ही शांत, सुभगशी संध्या
पण किंचित उदासवाणी... !
ओट्यावर, ज़मिनीवर ना
सांडले दूध वा पाणी... ?
:)
झटक्यात उगवशी केव्हा
मी वडे,भजी तळताना... !
मोरीत उगवशी माझ्या
कांतीला उजळवताना... !
अरे वा...
हे असं पण असु शकतं? आयला, कसं काय जमतं बुवा तुम्हा लोकांना एव्हढ्याश्या गोष्टींवरुन सुध्दा कविता गज़ला करायला?
छान. चालू द्या...
अवांतरः बेसनलाडूचे दर्शन बर्याच दिवसांनी घडले...छान!
तशा कविता आम्हीही लिहितो... पण आमची प्रतीभा अश्रू आणि प्रेम याच्यापुढे एक पाऊलही टाकायला मागत नाही...
लय भारी राव... अगदी छान जमलं आहे विडंबन...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
बेसनशेठ,
विडंबन आवडले..
मोरीत उगवशी माझ्या
कांतीला उजळवताना... ! ह्या वरून आम्हाला आमच्या कंदिल - द दिवा विडंबनातला
मी दार लावलेले, वरती कुलूप सुद्धा
बोका घुसे कसा हा न्हाणीघरात माझ्या?
ह्या द्विपदी आठवल्या..
(वाचक) केशवसुमार
ही शांत,
सहमत...
ओहो!
हा हा हा!!
वा बेला