोरी! आणि तिला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. इथे शितलला त्या माणसाबद्दल पुळका आहे असं वाटतंय, परंतु ज्या बिचार्‍याचं धान्य चोरीला गेलं त्याचा काय दोष? त्याला न्याय मिळायला नको का?? उद्या मी लग्न करेन, चार मुलांना जन्म देईन आणि त्याना पोसण्याकरता चोर्‍या करत सुटेन तर ते चालेल का? अर्थात, माणुसकीच्या नात्याने तुमच्या स्टाफने त्या कुटुंबाला मदत केली हे कौतुकास्पद आहे परंतु त्या चोराचा पुळका गैर आहे असं मला वाटतं.... आपला, (न्यायप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 07/16/2008 - 12:58 नवीन

सहमत आहे ...

चोरी ती चोरी! आणि तिला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. इथे शितलला त्या माणसाबद्दल पुळका आहे असं वाटतंय, परंतु ज्या बिचार्‍याचं धान्य चोरीला गेलं त्याचा काय दोष? त्याला न्याय मिळायला नको का??
अगदी बरोबर तात्या ... झालेल्या चुकीचे प्रायश्चित्त अथवा शिक्षा ही झालीच पाहिजे ... मानवता, गुन्ह्यामागच्या पार्श्वभुमी या गोष्टी जमेस भरल्याच पाहिजेत त्या शिक्षा ठोठावताना ... सरळसोट माफी देता येणार नाही . म्हणतात ना "म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावता कामा नये" ... जर गुन्हा हा "जाणुनबुजुन केलेली हत्या वा इतर काही" असेल तर बाकीच्या कुठल्याही गोष्टी जमेस न धरता शिक्षा ही क्झालीच पाहिजे. मग गुन्हेगार "कोकणातला फाटका गरिब असो वा माजोरडा मनु शर्मा या सलमान" असो. त्याचे "सामाजिक स्थानही" विचारात घेण्यचे कारण नाही कारण गुन्हा करताना त्याचे "सामाजिक स्थान" त्याने वेशीवर टांगले असते व "कोण माझे बिघडवतो" ह्या माजोरडेपणाने गुन्हा केलेला असतो ... जर "परिस्थीतीने हतबल" झालेल्याकडुन "स्वसंरक्षणार्थ" गुन्हा घडला असेल तर शिक्षा ठोठावताना थोडा शिथीलपणा आणता येईल पण माफ करता येणार नाही ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 07/16/2008 - 13:05 नवीन

भूक ही भूकच आणि चोरी ती चोरीच!

पोटाची भूक भागवण्यासाठी गरिबाने वाण्याकडे चोरी करायची. >> पण ह्याला जबाबदार कोण? ज्या माणसाचं काहीही कयमस्वरुपी उत्पन्न आहे त्याने बायको, मुलगा या फंदात पडावंच का? कायमस्वरुपी उत्पन्न नाही म्हणून लग्न नाही केलं तर शरीराच्या भूकेसाठी आणखी कुठे डल्ला मारायचा का? गरीब असला तरी तोही माणूसच आहे. लग्न करूनही पुढे जबाबदारी कशी वाढणार नाही याची माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचतच नाही. धान्याच्या चोरीसाठी शिक्षा करणं हे त्या जागी ठीक आहे, पण तो कायमस्वरूपी उपाय नव्हे! अर्थात ही काही न्यायालयाची जबाबदारी नाही. (गोंधळलेली) संहिता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
छ
छोटा डॉन Wed, 07/16/2008 - 13:20 नवीन

म्हणजे काय नक्की ?

"भुक ही भुक असते" हे बरोबर पण त्याला "चोरी" हा उपाय कदापी होऊ शकत नाही ... अहो हातापायाने "पांगळी / लंगडी" माणसे कष्ट करुन पोट भरतात व "जीवन नैय्या उस पार" लावतात मग ह्या "धडधाकट माणसांना" काय धाड भरली ??? मी उपाशी होतो म्हणुन मी चोरी केली हे त्याच्या अपराधाचे समर्थन होऊ शकत नाही ... ह्याचीच पुढची पायरी म्हणजे "दरोडे, वाटमारी " असे गुन्हे .... का हे पण "चालते" ह्या सदरात मोडतात ? "माझ्याकडे घालायला कपडे नाहीत म्हणुन मी दरोडा घातला" हा युक्तीवाद होऊ शकतो का ? त्याच्याऐवजी "कष्ट" करुन पोट भरन्याची बुद्धी का होत नाही ? >>लग्न करूनही पुढे जबाबदारी कशी वाढणार नाही याची माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचतच नाही. का बरे ? ह्यात सांगण्यासारखे काय आहे ? स्वतःला जाणीव होत नाही का याची, डोक्याने अधु आहे का ? अशा छोट्या छोट्या व कॉमनसेन्स असलेल्या गोष्टींची "माहिती गरजुंपर्यंत" पोहचवण्याचा आग्रह होत असेल तर ह्या "गरजा" पुर्ण करण्यासाठी "यादवी" होण्याचे दिवस लांब नाहीत. >>धान्याच्या चोरीसाठी शिक्षा करणं हे त्या जागी ठीक आहे, पण तो कायमस्वरूपी उपाय नव्हे! अर्थात ही काही न्यायालयाची जबाबदारी नाही. येस, यु सेड इट !!! हेच त्याचे उत्तर, असे "तात्पुरते गुन्हेगारी" उपाय शोधण्यापेक्षा "कायमस्वरुपी यश " देणारा "कष्टाचा राजमार्ग" का नको वाटतो ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
क
कुंदन Wed, 07/16/2008 - 13:37 नवीन

"तात्पुरते गुन्हेगारी" उपाय शोधण्यापेक्षा ............

पण भौ अमर्याद वाढती लोकसंख्या पाहता प्रत्येकाला नोकरी मिळणे अवघड आहे. शिवाय रोजगार हमी सारख्या सर्वसामान्यांसाठी राबवल्या जाणार्‍या योजनांमधला भ्रष्टाचार ही पण अडचण आहेच..... हे सर्व पाहता यादवी माजेल तो दिवस दुर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Wed, 07/16/2008 - 14:04 नवीन

नोकरीच का ?

नोकरीच का पाहिजे ? उद्योगधंदे करा, शेती करा आणि काही करा पण कष्टाची भाकरी मिळवा ... काही किमानकौशल्यावर आधारीत असणरे भरपुर कोर्सेस आहेत, त्यातनं आरामात पोट भरु शकेल की ... जर त्या " सो कॉल्ड आरामाच्या आयटी जॉब" चे आकर्षण असेल तर " मन लाऊल शिका " की ... सगळेच कसे आयते मिलेल ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 07/16/2008 - 14:48 नवीन

दुष्टचक्र

छोटा डॉन, मला आपलं म्हणणं पटतं. पण असंही वाटतं की शिकलेल्या, सुस्थितीमधल्या पालकांच्या घरात जन्माला आले म्हणून मी एवढातरी विचार करु शकले/शकते. विचार आजूबाजूच्या परिस्थितीमुळेच (बय्राचदा) आहेत तसे होतात. पण विचारही करायला सुरुवातच होणार नाही एवढी भीषण परिस्थिती असेल तर काय करायचं? या गरीबाने सोपा (पण वेळ मारून नेणारा) मार्ग शोधला. प्राप्त परिस्थितीमुळे ज्यांची एवढी विचार करण्याची कुवतच नाही त्यांचा विचारही ज्यांची कुवत आहे त्यांनी करू नये का? (करणारे असतात म्हणूनच अण्णा कर्वे जन्माला आले आणि त्यांच्या कार्याला हातभार लावणारे तात्यापण!) गरीब माणूस कदाचित आपण म्हणता तसा विचारच करू शकत नाही म्हणून खूप पैसे मिळवू शकत नाही, म्हणून शिक्षण नाही, आणि म्हणून गरिबी पुढच्या पिढ्यांतही रहाते. प्रत्येक चोराला, गरिबाला आपली परिस्थिती बदलूच नये असं वाटत असेल का? या माणसाला असं वाटत असेल का की ज्या पोरासाठी मी चोरी केली त्यालाही माझ्यासारखंच आयुष्य मिळावं? नक्कीच नाही. पण असेल किती (टक्के) लोक आपण पहातो जे फार हलाखीतून सुस्थितीमधे आले आहेत? (फक्त लेखणी आणि कळफलक चालवणारी) संहिता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ट
टारझन Wed, 07/16/2008 - 19:27 नवीन

डॉन राव ....

>>>जर त्या " सो कॉल्ड आरामाच्या आयटी जॉब" चे आकर्षण असेल तर " मन लाऊल शिका " की ... असा विचार करणार्‍यांचा आम्ही निषेध करतो ! आय टी हे शारिरीक नाही मानसिक कष्टाचं काम आहे. आराम नक्कीच नाही. बाकी डॉनराव आणि तात्यांच्या विचारांशी बिलकूल सहमत. ईंदूरीकर महाराज त्यांच्या किर्तनात म्हणतात "पोर्‍याला कमवायची अक्कल आल्याशिवाय त्याचं लग्न करू नये" आयला ... मी स्वता: जर त्या माणसाच्या ठिकाणी असतो तर कसलं पण काम करून माझ्या पोटाची आधी सोय केली असती... ये लग्न अन् पोर काढायची हुशारी नसतीच केली... चोरी ती चोरीच .. तो दुकानदार पण पोटात पोट काढून धंदा करतो... काय लुटवायंका त्याने ? अपराध्यांचा पुळका नको .. तात्यांशी सहमत कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोट्या Wed, 07/16/2008 - 12:19 नवीन

मग फरक तो काय रहिला?

पार्श्वभूमी लक्षात न घेउन कसे चालेल? नाही तर खुन करणारा गुन्हेगार आणि त्याला फाशी देणारा जज यात फरक तो काय रहिला?
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 07/16/2008 - 13:24 नवीन

सहमत

पार्श्वभूमी लक्षात न घेउन कसे चालेल? नाही तर खुन करणारा गुन्हेगार आणि त्याला फाशी देणारा जज यात फरक तो काय रहिला? अगदी हेच म्हणतो. हे म्हणजे सूड घेतल्यासारखे झाले. जर गुन्ह्याची पार्श्वभूमी न पाहता शिक्षा द्यायची तर मग स्वातंत्रसैनिक/क्रांतिकारी ही गुन्हेगारच ठरले की! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोट्या
व
विसोबा खेचर Wed, 07/16/2008 - 13:59 नवीन

जर

जर गुन्ह्याची पार्श्वभूमी न पाहता शिक्षा द्यायची गुन्ह्याची पार्श्वभूमी न बघता शिक्षा द्यायची म्हणजे नक्की काय करायचं? गुन्हा हा गुन्हाच असतो! त्या माणसाच्या बायकोमुलाकरता अन्नाची गरज होती म्हणून त्या धान्याची चोरी केली. उद्या माझ्या बायकोपोरांना पैशांची गरज लागेल म्हणून मी पैसे चोरायचे का? :) मग स्वातंत्रसैनिक/क्रांतिकारी ही गुन्हेगारच ठरले की! मल हा मुद्दा येथे अत्यंत गैरलागू वटतो! तो लढा देशाकरता होता, ब्रिटिश सत्तेची गुलामगिरी मोडून काढण्याकरता होता. स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारांनी जी काही कृत्ये केली ती देशाकरता होती, स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थाकरता नव्हती! वैयक्तिक स्वार्थाकरता कुणा स्वातंत्र्यवीराने आपण म्हणता तशी 'गुन्हेगारी' केल्याचं माझ्या तरी ऐकीवात नाही, आपल्या असेल तर माहीत नाही! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
र
रम्या Wed, 07/16/2008 - 16:48 नवीन

मुद्दा गैरलागू कसा?

मल हा मुद्दा येथे अत्यंत गैरलागू वटतो! तो लढा देशाकरता होता, ब्रिटिश सत्तेची गुलामगिरी मोडून काढण्याकरता होता. स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारांनी जी काही कृत्ये केली ती देशाकरता होती, स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थाकरता नव्हती! अहो देश देश म्हणजे काय? एक जमिनीचा तुकडा? ब्रिटिश सत्तेची गुलामगिरी मोडून काढण्याचं कारण काय? ब्रिटीश सत्ता कोणत्यातरी आडमार्गाने का होईना भारतीय जनतेला आणि परिणामी स्वातंत्र्यसैनिकाना नुकसान देणारीच होती. स्वतंत्र्यसैनिकांना याची पुर्ण जाणीव होती. म्हणूनच ते लढले. मग शेवटी तो त्यांचा आडमार्गाने केलेला स्वार्थच झाला की. त्यामूळे हा मुद्दा गैरलागू मुळीच नाही. बाकी गुन्हा केला तर शिक्षा झालीच पाहिजे पण गुन्हेगाराचा पुर्वेईतिहास आणी गुन्ह्याची पार्श्वभूमी पाहून शिक्षेची सौम्यता किंवा कठोरता ठरवायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Wed, 07/16/2008 - 17:17 नवीन

दाद!

अहो देश देश म्हणजे काय? एक जमिनीचा तुकडा? ब्रिटिश सत्तेची गुलामगिरी मोडून काढण्याचं कारण काय? ब्रिटीश सत्ता कोणत्यातरी आडमार्गाने का होईना भारतीय जनतेला आणि परिणामी स्वातंत्र्यसैनिकाना नुकसान देणारीच होती. स्वतंत्र्यसैनिकांना याची पुर्ण जाणीव होती. म्हणूनच ते लढले. मग शेवटी तो त्यांचा आडमार्गाने केलेला स्वार्थच झाला की. मी आपल्या अफाट बुद्धीमत्तेला आणि युक्तिवादाला दाद देतो! धन्य आहे तुमची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रम्या
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 07/17/2008 - 16:49 नवीन

.

विनोद बुद्धीला दाद द्यायची विसरलात तात्या आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अन्या दातार Wed, 07/16/2008 - 12:24 नवीन

बरोबर

ज्याला स्वत:चे पोट नीट भरता येत नाही, त्याने लग्न, पोरं, बाळं या फंदातच पडू नये. आपला, (कुठल्याही फंदात नसणारा) अन्या
  • Log in or register to post comments
श
श्री Wed, 07/16/2008 - 13:43 नवीन

ज्याला

ज्याला स्वत:चे पोट नीट भरता येत नाही, त्याने लग्न, पोरं, बाळं या फंदातच पडू नये. आपला, (कुठल्याही फंदात नसणारा) अन्या ======================================================= बरोबर आहे. सरकारने आता के ईम सारखि हॉस्पिटले/सामाजिक संस्था लगेचच बंद करावित कारण मी मेहनत करतो आणी सरकारी कर भरतो आणी त्याच्या जिवावर हे सरकार/सामाजिक संस्था हे असले नीरथक काम करते. ह्याना आजारी पडल्यावर खर्च सोसवत नाहि तर ते सरळ मरुन का जात नाही ? त्या पुढे जाउन मी तर असे म्हणेन गरीब माणसाने जन्मालाच का यावे ? आपला, (छंदी फंदी ) श्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
व
विसोबा खेचर Wed, 07/16/2008 - 13:50 नवीन

सरकारने

सरकारने आता के ईम सारखि हॉस्पिटले/सामाजिक संस्था लगेचच बंद करावित कारण मी मेहनत करतो आणी सरकारी कर भरतो आणी त्याच्या जिवावर हे सरकार/सामाजिक संस्था हे असले नीरथक काम करते. ह्याना आजारी पडल्यावर खर्च सोसवत नाहि तर ते सरळ मरुन का जात नाही ? ह्यात आपल्याला जर काही दोष द्यायचाच असेल तर तो सरकारला द्या, आजारी पडणार्‍या व्यक्तिंना नाही. त्यांना सरकारी मदत मिळते आणि ती ते स्वीकारतात. कुठेही चोरी करत नाहीत! शीतलने मांडलेला मुद्दा हा भादंसं अंतर्गत गुन्हा ठरणार्‍या चोरीचा आहे. कुठल्याही सरकारी अनुदानाचा वा मदतीच नाही! तो वेगळा चर्चाविषय होऊ शकतो! आपला, (न्यायाचा आदर करणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री
अ
अनिल हटेला Wed, 07/16/2008 - 12:25 नवीन

सहमत

सहमत छोट्या!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 07/16/2008 - 13:33 नवीन

निश्चित पणे

१)काहि दिवसापुर्वि चांगल्या घरातिल मुले चोरिच्या प्रकरणात पकडलि गेलि होति त्यामागिल कारण निव्वळ चैन होते(मोबाइल, पब वै.) २)अमलि पदार्थांचा व्यवहार करुन तरुणांचे जिवन नासवणारे ३)अधिक पैशासाठि भ्रष्टचार करणारे अशि अजुन बरिच उदाहरणे देता येतिल. हि उदाहरणे आणि वरिल चोरिचा गुन्हा ह्याना न्याय देताना वेगळा विचार व्हायला हवा. तो मजूर काहि अट्टल गुन्हेगार नव्हता
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 07/16/2008 - 13:37 नवीन

?

हि उदाहरणे आणि वरिल चोरिचा गुन्हा ह्याना न्याय देताना वेगळा विचार व्हायला हवा. तो कसा काय अन् का? चोरी ही चोरीच असते मग कारणं काहीही असोत! नाहीतर उद्या कुणीही उठून चोर्‍या करायला लागेल! मस्त लग्न वगैरे करायचं, पोरं जन्माला घालायची आणि त्याना पोसता येत नाही म्हणून चोर्‍या करत सुटायचं! च्यायला, हा धंदा बरा आहे! :) आपला, (न्यायप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Wed, 07/16/2008 - 13:53 नवीन

सरकारि

सरकारि अधिकार व्हायचे , राजकारणी व्हायचे, अजुन काय काय व्हायचे आणि मजबूत पैसे कमवायचे हा पण धंदा छान आहे आणि एक फायदा म्हणजे चोरि हि चोरिच हा नियम तंतोतंत लागु होत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Wed, 07/16/2008 - 14:03 नवीन

सरकारि

सरकारि अधिकार व्हायचे , राजकारणी व्हायचे, अजुन काय काय व्हायचे आणि मजबूत पैसे कमवायचे हा पण धंदा छान आहे आणि एक फायदा म्हणजे चोरि हि चोरिच हा नियम तंतोतंत लागु होत नाहि. अगदी खरं! जोपर्यंत पकडले जात नाही तोपर्यंत कुणीच चोर नसतो! तोपर्यंत कुणीही काहीही धंदे करावे! तो धान्य चोरणारा माणूसदेखील पकडला गेला हाच त्याचा दोष! :) तो पकडला गेला नसता तर आमचं काहीच म्हणणं नव्हतं! आणि हा विषयदेखील इथे उपस्थित झाला नसता! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Wed, 07/16/2008 - 14:24 नवीन

लागेबांधे

जोपर्यंत पकडले जात नाही तोपर्यंत कुणीच चोर नसतो अगदि बरोबर , पण हे मोठे(?) लोक जेन्व्हा पकडले जातात तेन्व्हा बहुत करुन वाचावयस असे मिळते "सब्बळ पुरव्या अभावि निर्दोष मुक्तता" आता हे पुरावे कसे "मॅनेज" केले जातात हे सर्वाना माहित असते कारण लागेबांधे "सब्बळ" असतात. वरच्या घटने सारखि निकालाचि तत्परता ह्यांच्या बाबतित का बघायला मिळत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Wed, 07/16/2008 - 14:36 नवीन

वरच्या

वरच्या घटने सारखि निकालाचि तत्परता ह्यांच्या बाबतित का बघायला मिळत नाहि. अगदी खर! परंतु त्या फुटकळ चोराचे लागेबांधे सबळ नव्हते त्याला आता काय इलाज? पण म्हणून त्याचा पुळका येण्याचं काहीच कारण नाही. शेवटी चोरी ती चोरी आणि त्यातून जर ती पकडली गेली आणि पुरेसे पुरावे असतील व जर सबळ लागेबांधे नसतील तर ते फारच वाईट! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
छ
छोट्या Wed, 07/16/2008 - 16:43 नवीन

असहमत...

कोणताही गुन्हा हा 'गुन्हा केला' किंवा 'गुन्हा नाही केला' अशा दोन मधे एकदम विभागता येत नाही (१ or ० in software terms ). जोपर्यंत गुन्ह्याच्या मगिल motive किंवा उद्देश स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याला शिक्षा देणे म्हणजे रानटीपणाचं ठरेल. चोरी करण्यामागे जर उद्देश परिस्थितीजन्य किंवा समाजमान्य असेल तर... त्याला तो गुन्हा माफ होउ शकतो किंवा शिक्षा कमी होउ शकते. गुन्हा हा धंदा होत असेल तर त्याला जबरी शिक्षा ही झालीच पाहिजे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
इ
इनोबा म्हणे Wed, 07/16/2008 - 17:45 नवीन

सहमत

जोपर्यंत गुन्ह्याच्या मगिल motive किंवा उद्देश स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याला शिक्षा देणे म्हणजे रानटीपणाचं ठरेल. सहमत गुन्हा हा धंदा होत असेल तर त्याला जबरी शिक्षा ही झालीच पाहिजे!!! हेच म्हणणे आहे माझे. गुन्हेगाराला शिक्षा देताना त्या गुन्ह्यामागची पार्ष्वभूमी लक्षात घ्यायलाच हवी. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोट्या
व
विसोबा खेचर Wed, 07/16/2008 - 17:56 नवीन

कशावरून?

गुन्हेगाराला शिक्षा देताना त्या गुन्ह्यामागची पार्ष्वभूमी लक्षात घ्यायलाच हवी. ती कशी काय लक्षात घेणार? कशावरून त्या माणसाने आधीही असं केलं नसेल? फक्त पकडला गेला नसेल इतकंच! ते ठीकच आहे. पकडला न गेल्यामुळे त्याला दोषी मानता येईलच असं नाही. परंतु या वेळेस तो पकडला गेला आहे त्यामुळे त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे! बरं मग इनोबा, गुन्ह्यामगच्या पार्श्वभूमीबद्दल इतक्या काकुळतीने बोलताय तर इतकंच सांगा, की ज्या माणसाचं धान्य चोरलं गेलं त्याच्या न्यायाचं काय? त्याला न्याय कसा मिळणार?? आपला, (न्यायप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
आ
आनंदयात्री Wed, 07/16/2008 - 18:49 नवीन

भारताचा कायदा

१० दोषी सुटले तरी चालतील पण एक निर्दोष बळी जाता कामा नये, या सुत्रावर भारताचा दंड देण्याचा कायदा आधारित आहे असे एकिवात आहे. संबधित विषयातील जाणकारांनी कृपया स्पष्ट करावे. वरिल विधान एकिव माहितीवर आधारित आहे त्यामुळे कृपया चुक भुल माफ करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
श
शितल गुरुवार, 07/17/2008 - 17:00 नवीन

अरे,

१० नव्हे आन्द्या १०० दोषी म्हण पण एक निरअपराध्याला शिक्षा होता कामा नये अशी न्याय व्यवस्था असल्यामुळे आज हा समाजात कायदा एवढा पाळला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
श
शिप्रा Wed, 07/16/2008 - 13:37 नवीन

>>असे

>>असे "तात्पुरते गुन्हेगारी" उपाय शोधण्यापेक्षा "कायमस्वरुपी यश " देणारा "कष्टाचा राजमार्ग" का नको वाटतो ? कोण देणार काम? शिक्षण नाहि म्हणुन काम नाहि, काम नाहि म्हणुन पेसा नाहि आणि म्हणुन शिक्षण नाहि ह्याच दुश्ट चक्रात अडकलेले असतात हि लोके...मी बघीतली आहेत अशी लोके जि कष्टाला तयार आहेत्..पण शिक्षण नाहि म्हणुन काम नाहि...तुम्हि कोणि द्यायला तयार आहात का काम? काम मिळ्णे एवधे सोपे असते का? आणि आपल्या सारख्या आय टी लोकांना ते मिळ्व्णे सोपे असेलही..ह्या लोकांसाथि नक्किच नाहि... जिथे कमी तिथे आम्ही ..:)
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 07/16/2008 - 13:55 नवीन

का बरे ?

काम नाही असे कुणी सांगितले ? पण ते काम करण्याच्या लायक तरी स्वतःला बनवा की ? [ हे मी तुमच्या बाबत बोलत नसुन ही ज्यंची भुमीका आहे आफ्=गर जे लोक असा ओरडा करतात त्यांच्यासाठी आहे ...] >>शिक्षण नाहि म्हणुन काम नाहि, काम नाहि म्हणुन पेसा नाहि आपण काय फक्त "आयटी किंवा तत्सम एसी/पीसी" वाल्या कामाबद्दल बोलत आहात काय ? शिक्षण कमी असेल तर दुसरे काम करता येईल की ... पण नोकरीच का हवी ? काही धम्दापाणी करु शकत नाही का ? एवढा कसला न्युनगंड ? शेती करा, किमानकौशल्यावर आधारीत बरेच उद्योग आहेत, त्यातही पैस्सा मिळतोच की. अगदी उपाशी मरावे लागत नाही, उलट "घामाचा पैसा " मिळाल्याने समाधान लाभते, प्रतिष्ठा मिळते ... ते का नको आहे ? फक्त "व्हाईट कॉलर" का हवे ? व्हाईट कॉलर ही मिळेल पण तसे शिक्षण हवे, त्याशिवाय काम मिलायला ही काय "धर्मदाय संस्था " आहे का ? मुळात "व्हाईट कॉलर" काम म्हणजे" मुबलक पैसा, छनछौकी जीवन, आराम" ही संकल्पना डोक्यातनं काढा ... जास्त नाही सांगत , एकच सांगतो .... "सर्व्हाईव्हल ऑफ फिटेस्ट" हा ह्या जगाचा सिद्धात आहे, त्यानुसार जग चालते .. तुम्ही पहिल्यांदा फिट व्हा मग आपोआप "सर्व्हाईव्ह" कराल ... >>आपल्या सारख्या आय टी लोकांना ते मिळ्व्णे सोपे असेलही.. असे का ? आम्हाला काय "जन्मप्रमाणपत्राबरोबर आयटी नोकरीचे "अपॉइंटमेंट लेटर मिळाले होते का ? का आमच्या बापाची कंपनी आहे आम्हाला असेच घ्यायला ??? आम्ही आत्तापर्यंत केलेल्या कष्टाची , रात्रंदिवस केलेल्या अभ्यासाची, त्यासाठी आम्ही केलेल्या त्यागाची काहीच किंमत नाही का? आम्हाला "जहागिरी" म्हणुन नोकरी मिळाली नाही हे लक्षात का घेत नाही ... आयटी वाल्यांवर एवढा राग का ? मला एक सांगा, तुमची कल्पना काय आहे "आयटी जॉब" बद्दल ? आम्हाला काय "मॉलीश करुन देतात, चांगले चुंगले खाऊपिऊ घालतात, झालच तर पोरी फिरवता येतात, ऐश करता येते" असे वाटते काय तुम्हाला ? आम्ही जे रात्रंदिवस कष्ट करतो त्याची जाणीव आहे का ? माझच घ्या ना, कामासाठी मी "सकाळी ६ ला कंपनीत येतो व कधीकधी घरी जायला रात्रीचा १ वाजतो " ... आरामच आहे ना ? अशा नोकर्‍या करणेही सोप्पे असेल ना ? पुन्हा तेच सांगतो ..."सर्व्हाईव्हल ऑफ फिटेस्ट" अवांतर : मी आयटीवाला नाही .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिप्रा
ड
डोमकावळा Wed, 07/16/2008 - 14:18 नवीन

समर्पक उत्तरं..

अगदी योग्य उत्तरं दिलीस मित्रा. >>"सर्व्हाईव्हल ऑफ फिटेस्ट" हा ह्या जगाचा सिद्धात आहे, त्यानुसार जग चालते .. >>तुम्ही पहिल्यांदा फिट व्हा मग आपोआप "सर्व्हाईव्ह" कराल ... सरळ सोप्पा स्रुष्टीनियम आहे. >>मुळात "व्हाईट कॉलर" काम म्हणजे" मुबलक पैसा, छनछौकी जीवन, आराम" ही संकल्पना डोक्यातनं काढा ... सहमत. >>मला एक सांगा, तुमची कल्पना काय आहे "आयटी जॉब" बद्दल ? >>आम्ही जे रात्रंदिवस कष्ट करतो त्याची जाणीव आहे का ? >>कामासाठी मी "सकाळी ६ ला कंपनीत येतो व कधीकधी घरी जायला रात्रीचा १ वाजतो " ... >>आरामच आहे ना ? अशा नोकर्‍या करणेही सोप्पे असेल ना ? स्पष्ट भाषेत बोलायचं झालं तर "ज्याची जळते त्यालाच कळतं".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
श
शिप्रा Wed, 07/16/2008 - 14:10 नवीन

किति घाइ

किति घाइ ??? मी आप्ल्या सारख्या म्ह ण ले ...ते तुम्हाला आदराथि म्हणुन नाहि तर मि पण आय टि मधलि आहे म्हणुन,..... >>>>आम्हाल काय "जन्मप्रमाणपत्राबरोबर आयटी नोकरीचे "अपॉइंटमेंट लेटर मिळाले होते का ? का आमच्या बापाची कंपनी आहे आम्हाला असेच घ्यायला ??? आम्ही आत्तापर्यंत केलेल्या कष्टाची , रात्रंदिवस केलेल्या अभ्यासाची, त्यासाठी आम्ही केलेल्या त्यागाची काहीच किंमत नाही का? आम्हाला "जहागिरी" म्हणुन नोकरी मिळाली नाही हे लक्षात का घेत नाही ... आयटी वाल्यांवर एवढा राग का ? सगळे बोलुन मोक्ळे....निट वाचा ना आधि त्यापेक्क्षा...:) >>मला एक सांगा, तुमची कल्पना काय आहे "आयटी जॉब" बद्दल >> आता सांगु का काय कल्पना आहे ते...:) >>आम्ही जे रात्रंदिवस कष्ट करतो त्याची जाणीव आहे का ? हे मला विचारत आहेस का? जाणिव आहेच ..मला पण कंपनि फुक्ट्च्चा पगार देत नाहि... >>मुळात "व्हाईट कॉलर" काम म्हणजे" मुबलक पैसा, छनछौकी जीवन, आराम" ही संकल्पना डोक्यातनं काढा ... असे मि म्हणले आहे का?????????? माझ्या बापजाद्यानि माझासाथि जमिन जुमला थेवला नवता...कश्ट करुनच वर आले आहे... >>पण नोकरीच का हवी ? काही धम्दापाणी करु शकत नाही का ?फक्त "व्हाईट कॉलर" का हवे ? एवढा कसला न्युनगंड ? कोणि सांगितले कि ते धम्दापाणी कराय्ल्ल तयार नाहित? त्या साथि पण भांडवल लाग्ते...शेति साथि जमिन लागते... जिथे कमी तिथे आम्ही ..:)
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 07/16/2008 - 14:33 नवीन

घाई ? कुणाची ? तुमची की माझी ?

सर्वात प्रथम आपल्या पहिल्या प्रतिसादाबद्दल ... त्यात आपण जे "आपल्या " लिहले होते ते "आम्हाला [ हे मात्र स्वतःला आदरार्थी बरे ] " आदराथी वाटले पण ते "आपल्यासारख्या लोकांसाठी" असे अपेक्षीत होते. जरासे स्पष्ट [ का समजेल असे स्पष्ट म्हणु ?] न लिहल्याने आमचा अंमळ गैरसमज झाला ... असो. आता सगळे स्पष्ट समजले आहे ... तरीसुद्धा आमची "भुमीका" तिच आहे ... आता आपल्या [ हे आदरार्थी ] "प्रतिसादाबद्दल " बोलु ... मी माझ्या प्रतिसादात मांडलेले मुद्दे खोडुन काडणे अथवा त्याचे समर्थन करणे ह्या " दोनच गोष्टी" अपेक्षीत होत्या ... त्यातले काही नाही केले आपण ... उलट मी पण आपल्या सारखी आहे व "आपन बॉ फार घाई करता" हेच मुद्दे आपण हाताळले ... असो. काही प्रॉब्लेम नाही .... अजुन एकदा लिहा की माझे काय चुकले ते ? मी कष्ट करा म्हणालो ते चुकले ? की आम्हाला जे मिळते त्यामागे कष्ट आहेत हे म्हणालो ते चुकले ? जीवनाचा जो सिद्धांत सांगितला ते चुकले ? की चांगली "आय टी नोकरी" मिळवायला काय करावे लागेल ते सांगितलेले चुकले ? की त्यातील लाईफ कसे आहे हे सांगितलेले चुकले ? सांगा हो नक्की काय चुक झाली ते ? तुम्ही ह्याकडे अंमळ "दुर्लक्ष" करुन बाकीच्या अनावश्यक बाबींचा विचार करुन मला उलट प्रतिसाद टाकलात ... हे मात्र "आमच्या [ हे आदरार्थी ] " मते तुमचे चुकले ... असो. आता "घाई नका करु" , जी काही "टेक्नीकल मते" आहेत ती मांडा ... सरळ चर्चा करायला आम्ही आहोतच !!! तळटीप : प्रतिसादाचा आशय लक्षात घ्यावा व तो अर्थातच ह. घ्या. पण "मुळ मुद्दा" विसरु नये .... [घाईगडबडवाला ] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिप्रा
म
मनस्वी Wed, 07/16/2008 - 14:18 नवीन

एक अवांतर किस्सा

कंपनीतून बाहेर पडल्यावर एक मोठ्ठा चौक आहे. पुढे रस्त्यावर मॉल, हॉटेल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स वगैरे आहेत. १ बाई - तिचा नवरा - बाईच्या कडेवर १ मूल : अशी २ कुटुंबे आलटून - पालटून महिन्याच्या अंतराने चौकात दिसतात. थांबलेल्या दुचाकी / चारचाकी जवळ जातात अथवा पादचार्‍याला पकडतात. व्यक्ती मराठी दिसली की मराठीतून नाहीतर हिंदीतून संवाद चालू करतात : तुम्हाला मराठी येतं का? आम्ही नांदेड / अलाणा / फलाण्याचे आहोत.. जवळचे सगळे पैसे चोरीला गेले.. परत गावी जायचे आहे.. मदत करा.. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
श
श्री Wed, 07/16/2008 - 17:16 नवीन

मनस्वी

मनस्वी ताई, राग मानू नका, पण ह्या एक अवांतर किस्सा चे येथे प्रयोजन कळ्ले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
श
शिप्रा Wed, 07/16/2008 - 14:41 नवीन

>>अजुन एकदा

>>अजुन एकदा लिहा की माझे काय चुकले ते ? तुझे काय चुकले हया साथि हि चच्रा नाहि.... >>तुम्ही ह्याकडे अंमळ "दुर्लक्ष" करुन बाकीच्या अनावश्यक बाबींचा विचार करुन मला उलट प्रतिसाद टाकलात ... माझे पण तुझा प्रतिसादा बद्द्ल हेच मत आहे...तुझि नोकरि, तुझे कष्ट हे स्वताचे फ्रस्टेशन सांगितलेस फक्त...टेक्नीकल मते" कुथे?? >>सरळ चर्चा करायला आमही आहोतच !!! नको...अस्ल्या चर्चा करायला मला कंपनि पगार देत नाहि...फक्त असाच वेळ घालवला तर मला पण सकाळि ६ ला येऊन रात्रि १ ला जावे लागेल... जिथे कमी तिथे आम्ही ..:)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 07/16/2008 - 14:51 नवीन

ठोsss ठोsss ठोsss

>>>>सरळ चर्चा करायला आमही आहोतच !!! >>नको...अस्ल्या चर्चा करायला मला कंपनि पगार देत नाहि...फक्त असाच वेळ घालवला तर मला पण सकाळि ६ ला येऊन रात्रि १ ला जावे लागेल... ठोsss ठोsss ठोsss =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिप्रा
छ
छोटा डॉन Wed, 07/16/2008 - 14:57 नवीन

काय बोलु बॉ ???

च्यायला ह्या "अस्ल्या चर्चा करायला मला कंपनि पगार देत नाहि...फक्त असाच वेळ घालवला तर मला पण सकाळि ६ ला येऊन रात्रि १ ला जावे लागेल..." वाक्याला आम्हीही .... =)) =)) =)) काय बोलणार ? काही का असेना, भारीच ... जाऊ दे, आमचाही आता "अंमळ गंभीर चर्चा" करायचा मुड गेला ... बास झाले आता .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Wed, 07/16/2008 - 15:04 नवीन

जिंदादीली

याला म्हणतात जिंदादीली .. नायतर साला चर्चा म्हटले की हाण हाण हानामार्‍या चालुच. आपलाच (डान्याचा प्राउड फ्रेंड) छोटा आंद्या अवांतरः इतिहासाचा अभ्यास करुन आमचे एक मत पक्के झालेय की मराठी माणुस त्याची भांडणाची खाज मिटवण्यासाठी अगदी पुरातन काळापासुन संकेतस्थळे बनवत आलाय. आयचा घो त्या चामुंड्याचा ..... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Wed, 07/16/2008 - 15:09 नवीन

धन्यु ... धन्यु ...

>>(डान्याचा प्राउड फ्रेंड) छोटा आंद्या धन्यवाद ... धन्यवाद ... [ इज्जतीच्या चिंध्या झाल्यावर सुद्धा धन्यवाद म्हणणे याला आजच्या भाषेत "सॉफॅस्टीकेटेडनेस" म्हणतात ] [ बिनकामी ] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 07/16/2008 - 15:18 नवीन

>>सरळ चर्चा

>>सरळ चर्चा करायला आमही आहोतच !!! नको...असल्या चर्चा करायला मला कंपनी पगार देत नाहि...फक्त असाच वेळ घालवला तर मला पण सकाळि ६ ला येऊन रात्रि १ ला जावे लागेल... खरंय! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिप्रा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा