केळ्याच्या पोळ्या

ऋचा's picture
ऋचा in पाककृती
21 May 2008 - 4:27 pm

पिकलेली केळी २
तेल
कणीक २ वाट्या
चवी पुरती साखर

केळी कुस्करुन घ्या
त्यात थोडी (१-२ चमचे) साखर घाला.
त्यात बसेल इतकी कणीक (गव्हाचे पीठ) घाला सैलसर मळून घ्या.

हलक्या हाताने पोळी लाटून भाजा.
भाजताना थोडे तेल दोन्ही बाजूंनी सोडा.

ह्या फार खुसखुशीत आणि चवदार लागतात.
आंबटगोड चटणी बरोबर खा.

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

21 May 2008 - 4:34 pm | आनंदयात्री

वाचुनच खाव्याश्या वाटतायेत, लै भारी !
आम्हाला आत्तापर्यन्त केळ्याचे शिकरणच माहित होते फक्त :)

वरदा's picture

21 May 2008 - 5:43 pm | वरदा

मी लहान असताना आई करायची करुन पाहिली पाहिजे....मस्त सुचवलस...

सहज's picture

22 May 2008 - 6:05 am | सहज

लहान मुलांसाठी मस्त पदार्थ, न्याहरीला अजुन एक पर्याय.

धन्यवाद ऋचा.

विसोबा खेचर's picture

22 May 2008 - 6:18 am | विसोबा खेचर

साधी व सोपी परंतु तेवढीच सुंदर पाकृ!

छ्या! साला केळं-पोळी, शिक्रण-पोळी, मोरांबा-पोळी यातलं ममत्व दुसर्‍या कशातच नाही!

आपला,
(हळवा) तात्या.

मदनबाण's picture

22 May 2008 - 6:35 am | मदनबाण

केळ-साखर्+तुप हे एकत्र करुन ते पोळी बरोबर खाल्ले आहे..पण केळ्याच्या पोळ्या हे काही ट्राय केल नाही..हे हे ट्राय करुन पहाव म्हणतो.....

(वेलची केळ्याची शिक्रण हादणारा)
मदनबाण.....

वरदा's picture

22 May 2008 - 6:36 am | वरदा

पण मस्त लागतं ना.....

ऋचा's picture

22 May 2008 - 10:21 am | ऋचा

हो हे खुप छान लागतं आणि पौष्टीक ही असतं